' 'विमा' असा कुठला शब्दच अस्तित्वात नाही! असं आहे या विम्याचं मराठी कनेक्शन...

‘विमा’ असा कुठला शब्दच अस्तित्वात नाही! असं आहे या विम्याचं मराठी कनेक्शन…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘काय रे पॉलिसी काढतोस ना? गुंतवणूक करत जा पुढे कामी येईल’ अशी वाक्य माणूस कमवायला लागला की त्याच्या कानावर पडतात.

आजच्या काळात अगदी साध्या दातांपासून ते संपूर्ण आयुष्यापर्यंत, आणि मोबाईलपासून ते थेट अवजड उद्योगातील अवजड अशी यंत्रे ह्यासारख्यांचे अनेक विमा प्रकार उतरवले जातात.

विम्याचे अनेक प्रकारही आपल्याकडे अस्तित्वात आहेत, आपल्याला हवा त्या प्रकारात आपण विमा उतरवून घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे विमा काढणे म्हणजे काय, तर आपल्यालाला होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करणे.

नुकतेच बजेट घोषित झाल्यानंतर त्यात एक महत्वाचा मुद्दा होता म्हणजे की LIC चे IPO येणार आहेत. म्हणजे सरकारच्या मालकीचे जे शेअर असतील ते आता थेट मार्केटमध्ये विकले जाणार.

 

LIC inmarathi 2

 

‘जिंदगी कें साथ भी और जिंदगी कें बाद भी’ असं म्हणणाऱ्या LIC चा विमा लोक डोळे झाकून घेतात, कारण या संस्थेवर लोकांचा विश्वास आहे.

बाजारात अनेक कंपनी विमा पोलिसी विकतात. त्यासाठी प्रचंड खर्चही करतात. आज लोकांना भरपूर पर्याय असूनदेखील समाजातील अनेकजण फक्त LIC चा विमा घेतात. ह्यामागचे कारण म्हणजे पैशांचा शंभर टक्के परतावा मिळणार.

जीवन विमा हा शब्द याच LIC मुळे आपण अनेकवेळा ऐकलेला आणि वाचलेला आहे. मात्र, ‘विमा’ असा कुठलाही शब्दच अस्तित्वात नाही, असं जर तुम्हाला सांगितलं तर?

‘विमा’ हा कुठलाही शब्द नसून, विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात WIMA या नावाने भारतात उदयास आलेल्या कंपनीमुळे हा शब्द निर्माण झालेला आहे. वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी’ या नावाने ही प्रसिद्ध होती. याच कंपनीचे जुने नाव ‘Western India Mutual Assurance’ असे होते. ज्याचे संक्षिप्त रूप, WIMA असे असल्याने हा शब्द अस्तित्वात आला.

या कंपनीचे सर्वेसर्वा असलेले अण्णासाहेब चिरमुले ही मराठी व्यक्ती होती. वीर सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्दांची देणगी दिली, तसं विमा हा शब्द मराठी भाषेला द्यायचं श्रेय अण्णासाहेब चिरमुले यांना जायला हवं.

विमा या मराठी शब्दाचं, पुढे हिंदीत जाऊन ‘बीमा’ असं नवं नामकरण झालं. त्यामुळे बीमा हा शब्द सुद्धा अस्तित्वात आला.

 

annasaheb-chirmule-inmarathi

 

कोण होते अण्णासाहेब?

युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक म्हणून आपल्याला परिचित असलेले अण्णासाहेब हे, चक्क ५ कन्यांचे पिता होते. होय, त्यांनी नावारूपाला आणलेल्या ५ संस्थांना ते ‘पंचकन्या’ असं म्हणत असत…

अण्णासाहेब चिरमुले यांचा जन्म ४ जून १८६४ या दिवशी झाला. हाच माणूस पुढे विमामहर्षी म्हणून नावारूपाला येईल, हे मात्र त्यावेळी कुणाला माहित नव्हतं.

इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांचे ते पदवीधर होते. त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास खूप दांडगा होता. अमेरिकेतील पुस्तकांचा अभ्यास करून त्यांनी विम्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेतल्या.

हे ही वाचा – ही काळजी न घेता इन्शुरन्स घेण्याचा विचार करत असाल, तर ती तुमची सर्वात मोठी चुक ठरु शकेल

बँकांच्या नावांमध्ये सांगली बँक, मिरज बँक, बेळगाव बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशी गावांची नावं किंवा देशाचं नाव त्याकाळात गाजत होतं. त्यावेळी ‘वेस्टर्न’ अर्थात पाश्चिमात्य हा शब्द कंपनीच्या नावांमध्ये घेण्याचं वेगळेपण त्यांनी दाखवलं.

असं असलं, तरी या कंपनीची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विम्यासाठी बहुतांश ब्रिटिश कंपन्या अस्तित्वात असताना निर्माण झालेली अशी ही स्वदेशी कंपनी ठरते!

हा माणूस द्रष्टा होता. आजही पाणी, वीज, किंवा इतर अनेक समस्या असणाऱ्या सातारा या शहरात, त्यांनी १५० वर्षांपूर्वी आर्थिक संस्थांचं एक अप्रतिम जाळं उभारलं होतं.

 

satara-inmarathi

 

याच माणसाने इन्शुरन्सचं महत्त्व अनेकांना पटवून दिलं. विमामहर्षी अशी त्यांची ओळख निर्माण होण्यामध्ये याच गोष्टीचा महत्त्वाचा वाटा आहे.

विम्याचा इतिहास

विम्याचा इतिहास हा अगदी बॅबोलियन संस्कृतीपासून आढळतो. आपल्याकडे ही अनेक जुन्या  ग्रंथांमधून विम्याचा उलेख आढळून आलेला आहे.

पूर्वीच्या काळी भारतात अनेक नैसर्गिक आपत्ती येत असल्याने, लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असे. म्हणून समाजाचे कर्तव्य होते, की त्या परिस्थितीत गरजू व्यक्तीला मदत करावी, जेणेकरून त्याच्या प्राथमिक गरजा भागू शकतील.

युरोपात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर विमा पोलिसी काढणे चालू झाले. इंग्लंडमध्ये प्रथम विमा कंपनी चालू झाल्याचा उल्लेख आढळतो. आपल्याकडे विमा पॉलिसी हा प्रकार युरोपातील कंपन्यांमुळे चालू झाला.

त्यानंतर भारतीय लोक विमा क्षेत्रात आले आणि Bombay mutual, Oriental, Bombay life अशा कंपन्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तार्धारात अस्तित्वात आल्या.

पुढे विसाव्या शतकात united India, general assurance ह्या कंपन्यांची स्थापना झाली. १९५६ साली LIC या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीची स्थापना झाली.

 

united-india-insurance-inmarathi

 

सुरवातीला विमा पॉलिसी ह्या फक्त सरकारी क्षेत्राच्या अधिपत्याखाली होत्या. त्यानंतर मल्होत्रा शिफारीनुसार विमा कायदायत दोन बदल झाले ते म्हणजे विमा क्षेत्रात खाजगी कंपन्या भाग घेऊ शकतात व ह्या क्षेत्राला चालना मिळावी म्हणून IRDA ची स्थापन झाली.

===

हे ही वाचा – “जिंदगी के साथ और बाद भी” असं म्हणणाऱ्या LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?