' क्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात? यामागचं कारण अगदी गमतीशीर आहे – InMarathi

क्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात? यामागचं कारण अगदी गमतीशीर आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याकडे क्रिकेटवेड्यांची काही कमी नाही. भारतात कुठेही जा तुम्हाला गल्लीबोळात, रस्त्यावर आणि शेतात सुद्धा केवळ क्रिकेट हा खेळच दिसेल. इतकं आपलं क्रिकेटबद्दलचं प्रेम.

अशा या क्रिकेटवेड्यांना क्रिकेटबद्दल अगाध ज्ञान असते बरं का! ते देखील आपल्याच क्रिकेटबद्दल नव्हे तर इतर संघांच्या क्रिकेटबद्दल सुद्धा! असो तशी ही एक चांगली गोष्ट आहे.

साहेबांचा गेम म्हणून ज्या क्रिकेटची महती होती तो क्रिकेट आता सचिनच्या देशातला अर्थात भारतातला क्रिकेट म्हणून जगभरात ओळखला जातो यापेक्षा दुसरी गौरवाची गोष्ट ती काय!

क्रिकेटवेड्यांना आणि क्रिकेटतज्ञांना एक प्रश्न आज विचारायचा आहे…तुम्हाला माहित आहे का हो, क्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात?

नाही माहित? काय रावं तुम्ही..! चला तुमच्या या देखील प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देऊ.

क्रिकेट सामना सुरु असताना फलंदाजी करणारा खेळाडू जर शून्यावर आऊट झाला तर तो डकवर आऊट झाला असे म्हणतात. तर या शून्याला Zero न म्हणता Duck च म्हणण्यामागचं कारण आज जाणून घेऊया!

 

duck-wicket-marathipizza

 

हा शब्द नेमका उत्पन्न कुठून झाला हे जाणून घेण्याआधी क्रिकेटमध्ये किती प्रकारे Duck हा शब्द वापरला जातो ते पाहूया.

जर एखादा बॅट्समन पहिल्याच बॉलवर आऊट झाला तर त्या विकेटला Golden Duck असे म्हणतात.

जर एखादा बॅट्समन दुसऱ्या बॉलवर आऊट झाला तर त्या विकेटला Silver Duck म्हणतात.

जर एखादा बॅट्समन तिसऱ्या बॉलवर आऊट झाला तर त्या विकेटला Bronze Duck म्हणतात.

समजा एखादा बॅट्समन एकाही बॉलचा सामना न करता नॉन स्ट्राइकर एंड वर रन आऊट झाला किंवा बॅटिंगला आला आणि वाइड बॉल पवर स्टंप्ड आऊट झाला तर त्या विकेटला Diamond Duck म्हणतात.

जर एखादा बॅट्समन मॅच सुरु झाल्यावर पहिल्याच बॉलला आऊट झाला तर त्या विकेटला Palladium Duck म्हणतात.

 

duck-wicket-marathipizza02

 

Duck म्हणजे काय तर बदक! हा बदक राहतो पाण्यात आणि क्रिकेट खेळतात जमिनीवर मग हा बदक क्रिकेटमध्ये आला कुठून?

यामागचं उत्तर असं आहे की, ० अर्थात Zero हे बदकाच्या अंड्याच्या आकारासारखं दिसतं. म्हणून गमतीने Zero ला Duck म्हटले जाऊ लागले, एकप्रकारे हा शब्द शून्यावर आऊट होणाऱ्या बॅट्समनला चिडवण्यासाठी वापरला जात असे. पुढे पुढे तो मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात आला.

पूर्वी मॅच सुरु झाल्यावर पहिल्याच बॉलला एखादा बॅट्समन आऊट झाला तर त्या विकेटला Duck’s Egg Out असे म्हटले जायचे. कालांतराने तो शब्द संक्षिप्त होऊन केवळ Duck हा शब्द वापरात येऊ लागला.

 

hatching-ducklings-marathipizza

 

काय कळली का या बदकामागची गंमत? अहो मग हा लेख शेअर करा आणि इतरांनाही सांगा की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?