' या भावंडांच्या प्रयत्नांमुळे 'आईच्या हातची खीर' आता सगळ्यांनाच चाखायला मिळतेय...

या भावंडांच्या प्रयत्नांमुळे ‘आईच्या हातची खीर’ आता सगळ्यांनाच चाखायला मिळतेय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली असेल, “मी खीर खाल्ली, तर बूड बूड घागरी”. गोष्ट मस्तच होती, त्यातून ती खीरीची होती. मग काय ती गोष्ट ऐकता ऐकता तोंडाला पाणी सुटायचं. मग गोष्ट ऐकून झाली, की आईकडे किंवा आजीकडे हट्ट सुरु व्हायचा, “कधी करणार गं तू खीर?”

आपल्या हट्टासाठी लगेच खीर केली जायची आणि गोष्ट ऐकल्यापेक्षा जास्त आनंद ती खीर खाऊन आपल्या चेहऱ्यावर दिसायचा, हे काही वेगळं सांगायला नको. तसंही आजसुद्धा खीर हा पदार्थ भारतीय संस्कृतीच्या जेवणातील आपलं स्थान अबाधित राखून आहे.

आपण बाहेर फिरताना चायनीज, आइस-क्रीम, भेळ, वडापाव, सामोसा, भजी आणि अशा अजून बऱ्याच प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्नॅक सेन्टर्स बघतो. पण कधी तुम्ही कल्पनाही केली आहे का, की “खिरीचं” ही outlet असेल? तुम्ही म्हणाल अरे वडापाव वैगरे ठीक आहे, अगदी डोसा, अप्पम सुद्धा ठीक, पण “खीर”!!, नाही, नाही, काहीही बोलताय राव!

 

vadapav-inmarathi

 

अहो, थांबा जरा, कारण हे सत्य आहे. आज तुम्हाला अशा एक यशस्वी उद्योगाची कहाणी आम्ही सांगणार आहोत, ज्यांनी “खीर” या संकल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

या उद्योगाचं नाव आहे LKD म्हणजेच पुण्यातील सुप्रसिद्ध La Kheer Deli! शिवांग आणि शिवीका सूद या बहीण-भावांनी Sooduku Foods या बॅनरखाली मे २०१६ साली LKD ची स्थापना केली. त्यांचा मूळ उद्देश घरगुती खिरीवर काही नवीन टेस्टी प्रयोग करून तिला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर घेऊन जायचं असा होता.

हे ही वाचा – या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह ‘आत्मविश्वासाचा सुगंध’ दरवळला…

खरंच आज जर आपण बघितलं, तर LKD ने फक्त भरारी नव्हे, तर गगनभरारी घेतलेली आहे. अर्थात हे सगळं काही एका रात्रीत नक्कीच घडलं नाही, त्यातही खूप अप्स अँड डाउन्स आले. पण LKD ने खरंच “करून दाखवलं”.

 

la kheer deli inmarathi

 

या अशा LKD ची संकल्पना मात्र शिजली ती स्वयंपाक घरातच, आईच्या देखरेखीखाली! ही संकल्पना सत्यात आली आणि एक नवीन इतिहास घडला.

शिवांग आणि शिवीका यांची आई खूप वर्षापासूनच खीर करायची. त्या खीर specialist होत्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतकी छान खीर त्या बनवत. इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. त्याच त्याच प्रकारची खीर खाण्यापेक्षा खिरीला काहीतरी वेगळा touch द्यायची संकल्पना शिवांग आणि शिवीकाने आईसमोर मांडली.

इथूनच एका रोमांचक अशा खिरीचा प्रवास सुरु झाला. नुसती ट्रॅडीशनल खीर न बनवता त्याला फ्लेवरची जोड देता येईल आणि त्याचबरोबर त्या खीरीची चवंही बिघडणार नाही याकडे लक्ष दिल गेलं. वेगवेगळया flavour च्या खीरी मिळू लागल्या, ज्यांचा वापर desert म्हणून जास्त आवडू लागलं.

 

la kheer deli flavors inmarathi

 

त्यानंतर काय, तर सुरवात झाली ती नातेवाईक आणि मित्रांवर प्रयोग करून… हळूहळू फीडबॅक मिळत गेला. खिरींचा वेगळा प्रकार सगळ्यांना आवडू लागला. सुरवातीला ५० डिशची ऑर्डर, मग ८०, असा हा आकडा पुढे वाढतच गेला.

या भावंडांची आई जवळपास वर्षभर घरातूनच खीर बनवून त्यांच्या ऑर्डर पूर्ण करायची. कालांतराने, यासाठी एखादं तरी आउटलेट असावं असं वाटू लागलं. अगदी छोटी गाडी सुद्धा चालेल अशी परिस्थिती होती. ज्यातून ते थोडा संघर्ष केल्यावरच बाहेर पडले, कारण कायदेशीर बाबींसाठी खूप वेळ गेला, पण LKD च handcart मात्र नीट सुरु झाला.

आधी फक्त ऑर्डरवर सुरु असणारी खिरीची मागणी रोज होऊ लागली आणि रोज खीर बनवणं त्यांना कर्मप्राप्त झालं. त्यांनी काळाची पाऊले आधीच ओळखली होती. २०१८ साली त्यांनी पुण्यातील जे एम रोडवर पहिलं आउटलेट सुरु केलं आणि खऱ्या अर्थाने LKD ची ब्रँड बनण्याकडे घोडदौड सुरु झाली..

 

lkd brand inmarathi

 

आजमितीला LKD च्या पुण्यात ६ शाखा आहेत. (खास पुणेरी भाषा म्हणून शाखा म्हंटलं बरं का! नाहीतर आउटलेट सुद्धा म्हणता आलं असतं)

सुरुवातीच्या वर्षात ३३ लाखांची उलाढाल, २०१८ साली हाच आकडा ८२ लाखापर्यंत पोचला. आज तर तो करोडच्याही वर गेला आहे. आज LKD मध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सची खीर आणि deserts मिळतात. अगदी मँगोपासून ते ओरिओपर्यंत अनेक चवी इथे चाखायला मिळतात.

आज तर अनेक मोठमोठे फुड ब्रँड, जसे की डॉमिनोज, सबवे, मॅकडोनाल्ड भारतात येऊन करोडोंची उलाढाल करत आहेत. आपल्या तब्येतीवर त्याचा काय परिणाम होतो हा भाग वेगळा… बास्कीन-रॉबिनचं ice क्रीम खाणारा माणूस, जेव्हा LKD ची खीर खायचा विचार करतो, तेव्हा खरंच आपला ऊर अभिमानाने भरून येतो.

 

lkd dessert inmarathi

 

अशा अभिमानास्पद कामगिरीसाठी Sood Family ला सॅल्यूट आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!

पुण्याचा अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी आहेत. पुण्याला भेट द्यायची म्हणजे अशा या अभिमानास्पद ठिकाणांना आपण भेटी देतोच. तसंच कधीतरी एकदा ‘ला खीर डेली’ अर्थात, LKD ला नक्कीच भेट द्या. हे गोड सरप्राईझ सुद्धा तुम्हाला आवडेल…

===

हे ही वाचा – किचनमध्ये आईने केलेल्या प्रयोगाला बहीण-भावाने दिलं व्यवसायाचं रूप; करतायत करोडोंची कमाई

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?