' विज्ञानाच्या मदतीने आयुष्य वाढवता येईल! त्याने केला १८० वर्षं जगणार असल्याचा दावा… – InMarathi

विज्ञानाच्या मदतीने आयुष्य वाढवता येईल! त्याने केला १८० वर्षं जगणार असल्याचा दावा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…” हे अरुण दातेंचं गाणं आपल्या सर्वांच्याच आवडीचं आहे. जीवन सुंदर आहे. ते भरभरून जगावं. पण, हे सर्व कधी तरी संपणार आहे हे मान्य केलेलं कधीही चांगलं आहे. मृत्यू हा जीवनाला मिळणारा पूर्णविराम आहे असं म्हणता येईल.

जेव्हा मृत्यूची भीती निघून जाते, तेव्हा माणूस अजून चांगलं आयुष्य जगतो. राजेश खन्ना यांच्या ‘आनंद’ सिनेमातील काही संवाद याबाबतीत खूप मार्मिक आहेत. “जिंदगी बडी होनी चाहीये… लंबी नही” याचा अर्थ म्हणजे रटाळ आयुष्य जगण्यापेक्षा जीवनातील प्रत्येक गोष्टीचा मोठ्या मनाने स्वीकार करून त्याचा आनंद मानायला प्रत्येकाने शिकायला पाहिजे.

 

amitabh bachchan rajesh khanna inmarathi

 

अमेरिकेतील ४७ वर्षीय उद्योगपती आणि अरबपती असलेले डेव्ह अस्प्रे यांनी मात्र आयुष्य लांब करण्याचा चंग बांधला आहे.

सर्वसाधारणपणे ७० ते ९० वर्ष इतकं आयुर्मान असलेलं आपलं जीवन त्यांना १८० वर्षांपर्यंत लांब करायचं आहे. आपण कोणाची आठवण काढली आणि त्याच व्यक्तीचा फोन आला किंवा ती व्यक्ती समोर आली, तर आपण “शंभर वर्ष आयुष्य” असं म्हणत असतो.

‘डेव्ह अस्प्रे यांनी मात्र आपलं आयुर्मान स्वतःच २०० वर्षांच्या आसपास नेऊन ठेवलं आहे’ अशी बातमी सध्या वैद्यकीय वर्तुळात चांगलीच चर्चिली जात आहे.

डेव्ह अस्प्रे यांनी असं काय केलं आहे, ज्यांनी त्यांना हे वरदान मिळालं? आजच्या काळात त्यासाठी कोणी तपश्चर्या वगैरे तर करणार नाही. डेव्ह अस्प्रे यांनी विज्ञानाचाच आधार घेऊन हे शक्य होईल असा दावा केला आहे.

डेव्ह अस्प्रे यांनी त्यासाठी थोडेथोडके नाही, तर तब्बल ८७ लाख रुपये खर्च केले आहेत. आपल्या शरीरातील ‘स्टेम पेशींना’ पुन्हा शरीरात सोडण्याने हे शक्य आहे असं डेव्ह अस्प्रे यांचं म्हणणं आहे.

‘स्टेम पेशी’ म्हणजे काय ?

स्टेम पेशी म्हणजे आपल्या शरीरातील ‘मूळ पेशी’ असतात. या पेशी कोणत्याही प्रकारच्या नवीन पेशी तयार करण्यास सक्षम असतात. स्टेम पेशी प्रसुतीच्या वेळी मातेच्या गर्भनाळेतून तसंच रक्त किंवा अस्थिमज्जा (बोनमॅरो) मधून प्राप्त करता येतात.

 

stem cells inmarathi

 

स्टेम पेशींचे प्रत्यारोपण केल्याने असाध्य रोगांवर मात करता येते हे काही काही वर्षांपूर्वी सिद्ध झालं आहे. नवीन पेशींच्या वाढीसाठी मदत करणाऱ्या स्टेम पेशींमुळे आपण जास्त काळ निरोगी राहू शकतो. म्हणजेच अधिक काळ निरोगी आयुष्य जगू शकतो असा दावाडेव्ह अस्प्रे यांनी केला आहे.

