' डिग्री नाही, फिकर नॉट! नोकरीचे असेही पर्याय...५ वा आणि ९ वा पर्याय माहिती हवाच!

डिग्री नाही, फिकर नॉट! नोकरीचे असेही पर्याय…५ वा आणि ९ वा पर्याय माहिती हवाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही नोकरीसाठी एक शैक्षणिक पात्रता ठरलेली असते. काही नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा असते, तर पोलीस भरतीसारख्या ठिकाणी तुमची शरीरयष्टी, तंदुरुस्ती या गोष्टी आवर्जून बघितल्या जातात.

नोकरी सरकारी असो किंवा खासगी, किमान शैक्षणिक पात्रता म्हणून तुम्ही पदवीधर असणं अपेक्षित असतं. आपण प्रत्येकानेच हे मान्य केलं आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण हे तुमच्यात त्या विषयाच्या ज्ञानासोबतच एक समजूतदारपणा आणि विषयाचा सर्वांगीण बाजूने विचार करण्याची वृत्ती वाढवत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखाद्या क्षेत्रात शैक्षणिक पात्रता बघितली जात नसेल, तर ते क्षेत्र आहे राजकारण!

तुमच्यात संघ बांधणीचं कौशल्य असेल आणि तुम्ही एक चांगले वक्ते असाल, तर तुमचं शिक्षण काहीही असलं तरीही चालेल असं राजकारण हे एकमेव क्षेत्र आहे.

 

gopinath-munde-inmarathi

 

कोणत्याही पदवीशिवाय तुम्ही राजकारणात उच्च पदापर्यंत पोहोचू शकता, हे आपला राजकीय इतिहास सांगतो. असो. त्या क्षेत्राची निराळी अशी आव्हानं आहेत, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे.

आम्ही आज अशी काही खासगी क्षेत्र सांगणार आहोत, ज्या क्षेत्रात तुम्हाला मनासारखं काम, पगार मिळवण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. होय, अशी क्षेत्र आजही आहेत जिथे फक्त तुमच्या कामाच्या कौशल्यावर तुम्हाला कामाचा मोबदला दिला जातो.

त्याक्षेत्रातील शिक्षण तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात अधिक प्रगती करू शकता हेही तितकंच खरं, पण काम सुरू करण्यासाठी या क्षेत्रात कोणतीही शैक्षणिक अट नाहीये. कोणत्या आहेत या नोकऱ्या? जाणून घेऊयात:

१. इव्हेंट मॅनेजमेंटमधील नोकरी:

लग्न समारंभ, कौंटुंबिक सोहळे हे सगळं भारतात वर्षभर सुरू असतं. प्रत्येकाकडे सगळी कामं स्वतः करण्यासाठी वेळ नाहीये आणि मनुष्यबळ सुद्धा नाहीये. इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात कित्येक संस्था सध्या कार्यरत आहेत.

 

marriage inmarathi

 

या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती फक्त व्यवस्थित राहण्याची, व्यवस्थित बोलता येण्याची आणि सजावटीची आवड असण्याची. या गोष्टी कोणत्याही शिक्षणापेक्षा जर तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतील तर या क्षेत्रात तुम्हाला नोकरी नक्कीच मिळू शकते.

२. सोशल मीडिया मॅनेजर:

ज्या सोशल मीडियावर फक्त वेळ वाया जातो अशी सुरुवातीला लोकांची धारणा होती, तो सोशल मीडिया आता एक उत्तम नोकरीची संधी बनला आहे.

 

social-media-inmarathi

 

तुम्हाला जर का लोकांची आवड ओळखता आली, तुमच्यात ग्राफिक्स, लिखाण किंवा फोटोग्राफीसारखे एखादे टॅलेंट असेल तर कित्येक कंपन्यांच्या सोशल मीडिया विंगमध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते.

इन्स्टाग्राम, फेसबुकची वाढती लोकप्रियता ही सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी लोक असणे हे प्रत्येक कंपनीला आवश्यक वाटत आहे.

३. चित्रकार:

चित्रकला म्हणजे फक्त शाळेत शिक्षकांकडून शिकणे किंवा स्वतः चित्र काढून प्रदर्शनात विकणे हेच आपल्याला माहीत असतं.

 

painting-exhibition-inmarathi

 

आज कित्येक कंपन्यांना सोशल मीडियावर सतत दिसत राहण्यासाठी छोट्या चित्रकथेची आवश्यकता असते. तुमच्या अंगात अशी कोणती कला असेल तर कोणत्याही ब्रँड सोबत जोडलं जाणं हे सध्या अवघड नाहीये.

त्यासाठी तुम्हाला कोणत्याही डिग्रीची मागणी केली जात नाही. तुमच्या कलेला वाव सुद्धा मिळतो आणि तुम्हाला त्याचा योग्य मोबदला सुद्धा मिळतो.

४. वेबसाईट डेव्हलपर्स:

इंटरनेटचा सतत वाढणारा वापर हा प्रत्येक कंपनीला त्यांची वेबसाईट कशी असावी आणि कशी असू नये हे शिकवत आहे. वेबसाईट तयार करण्यासाठी लागणारी बरीच माहिती ही युट्युबवर मोफत उपलब्ध आहे.

