'स्टार खेळाडूंचं IPL मधलं पहिलं मानधन... चौथ्या खेळाडूची कमाई ऐकून चक्रावून जाल!

स्टार खेळाडूंचं IPL मधलं पहिलं मानधन… चौथ्या खेळाडूची कमाई ऐकून चक्रावून जाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली. एक तपाहून अधिक काळ होऊन गेला तरीही या स्पर्धेची जादू कमी झालेली नाही. उलट ती अधिकाधिक वाढतच चालली आहे.

IPL या अक्षरांचा फुलफॉर्म INCREDIBLE PREMIER LEAGUE असा होतो, असंही गमतीने म्हटलं जाऊ लागलं. या स्पर्धेची क्रेझ कमी झाली नाही आणि ती कमी होण्याची शक्यताही नाही.

भारत म्हणजेच क्रिकेट… भारतीयांच्या रक्तात क्रिकेट आहे असं म्हणणं अजिबात चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच उद्या होणार असलेल्या आयपीएल लिलावाची सध्या तुफान चर्चा सुरु आहे.

 

ipl auction inmarathi

 

तसं पाहायला गेलं, तर IPL म्हणजे ‘इंडियन “पैसा” लीग’ असा फुलफॉर्म सुद्धा अगदीच उचित आहे.

खेळाडू मालामाल होण्याच्या अनेक बातम्या या लिलावाच्या निमित्ताने वाचायला आणि ऐकायला मिळतात. यंदाच्या लिलावाच्या दृष्टीने २ मुद्दे फारच चर्चेत असल्याचं दिसून आलंय. एक म्हणजे श्रीशांतने आयपीएल लिलावासाठी अर्ज भरणं, त्याला न मिळालेली मान्यता आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ‘क्रिकेटचं दैवत’ मानलं जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा लिलावात झालेला सहभाग!

अर्जुन पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याच्यावर किती बोली लागणार याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. गल्ली गल्ली मधले ‘क्रिकेट तज्ज्ञ’ याविषयावर आपली मतं मांडत आहेत.

हे ही वाचा – रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये!

अर्जुनची लिलावात निवड करण्यात आली, तर आयपीएलमधील खेळाडू म्हणून अर्जुनची ही पहिली कमाई ठरेल. याच निमित्ताने नाक्यावरच्या गप्पांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसमधल्या लंच आणि टी-ब्रेकमध्ये आणखी एका विषयाची जोरदार चर्चा आहे. ‘आज क्रिकेट जगतात गाजत असलेल्या आणि बक्कळ पैसे मिळवणाऱ्या खेळाडूंची आयपीएल स्पर्धेतील पहिली कमाई किती होती?’ असा प्रश्न अनेकांना पडलाय.

 

rohit virat dhoni inmarathi

 

अशाच काही स्टार खेळाडूंची पहिली आयपीएल कमाई किती होती, ते आज जाणून घेऊयात.

१. महेंद्र सिंग धोनी

पहिल्या आयपीएलचा लिलाव झाला त्यावेळी एम. एस. धोनी हे नाव तुफान चर्चेत होतं. २-४ अनुभवी खेळाडू सोडले, तर इतर नव्या खेळाडूंना हाताशी घेऊन त्याने पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

या नव्याकोऱ्या कप्तानाला आपल्या गोटात घेण्यासाठी सगळेच जण जोर लावणार होते. म्हणूनच ६ कोटी रुपये अशी भलीमोठी रक्कम मिळवत माही सर्वांत महागडा खेळाडू ठरला.

पहिल्याच आयपीएल लिलावात कोट्यधीश झालेल्या माहीने नंतर क्रिकेट जगतात त्याचा डंका वाजवलेला आपण पाहिलाच आहे. हा महारथी आज १५ कोटी रुपये इतके अमाप मानधन मिळवतो.

 

m s dhoni ipl inmarathi

 

२. हार्दिक पंड्या

दिसायला किडकिडीत असला तरी लंबेचौडे षटकार ठोकण्यात या पठ्ठ्याचा हात कुणीही धरू शकत नाही. हा अष्टपैलू आज मुंबई इंडियन्सच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याला संघात कायम ठेवण्याचा घाट दर लिलावाआधी घातला जातो.

 

hardik pandya inmarathi

 

आज हार्दिकचं मानधन ११ कोटी इतकं झालेलं आहे. ६ वर्षांपूर्वी आयपीएल लिलावात पहिल्यांदा सहभागी झालेल्या हार्दिकला मुंबईच्या संघाने अवघ्या १० लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.

आज उत्तम कामगिरी आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्याची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

३. सुरेश रैना

आयपीएलचा विषय आला, म्हणजे सुरेश रैना हे नाव आलंच पाहिजे असा जणू अलिखित नियमच आहे. रैना बराच काळ भारतीय संघाचा एक महत्त्वाचा स्तंभ होता. अशा खेळाडूसाठी मोठी बोली लागणं हे तसं फार आश्चर्याचं नव्हतंच.

त्याला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटने जंग जंग पछाडलं. याचाच परिणाम म्हंणून की काय, तर सुरेश रैना सुद्धा आयपीएलमध्ये कोट्यधीश झाला. त्याला पहिले मानधन म्हणून २.६ करोड अशी घसघशीत रक्कम मिळाली होती.

 

suresh raina inmarathi

 

४. विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार आणि अफलातून खेळाडू म्हणून विराट आज सुप्रसिद्ध आहे. त्याच्यावर आज पैशांचा पाऊस पडतो असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये.

एका जाहिरात कंपनीने त्याच्याशी १०० कोटींचा करार सुद्धा केला आहे. यावरून झालेली मोठी चर्चा तर आपल्याला ठाऊक आहेच.

अशा या ‘श्रीमंत’ खेळाडूला आयपीएलमधील पहिलं मानधन म्हणून अवघी १२ लाख अशी रक्कम मिळाली होती. बंगलोरच्या त्या संघामधून त्याला खेळायची संधी सुद्धा फार मिळाली नव्हती.

 

virat kohli young inmarathi

 

५. रोहित शर्मा

आयपीएलचा पहिला लिलाव झाला त्यावेळी रोहित शर्मा  हे नाव भारतीय संघाच्या यादीत समाविष्ट झालं होतं. रोहितचं पदार्पण झालं होतं. विराट कोहली हे भारताचं उज्वल भविष्य आहे असं अनेकांना वाटत असेलही, पण त्याला संधी मिळाली नव्हती हे खरं!

याउलट रोहित शर्मा भारतीय टी-२० संघाकडून विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. त्याकाळात या दोघांमध्ये असलेला हा फरक त्यांच्या मानधनातून सुद्धा दिसून आला आहे. विराटला अवघ्या १२ लाखांवर समाधान मानावं लागलं होतं, तर रोहित शर्माला पहिलं मानधन म्हणून तब्बल ३ कोटी रुपये मिळाले होते.

 

rohit sharma 2007 inmarathi

===

हे ही वाचा – एक-दोन नव्हे, तर ५ पेक्षा अधिक संघांकडून खेळले आहेत हे ५ IPL खेळाडू!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?