' 'मामी जोमात, ट्रोलर्स कोमात' : अमृता फडणवीसांचं ट्रोलर्सना खुलं आव्हान

‘मामी जोमात, ट्रोलर्स कोमात’ : अमृता फडणवीसांचं ट्रोलर्सना खुलं आव्हान

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘ये नयन डरे डरे’ हे शब्द ऐकले नाहीत असा माणूस सापडणं तसं दुर्मिळच. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाइन डे’ पासूनच या शब्दांनी तुमच्या मोबाईलमध्ये शिरकाव केला असेल.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवंकोरं गाणं या दिवशी रिलीज झालं आणि ट्रोलर्सच्या क्रिएटिव्हिटीला चांगलंच खाद्य मिळालं.

 

amruta fadanvis inmarathi

 

काहींनी या गाण्याचं कौतुक करत मिसेस फडणवीसांची पाठ थोपटली असली तरी या गाण्याला ट्रोल करणाऱ्यांची यादी मात्र त्याहूनही मोठी आहे.

 


अमिताभ बच्चन यांनी मात्र अमृता फडणवीस यांच्या गाण्याला शुभेच्छा देणारं ट्विट केल्यापासून हे गाणं चर्चेत आलं होतं.

 

big b inmarathi

 

ये नयन डरे डरे असे शब्द असणाऱ्या या गाण्यांतून माजी मिसेस मुख्यमंत्र्यांनी प्रेमाचा संदेश दिला. मात्र टोलर्सनी त्यांच्या वेशभुषेसह गाण्याच्या शब्दांपर्यंत अनेक बाबींचा समाचार घेतला.

काहींनी मीम्स तयार केले तर काहींनी व्हिडिओंच्या माध्यामातून या गाण्याची चेष्टा केली.

मात्र ट्रोलर्सना घाबरल्या तर त्या सौभाग्यवती फडणवीस कसल्या! कधी आपली गाणी तर कधी वादग्रस्त व्यक्तव्य… वेगवेगळ्या कृतींतून ट्रोलर्सना सामोरं जाणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता मात्र ट्रोलर्सना खुलं आव्हान दिलं आहे.

 

amruta song inmarathi

 

नेटकऱ्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर लाडक्या ‘मामी’नी पुन्हा नव्या गाण्याची घोषणा करत पतीदेवांप्रमाणेच ‘मी पुन्हा येईन’ चा नारा दिलाय.

झालं असं की, १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या गाण्यावर ट्रोलर्सनी चांगलीच टिका केली, मात्र टिकेची वाफ थंड झाली नसतानाही अमृता फडणवीस यांनी आपलं नवं गाणं येत असल्याचं सांगितलंय.

अर्थात यावेळी ही घोषणा करताना, “तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय” असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सना इशारा दिलाय.

१४ फेब्रुवारी ला रिलीज झालेल्या गाण्याला एक महिनाही पुर्ण झाला नसताना ८ मार्च रोजी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं येणार असल्याचं त्यांनी खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

८ मार्च रोजी असलेल्याा महिलादिनी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं येणार असल्याचं त्यांनी सांंगितल आहे. 

यापुर्वीही ‘तिला जगु द्या’ या त्यांच्या गाण्यावरही चांगलंच ट्रोलिंग झालं होतं.

 

 

स्त्री भ्रुणहत्येबाबात भाष्य करणा-या या गाण्याचं काहींनी कौतुक केलं होतं तर काहींनी त्यावर टिकास्त्र सोडलं होतं.

 

amruta inmarathi

 

आता हे नवं गाणं कोणत्या प्रकारात असणार? या गाण्यासाठी फडणवीस वहिनी कोणत्या नव्या अवतारात दाखल होणार? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना मनात आहेत.

मात्र या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी ८ मार्च पर्यंत वाट पहावी लागणार हे नक्की.

अर्थात ८ मार्चपर्यंत ट्रोलर्सना खाद्य म्हणून अमृता फडणवीस यांची नव्या गाण्याची घोषणा आणि त्यातून ट्रोलर्सना दिलेलं आव्हान हेच पुरेसं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?