तुम्ही काही नमुना वेबसाईट टेम्प्लेट तयार करून वेबसाईट डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपनीत नोकरी नक्कीच मिळवू शकतात. भारतात सध्या सुरु असलेल्या ‘स्टार्टअप’ मोहिमेमुळे या क्षेत्रात खूप नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

 

web-developer-inmarathi

 

५. भाषांतरकार (Translator):

इंग्रजी ही जरी व्यवसायाची प्रमुख भाषा असली, तरीही सध्या प्रत्येक व्यक्तीला कोणताही कंटेंट हा त्याच्या भाषेत सादर करण्याकडे सर्वांचा कल आहे. जर तुमचं कोणत्याही दोन-तीन भाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्हाला भाषांतरकार म्हणून नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.

कोणतीही नवीन भाषा शिकणं सुद्धा सध्या इंटरनेटमुळे सहज शक्य झालं आहे.

 

internet-speed-inmarathi

 

सध्या ज्या भाषेची सर्वात जास्त मागणी आहे याचा अभ्यास करून तुम्ही भाषांतरकार ही नोकरी मिळवू शकतात. यासाठी कोणत्याही इतर पदवीची गरज नसते.

६. रियल इस्टेट एजंट्स:

घर बांधणाऱ्यांना ते विकायचं कसं? हे बऱ्याच वेळेस माहीत नसतं. तुमच्यात जर का कोणतीही वस्तू विकण्याची कला असेल तर सध्या तुम्हाला खूप मागणी आहे.

विक्री कला ही कोणत्याही पुस्तकापेक्षा तुमच्या स्वभावातून तुम्हाला यश देत असते. आज बारावी पास असलेली मुलं देखील प्रॉपर्टी विकणे, भाड्याने देणे असे काम करून स्वतःच्या पायावर उभी आहेत. घराची गरज आणि घर घेतांना लक्षात घ्यायच्या गोष्टी हे लक्षात आलं तर तुम्ही या क्षेत्रात नक्कीच काम करू शकतात.

 

real-estate-jobs-inmarathi

 

७. केटरिंग:

तुम्हाला स्वयपाक करण्याची किंवा लोकांना वाढण्याची आवड असेल, तर तुम्हाला कोणत्याही केटरिंग फर्ममध्ये काम मिळू शकतं. कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही शिक्षण पूर्ण करू शकला नाहीत, तर हा पर्याय तुमच्यासाठी कायम उपलब्ध आहे. कित्येक केटरिंग फर्म या सध्या प्रत्येक शहरात कार्यालयासाठी किंवा मोठ्या कंपन्यांसाठी कार्यरत आहेत.

 

buffay-inmarathi

 

८. पॅकर्स:

आजकाल कोणत्याही गोष्टीचं महत्व हे तिच्या पॅकिंगवर असतं. ऑनलाईन बिझनेसची मागणी वाढल्यापासून पॅकेजिंग करून देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय कित्येक पटीने वाढला आहे.

पॅकेजिंग या क्षेत्रात सध्या नोकरीच्या खूप संधी उपलब्ध आहेत. अशा नोकऱ्यांमध्ये शिक्षणाची कोणतीही अट नसून फक्त कामाची तयारी आवश्यक असते.

 

packaging-job-inmarathi

 

९. बॉडी ट्रेनर:

फिटनेससाठी आणि छान दिसण्यासाठी सध्या सगळेच जागरूक आहेत. ज्यांच्याकडे खूप कामं आहेत आणि भरपूर पैसे आहेत त्यांना जिमला जाण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये.

 

Gym mistakes Feature INMarathi

 

एक वर्ग असा आहे जो घरीच जिम तयार करतो आणि बॉडी ट्रेनरला रोज घरी बोलवून व्यायाम करतो. तुम्हाला जर व्यायामाची आवड असेल तर तुम्ही तुमच्या या छंदाचं नोकरीत रूपांतर करू शकता. स्वतः ट्रेनर बनून किंवा इतर ट्रेनरकडे काम करून लोकांना तुमची सर्विस देऊन उत्पन्न कमावू शकतात.

१०. मेकअप आर्टिस्ट:

भारतीय मनोरंजन क्षेत्र हे सध्या खूप मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. वेबसिरीज, नवीन चॅनल्स, वेगळ्या पद्धतीचे कमी भागाचे छोटी कथा असलेल्या टीव्ही सिरियल्स या सर्वांमुळे जितकी कलाकारांची मागणी वाढली आहे, तितकीच मेकअप आर्टिस्टची सुद्धा मागणी वाढली आहे.

तुम्हाला जर या कामाची आवड आणि थोडा जरी अनुभव असेल तर मेकअप आर्टिस्ट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदवीची गरज पडणार नाही.

 

make-up-artist-inmarathi

 

नोकरी म्हणजे ‘तुमच्या सर्विसेस इतरांना देणं’… पदवीचं शिक्षण हे तुम्हाला फक्त ते काम अजून चांगल्या पद्धतीने कसं करायचं हे शिकवत असतं.

तुमच्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीला जर पदवीचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही आणि सध्या जर तो नोकरीच्या शोधात असेल, तर ही माहिती त्याच्यासोबत नक्की शेअर करा. हीच त्याच्या परिस्थतीतून बाहेर येण्यासाठी त्याला केलेली योग्य मदत असेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?