आपल्या शरीरात स्टेम पेशींचा साठा हा असतोच. बोनमॅरोमधून स्टेम पेशी प्राप्त केल्या जातात. तुम्ही जर ‘क्रिश ३’ हा हृतिक रोशन-कंगना राणावत यांचा सिनेमा बघितला असेल, तर त्याचं कथानक असंच होतं.

या सिनेमात ‘काल’ हा व्हिलन बोनमॅरोची चोरी करून स्वतःला अमर करायचा प्रयत्न करत असतो. असो. तो एक काल्पनिक सिनेमा होता. डेव्ह अस्प्रे हे प्रत्यक्षात साध्य करू पाहत आहेत आणि २१५३ पर्यंत त्यांचं आयुष्य असावं इतकी त्यांनी तरतूद करून ठेवली आहे.

हे कसं शक्य होईल?

डेव्ह अस्प्रे हे एका अति थंड खोलीमध्ये काहीच न खाता राहणार आहेत. जेणेकरून त्यांना ना भूक लागेल, ना तहान. यापद्धतीला ‘बायोहॅकिंग’ असं नाव देण्यात आलं आहे.

 

dave asprey inmarathi

 

आपल्या शरीरातील अस्थिमज्जा (बोनमॅरो) मधील स्टेम पेशी काढून घेऊन त्याचं प्रत्यारोपण डेव्ह अस्प्रे यांनी करून घेतलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, ४० व्या वर्षाच्या आत जर ही पद्धत एखाद्या व्यक्तीने अवलंबली तर ती व्यक्ती १०० व्या वर्षानंतर सुद्धा ठणठणीत राहू शकते.

इतकं जगून करायचं काय?

हा प्रश्न सहाजिकच कोणालाही पडू शकतो. डेव्ह अस्प्रे यांना जेव्हा एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर मजेशीर होतं. ते म्हणाले होते की, त्यांना जगण्याबद्दल खूप कुतूहल आहे. या जगात खूप काही गोष्टी आहेत ज्या त्यांना बदलायच्या आहेत. त्या बदलांची त्यांनी अजून सुरुवात केलेली नाहीये.

डेव्ह अस्प्रे यांना हा विश्वास वाटतो की, इतक्या वर्षापर्यंत जगणारे ते एकमेव नसतील. ही पद्धत लवकरच खूप प्रसिद्ध होईल. या संधीचा फायदा कित्येक लोक घेतील.

ते फक्त त्याची सुरुवात करत आहेत असं त्यांना वाटतं. हे साध्य करण्यासाठी काही गोष्टी महाग आहेत ज्या की फक्त उच्चवर्गीय लोकांना शक्य होतील. काही पद्धती सोप्या सुद्धा आहेत, म्हणजेच ‘उपवास’ करणे. ही एक अशी पद्धत आहे जी की कोणालाही शक्य होऊ शकते.

 

fasting inmarathi

 

प्रत्येक जण आपल्या परीने तरुण राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, अस्प्रे जाहीरपणे तो प्रयत्न करत आहेत इतकाच काय तो फरक आहे. ते सध्या फक्त खाण्या पिण्याच्या सवयी, झोपण्याची सवय यावर काम करत आहेत.

उपवास करण्याची गरज काय?

डेव्ह अस्प्रे यांच्या मते, जेव्हा आपण तरुण असतो, तेव्हा आपल्या शरीरात हजारो स्टेम पेशी तयार होत असतात. जसं आपलं वय वाढतं, तसं स्टेम पेशी तयार होण्याचं प्रमाण कमी होत जातं.

जितकं शरीरात अन्नाचं प्रमाण कमी तितक्या स्टेम पेशी जास्त तयार होतात हे कळल्यापासून ते कमीत कमी खातो आणि स्टेम पेशी काढून घेतो आणि त्याच पेशी शरीरात परत सोडतात. ज्यामुळे पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं रोज वाटतं.

