' दिग्दर्शकाची प्रियंकाकडे अंतर्वस्त्र दाखवण्याची मागणी - बॉलिवूडचा दबंग आला धावून

दिग्दर्शकाची प्रियंकाकडे अंतर्वस्त्र दाखवण्याची मागणी – बॉलिवूडचा दबंग आला धावून

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

झगमगत्या चंदेरी दुनियेमागील भयावह, क्रूर चेहरा आता काही प्रेक्षकांसाठी नवा राहिलेला नाही. दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार अशा वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्तींकडून होणारी पिळवणूक, अपमानास्पद वागणूक यांपासून ते थेट शारिरीक संबंधांची मागणी, केेला जाणारा छळ या गोष्टींचा पदार्फाश यापुर्वी अनेकवेळा झाला आहे.

कधी ‘me too’ चळवळीच्या माध्यामातून अभिनेत्रींनी अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तर कधी अनेक वर्षांपुर्वी झालेल्या अत्याचाराची आठवण काढून कालाकारांनी आसवं गाळली.

 

me too inmarathi

 

बॉलिवूडच्या देसी गर्लनेही तिच्यावर ओढवलेल्या अशाच एका भयावह परिस्थितीचा खुलासा नुकताच केला आहे.

९ फेब्रुवारी रोजी पिगी चॉप्सच्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकातून प्रियंकाच्या आयुष्यातील अनेक चांगल्या, वाईट आठवणींना तिने उजाळा दिला असला तरी त्यातील एका प्रसंगाची मात्र सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

===

हे ही वाचा स्पृहा जोशीचा हा अनुभव मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे!

===

priyanka chopra inmarathi

 

प्रियंकाच्या करिअरच्या सुरवातीच्या काही वर्षांपुर्वीचा हा प्रसंंग प्रियंकाने पुस्तकात मांडला आहे. हा प्रसंग वाचताना आजही तुमच्या अंगावर काटा येईल.

एका हिंदी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घडलेला हा प्रसंग. चित्रपट आणि दिग्दर्शकाचे नाव मात्र तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे.

चित्रपटातील एका आयटम सॉंगसाठी प्रियंकाला अंगावरील एक-एक कपडे उतरवायचे होते. सुरुवातीला काहीशा अवघडलेल्या प्रियंकाने त्यावर उपाय म्हणून अंगावर अतिरिक्त कपडे अर्थात बॉडी सुट घालण्याची कल्पना मांडली.

यामुळे दिग्दर्शकाच्या कल्पनेनुसार गाण्यात अंगावरील एक एक वस्त्रही काढल्याचे दिसेल आणि त्याचवेळी कॅमे-यासमोर आपली लाजही राखली जाईल या विचाराने प्रियंकाने हा मुद्दा दिग्दर्शकासमोर मांडला होता.

त्यावर दिग्दर्शकाने तिला तिच्या कॉश्च्युम डिझायनरशी चर्चा करण्यास सांगितले. प्रियंका तिच्या डिझायनरशी बोलत असतानाच दिग्दर्शकाने नवा फतवा काढला.

प्रियंकाना पुस्तकात लिहीले आहे की, दिग्दर्शक म्हणाले, त्वचा झाकण्यासाठी बॉडी लेअरचा वापर केेला तरी गाण्यात तुझी अंर्तवस्त्रं दिसायलाच हवीत. अन्यथा प्रेक्षक सिनेमा पहायला येणार नाहीत, आणि त्यांना सिनमा आवडणार देखील नाही.

हे वाक्य ऐकताच प्रियंकाच्या पायाखालची जमीन सरकली. यावेळी तिने दिग्दर्शकाला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला, आपली नाराजी आणि नकारही तिने स्पष्टपणे व्यक्त करत तिने ऐनवेळी शुटिंग सोडून जाण्याची धमकीही दिली, मात्र दिग्दर्शक ऐकण्यास तयार नव्हता.

 

priyanka crying inmarathi

 

‘हिरॉईनची अंतर्वस्त्र दिसल्याशिवाय प्रेक्षक चित्रपट पाहणार नाहीत’ या एकाच मतावर तो ठाम असल्याचं प्रियंकाने आपल्या अनुभवात सांगितलं आहे.

अखेरिस संतापलेल्या प्रियंकाने दुसऱ्याच दिवशी चित्रपटाला राम राम ठोकला. मात्र तिचा हा निर्णय दिग्दर्शकाच्या अंगाशी आला, त्याच चांगलंच नुकसान झालं.

त्यानंतर काही दिवसाने प्रियंकाच्या दुस-या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना नुकसान झालेल्या चित्रपटाचे निर्माते रागात प्रियंकाला भेटायला आले. दिग्दर्शकाच्या चुकांवर पांघरूण घालत त्यांनी प्रियंकाशीच वाद घालण्यास सुरुवात केली.

यावेळी सेटवर सुरु असलेल्या या वादामुळे नवखी प्रियंका घाबरली, मात्र तिच्या रक्षणासाठी बॉलिवूडचा ‘दबंग’ धावून आला.

===

हे ही वाचा “मला छातीचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं होतं”: दीपिकाचा धक्कादायक गौप्यस्फोट

===

ज्या चित्रपटाच्या सेटवर हा राडा सुरु होता, त्या चित्रपटात सलमान खानही भुमिका करत होता. आपली सहकलाकार प्रियंकाशी वाद घालणाऱ्या या निर्मात्याची सलमानशी चांगली ओळख होती. अखेरिस सलमान खानने त्यांच्याशी मध्यस्ती केली, प्रियंकाची बाजू समजावून सांगितली, आणि तो वाद काही मिनिटात मिटवला.

 

salman priyanka inmarathi

 

सलमान खानने वेळीच मदत केली नसती कर करिअरच्या सुरवातीच्या काळातच या वादामुळे अनेक चांगले चित्रपट माझ्या हातून निसटले असते असेही प्रियंकाने पुस्तकात लिहीले आहे.

या प्रसंगावरून बॉलवूडमध्ये नशिब आजमावण्यासाठी येणाऱ्या प्रामाणिक कलाकारांना कोणकोणत्या दिव्यांतून जावं लागतं हे समजतंच. आणि मुख्थत: लॉबिंग करणाऱ्या बड्या दिग्दर्शकांसह निर्मात्यांचा निगरगट्ट स्वभावही अधोरेखित होतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?