' भेटा ११ मोबाईल अॅप्स बनवणाऱ्या भारतातील सर्वात तरुण उद्योजकांना!

भेटा ११ मोबाईल अॅप्स बनवणाऱ्या भारतातील सर्वात तरुण उद्योजकांना!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये स्मार्टफोन पाहायलाच मिळतो. लोकांना कुठेही मागे राहायचे नाही आहे त्यांना बदलत्या जगासोबत बदलायचे आहे आणि तंत्रज्ञान जगतातील क्रांती त्याचे उत्तम उदाहरण आहे. या स्मार्टफोनला स्पेशल काय बनवतं तर ते म्हणजे त्यातील अॅप्स! विविध प्रकारच्या अॅप्स वरून दैनंदिन जीवनातील जवळपास सर्वच गोष्टी करता येतात. या अॅप्सनी ग्राहकांना वेळेची श्रीमंत दिली तर त्यांच्या निर्माणकर्त्यांना पैश्यांची आणि प्रसिद्धीची श्रीमंती दिली.

apps-marathipizza
bgr.in

म्हणूनच आजकालचे तरुण पारंपारिक धंद्यांमध्ये नशीब न आजमवता अॅप्सच्या क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत काय माहित, देवाची कृपा व्हायची आणि अॅप हिट ठरायचं या एकाच आशेवर आज तंत्रज्ञान जगतात अनेक उद्योजकांचे अॅप्स धुमाकूळ घालत आहे. जे आजही या अॅप्सच्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठण्याची स्वप्ने बघत आहेत, त्यांनी अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न सुरु ठेवायला हवा, त्यासाठी त्यांनी भारतातील दोन चिमुरड्या उद्योजकांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. या लहान मुर्त्या जर हे शिवधनुष्य पेलू शकतात, मग तुम्ही का नाही? चला तर भेटा भारतातील दोन youngest CEO ना.

shravan-sanjay-marathipizza
godimensions.com

चेन्नईमध्ये राहणाऱ्या श्रवण आणि संजय कुमारन या दोन सख्या भावांनी २०१२ साली आपलं पहिलं मोबाईल अॅप बनवले होते. त्यावेळी श्रवण ६ वीत आणि संजय ८ वीत होता. त्यानंतरही त्यांनी आपल्या प्रतिभेचा वापर करत अनेक मोबाईल अॅप्स बनवले ज्यांना तब्बल ७०,००० लोकांनी डाऊनलोड केले आहे. त्यांनी स्वत:ची कंपनी हि स्थापन केली असून कंपनीला नाव दिले आहे- GoDimensions आणि CEO पदी हे दोघेहि विराजमान आहेत.

shravan-and-sanjay-marathipizza1
slideshare.net

हे दोघं स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांना आपला आदर्श मानतात. नवनवीन शोध लावून लोकांचे जीवन अधिक सुकर करणे हे त्यांच्या कार्यामाग्चे उद्दिष्ट आहे, जे खरंच कौतुकास्पद आहे.

TEDx, IIM-B, Herald Design Week या आणि अश्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना एवढ्या लहान वयात इतरांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याची खुद्द दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील दखल घेतली होती.

shravan-and-sanjay-marathipizza02
indiatimes.com

आता काहीशी समज आलेले हे दोघे भाऊ अभ्यास वगैरे सांभाळत आपल्या व्यवसायावर लक्ष देत आहेत. येत्या काही वर्षांत भारतातील जवळपास ५०% स्मार्टफोनधारकांपर्यंत आपले अॅप्स पोचवण्याचा मनसुबा आहे. तसेच पुढे जे काही उत्पन्न होईल त्यातील १५% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे, त्याबद्दल देखील त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

shravan-and-sanjay-marathipizza03
rediff.com

असे हे भारतातील सर्वात तरुण उद्योजक इतर नवउद्योजकांसाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भेटा ११ मोबाईल अॅप्स बनवणाऱ्या भारतातील सर्वात तरुण उद्योजकांना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?