हे ही वाचा – विज्ञानाला आव्हान देणारी, आजही न उलगडलेली ६ रहस्ये, माहित करून घ्या!

शरीर जेव्हा अन्नपचन करत नाही तेव्हा ते स्टेम पेशी तयार करत असतं. स्टेम पेशी पुन्हा शरीरात सोडल्यामुळे, ऍसिडिटीचा त्रास सुद्धा होत नाही.

‘क्रायोथेअरपी’ म्हणजेच शरीराला शक्य तितक्या थंड वातावरणात ठेवणे. या पद्धतीचा वापर करण्यासाठी डेव्ह अस्प्रे हे दहा वर्षांपासून ‘कोल्ड शॉवर्स’ ही पद्धत वापरत आहेत. आज जगातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा डेव्ह अस्प्रे यांच्या शरीरात सर्वात जास्त स्टेम पेशी आहेत असा दावा त्यांनी केला आहे.

 

dave asprey cold atmosphere inmarathi

 

कोण आहेत डेव्ह अस्प्रे?

डेव्ह अस्प्रे हे एक उद्योगपती तर आहेतच, त्याशिवाय न्यूयॉर्क टाईम्सचे सर्वाधिक लोकप्रिय लेखक सुद्धा आहेत. आपल्या शरीराचं घड्याळ उलट फिरवणारी व्यक्ती म्हणून सुद्धा ते सध्या नावारूपास आले आहेत.

‘माणसांचं आरोग्य’ या विषयावर त्यांनी एकूण ५ पुस्तकं लिहिली आहेत. ‘लाईफस्टाइल गुरू’ म्हणून त्यांची सध्या ओळख होत आहे. ३० ऑक्टोबर १९७३ रोजी अमेरिकेत जन्म झालेल्या डेव्ह अस्प्रे यांनी २०१३ मध्ये ‘बुलेटप्रूफ ३६०’ या कंपनीची स्थापना केली आहे. ‘बुलेटप्रूफ कॉफी’ या नावाने कमी तीव्रतेची कॉफी तयार करण्यास सुरुवात केली आणि त्याची ऑनलाईन विक्री सुद्धा सुरू केली आहे.

अमेरिकेतून MBA चं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही वर्ष IT क्षेत्रात नोकरी केली होती. त्यांनी कोणतीही पदवी नसतांना वैद्यकीय शाखेबद्दल केलेल्या या टिप्पणीबद्दल काही लोकांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे.

 

it sector inmarathi

 

‘सकाळचा नाश्ता करू नये’ या डेव्ह अस्प्रे यांच्या सल्ल्याचा जवळपास सर्वच डॉक्टरांनी विरोध केला आहे. स्टेम पेशींचा रोज १०० डोस घेणे, ऑक्सिजन चेंबरमध्ये इन्फ्रारेड लाईटने आंघोळ करणे, कम्प्युटर वापरतांना वेगळ्या पद्धतीचे लेन्स वापरणे हे वय न वाढवण्यासाठी केलेले उपाय हे जगातील डॉक्टरांना ‘अमानवी’ वाटत आहे.

डेव्ह अस्प्रे यांच्या या प्रयत्नात त्यांना यश मिळेल की नाही हे येणारा काळच सांगेल. २१५३ पर्यंत डेव्ह अस्प्रे जिवंत असतील की नाही हे बघायला किती जण असतील ही सुद्धा एक शंकाच आहे. जिवंत राहून डेव्ह अस्प्रे यांना जर सत्कर्म करायची असतील, तर त्यांनी अजूनही किती वर्ष जगले तरी लोकांना त्यातून मदतच होईल अशी आशा व्यक्त करूयात.

===

हे ही वाचा – तब्बल ८० वर्षे अन्न पाण्याशिवाय जगणाऱ्या या साधूसमोर ‘डॉक्टरही’ झाले नतमस्तक!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?