' कित्येक व्हायरल मीम्समधून जगप्रसिद्ध झालेला हा 'मुलगा' आहे एक भन्नाट "अभिनेता"!

कित्येक व्हायरल मीम्समधून जगप्रसिद्ध झालेला हा ‘मुलगा’ आहे एक भन्नाट “अभिनेता”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सध्या सोशल मीडिया म्हणजे मीम्स आणि ट्रेंडिंग गोष्टींचा महापूर अशीच परिस्थिती झाली आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या ‘पावरी हो रही है’ चा व्हीडियो असो किंवा ऑनलाइन मीटिंग मध्ये माईक ऑफ न ठेवल्याने व्हायरल झालेल्या श्वेताचा व्हिडिओ असो!

सोशल मीडियावर दर दिवशी काहीना काहीतरी ट्रेंड होतच असतं. आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वात जास्त कुणाला फायदा होत असेल तर तो मीम बनवणाऱ्या लोकांना!

 

pawry inmarathi

 

सध्यातर मीम्सइतके तूफान व्हायरल होतात की काही क्षणातच ती मीम्स तुम्हाला व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या स्टेटसवर तुम्हाला दिसतात! हेरा फेरी मधल्या बाबुराव आपटे किंवा तारक मेहता मधल्या जेठालाल यांचे बरेचसे मीम्स सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत असतात.

या सगळ्यांचे वेगवेगळे gif फाइल्स स्टीकर्ससुद्धा नेटकरी आवडीने वापरतात आणि फॉरवर्ड करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

या सगळ्या मीम्सच्या गर्दीत एक चेहेरा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, जो भारतीय नाही पण त्या लहान मुलांचे कित्येक मीम्स आणि छोटे छोटे व्हिडिओ आपण एकदातरी सोशल मीडियावर नक्की पाहिले असतील.

‘मूर्ती लहान कीर्ती महान’ किंवा ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ ह्या म्हणी ज्याच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतात तो सोशल मीडिया स्टार म्हणजे ओसिता ईहेम हा नायजेरियन अभिनेता!

 

osita iheme inmarathi

 

याचं नाव प्रत्येकाला परिचित असेलच असं नाही, पण हा चेहरा आपण सगळ्यांनीच पाहिला असेल, आणि त्याच्याशी संदर्भात वेगवेगळी मीम्स शेयर सुद्धा केली असतील.

ऊंची कमी असल्याने बऱ्याच लोकांचा हा गैरसमज होतो की हा कुणी बालकलाकार आहे, पण ओसिता हा नॉलीवूड म्हणजेच नायजेरियन फिल्म इंडस्ट्रीचा एक नावाजलेला अभिनेता आहे. ज्यांची ऊंची कमी असल्याकारणाने तो लोकांना लहान वाटतो पण तो ३९ वर्षाचा आहे आणि नायजेरिया मधला एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे!

त्याच्या एक्सप्रेशनच्या सोशल मीडिया वर व्हायरल होणाऱ्या gif फाइल्स किंवा स्टीकर्स आपण खूप पहिले असतील फॉरवर्डसुद्धा केले असतील. आज आपण या अवलियाविषयीच काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत!

 

tenor

 

ओसिता यांचा जन्म २० फेब्रुवारी १९८२ रोजी नायजेरियामधल्या इमो राज्यातल्या छोट्याशा गावात झाला! २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘अकी ना उकवा’ या नायजेरियन फिल्म मध्ये त्यांनी सर्वप्रथम काम केलं, आणि या फिल्ममधल्याच बऱ्याचशा क्लिप मीम्स म्हणून व्हायरल झाल्या आहेत!

या सिनेमाने जागतिक पातळीवर ओसिता यांची ओळख निर्माण झाली आणि इतरही देशात हा चेहरा ओळखीचा होऊ लागला!

या फिल्ममध्ये त्यांनी साकारलेल्या पात्राचं नाव होतं ‘PawPaw’,  आणि नायजेरिया मधली बरीचशी लोकं त्यांना याच नावाने ओळखतात! या सिनेमाची कथा ही २ भावांवर बेतली होती, ज्यात आपल्या गावात ते कशाप्रकारे धमाल करतात हे दाखवण्यात आलं होतं!

आजवर ओसिता यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. २००७ च्या आफ्रिका सिने अवॉर्ड सोहळ्यात त्यांना लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डसुद्धा दिला गेला. शिवाय २०११ साली नायजेरियन फेडरल सरकारकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा देण्यात आला होता!

 

osita ihme inmarathi

 

ओसितो यांची वाढती लोकप्रियता बघता नायजेरियन फिल्ममेकर्स अशी आशा करतात की लवकरच त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीकडे देखील लोकांची नजर पडेल!

ओसितो हे अभिनयाव्यतिरिक्त रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचंसुद्धा काम करतात. शिवाय ‘Inspired 101’ नावाचं प्रेरणात्मक पुस्तकसुद्धा लिहिलं आहे!

अमेरिकन पॉपस्टार रिहानाच्या कंपनीने ओसितोचे बरेचसे मीम्स शेयर केले आणि त्यानंतर सुप्रसिद्ध अमेरिकन रॅपर फिफ्टी सेंट याने सुद्धा ओसितोचे मीम्स शेयर केले आणि त्यांनंतर ओसितो हे नाव आणि तो चेहेरा लोकप्रिय व्हायला खरी सुरुवात झाली!

आज ओसितो यांची मीम्स आणि स्टीकर्स आपल्यापैकी कित्येकांच्या मोबाईलवर असतील पण त्या खोडकर, निरागस आणि गोड चेहऱ्यामागची ही कहाणी फार कमी लोकांना ठाऊक असेल.

 

osito inmarathi

 

ओसितो यांना मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आपणही जागतिक सिनेमाच्या प्रकाशझोतात येऊ असे नायजेरियन कलाकारांना वाटत आहे. नेटफ्लिक्स सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने २०१८ मध्ये ‘लायन हार्ट’ या नायजेरियन सिनेमाचे राईट्स चांगली किंमत देऊन विकत घेतले होते!

पण आपल्या देशात इतर रिजनल फिल्म इंडस्ट्रीची किंवा भोजपुरी इंडस्ट्रीची जी अवस्था आहे तशीच काहीशी अवस्था या नायजेरियन इंडस्ट्रीची आहे.

पण ओसितोसारख्या आणखीनही गुणी कलाकारांना जागतिक मंचावर ओळख मिळावी यासाठी नायजेरियासारख्या फिल्म इंडस्ट्रीकडे लोकांचं लक्ष गेलं पाहिजे, आणि असे गुणी कलाकार लाईमलाइटमध्ये आले पाहिजेत!

osito iheme inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?