' शेतकरी आंदोलनाचं खलिस्तानी कनेक्शन : ‘टुलकिट’ मागचा छुपा दहशतवाद! – InMarathi

शेतकरी आंदोलनाचं खलिस्तानी कनेक्शन : ‘टुलकिट’ मागचा छुपा दहशतवाद!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सध्या भारतासह बाहेरच्या देशातसुद्धा एकच विषय सर्वात जास्त चर्चिला जातोय तो म्हणजे शेतकरी आंदोलन आणि त्यावरून उभा राहिलेला वाद. या आंदोलनामुळे देशातले सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

२६ जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या परिसरात घडलेला प्रसंग आणि असे कित्येक प्रसंग आपण कित्येक दिवसांपासून आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत.

समाजातला एक सर्वात मोठा भाग हा या आंदोलनाच्या विरोधात आहे तर एक भाग हा शेतकऱ्यांचे समर्थन करतोय. काही लोकांचं म्हणणं असं आहे की हे सगळे मेहनती शेतकरी आहेत तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की यातले बरेचसे लोक खलिस्तानी आहेत.

 

farmer protest inmarathi

 

सामान्य लोकच नव्हे तर देशातले मोठमोठे सेलिब्रिटीज या सगळ्या प्रसंगावर व्यक्त होत आहेत. बॉलिवूडच्या बऱ्याच सेलिब्रिटीजनी शेतकऱ्यांच्या बाजूने स्टँड घेतला असून कृषिकायद्या विरोधात आणि सरकार विरोधात त्यांनी वक्तव्यं केली आहेत.

प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा पासून मिया खलिफा, रिहाना सारख्या कित्येक मोठमोठ्या लोकांनी यावर त्यांची मतं मांडली आणि बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध सुद्धा दर्शवला आहे.

या अशाच गोंधळात आणखीन एका प्रकरणाने डोकं वर काढलं आहे ते म्हणजे ‘टुलकिट’ प्रकरण. या प्रकरणाअंतर्गत दिल्ली पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून मुंबईच्या निकिता जेकब आणि बेंगलोरच्या दिशा रवी या दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दिल्ली पोलिसांनी नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना याविषयी माहिती दिली आहे आणि या टुलकिटचं खलिस्तानी कनेक्शन असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं आहे,  आणि हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे!

पण हे नेमकं टुलकिट प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया?

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक गुगल डॉक्युमेंट फाइल शेयर केली आहे जीला टुलकिट असं म्हंटलं जातंय.

 

toolkit inmarathi

 

या टुलकिट मध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या आंदोलनांची माहिती दिली जाते शिवाय यात तुम्ही त्या आंदोलनाला समर्थन देताय की नाही इथपासून तुमची वैयक्तिक मतं मांडू शकता शिवाय तुम्ही टी फाइल एडिट करून नवीन माहिती सुद्धा त्यात भरू शकता.

अमेरिकेतील ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाच्या वेळेस या टुलकिटचा वापर केला गेला त्यावेळी हे माध्यम चर्चेत आले. जगभरातल्या आंदोलनकर्त्यांना जोडणं, त्यांना चिथवणं आणि कोणत्याही आंदोलनाला आपल्याला हवी तशी हवा देणं हे काम हे टुलकिट करत आहे.

या टुलकिट मध्ये भारतातील शेतकरी आंदोलन कशाप्रकारे आखलं गेलं, त्यासाठी कशाप्रकारे लोकांचा सपोर्ट घेतला गेला, कोणती हॅशटॅग वापरली गेली, शिवाय सरकारी कारवाईपासून कसा बचाव करता येईल याची माहिती या टुलकिटच्या माध्यमातून देण्यात आली.

हा सगळं समोर आल्यानंतर ग्रेटा ने ते टुलकिट डिलिटसुद्धा केलं, शिवाय हे टुलकिट तयार करण्यामागे खलिस्तानवादी समर्थकांचा हात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे.

याचसंदर्भात दिशा रवी हिला पोलिसांनी अटक करून तिच्यावर देशात आशांतता पसरवण्याच्या गुन्हा दाखल केला आहे. खलिस्तानवादी समर्थक संघटना जस्टीस फाउंडेशनसाठी दिशा रवी काम करते.

बेंगलोर येथे शिक्षण घेणारी, पर्यावरण चळवळीत सक्रिय असलेल्या दिशा रवीनेच ही टुलकिट बरीचशी एडिट केली असून ती ग्रेटा थनबर्गला शेयर केल्याचं सांगितलं जात आहे.

 

disha ravi inmarathi

 

एकंदरच हे टुलकिट प्रकरण या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अंगाशी येणार आहे असंच दिसत आहे. हे टुलकिट म्हणजे डिजिटल दहशतवादच आहे. तुम्ही तुमच्या घरात बसून केवळ इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्या देशात होणाऱ्या चळवळींची दिशा बदलू शकता हा एक प्रकारचा दहशतवादच झाला नाही का?

याबाबत आता दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिस आणखीन कसून चौकशी करत असून याचे धागेदोरे शोधायचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

इतक्या गंभीर गुन्ह्याखाली दिशाला अटक झालेली असूनसुद्धा आपल्या देशातले सॉ कॉल्ड बुद्धिजीवी सेलिब्रिटीज तिच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत आणि आपल्या देशातल्या सिस्टिमलाच नावं ठेवत आहेत.

कपिल सिब्बल, पी चिदंबरम, राहुल गांधी अशा कॉँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनीसुद्धा तीच्या समर्थनार्थ ट्विट केली आहेत. शिवाय प्रकाश राज, स्वरा भास्कर अशा कित्येक डाव्या लोकांनी सुद्धा याविषयी भाष्य केलं आहे!

साऊथचा अभिनेता सिद्धार्थ ज्याला आपण रंग दे बसंती सारख्या सिनेमातून पाहिलं आहे त्याने तर या सरकारला फॅसिस्ट सरकार म्हणून जाहीरपणे नावं ठेवली आहेत.

 

siddharth inmarathi

 

हे सगळं कीती भयानक आहे याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आज इंटरनेटच्या मध्यामातून आपण साऱ्या जगाशी जोडले गेलो आहोत पण आज हे टुलकिट प्रकरण कीती महागात पडू शकतं याचा आपण अंदाजसुद्धा लावू शकत नाही.

आणि याहून आणखीन भयानक म्हणजे या छुप्या दहशतवादाच्या समर्थनार्थ उभे राहणारे हे लोकप्रिय सेलिब्रिटीज. हा सगळा प्रकार खरंच विनाशाकडे जाणारा असून आपल्या देशाला आतून पोखरणारा आहे. याविरोधात वेळीच आपण सगळ्यांनी भाष्य करायलाच हवे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?