''बिग बॉस'च्या घरात यंदा मराठमोळ्या राहुलचा 'व्हॅलेन्टाईन डे' होणार स्पेशल?

‘बिग बॉस’च्या घरात यंदा मराठमोळ्या राहुलचा ‘व्हॅलेन्टाईन डे’ होणार स्पेशल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एकमेकांवर केलेले प्रतिवाद, शिव्यांच्या लाखोलीत कायमच धगधगणारं बिगबॉस घर आता या सीझनच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलंय.

सुमारे १३० दिवसांचा मोठा काळ एका बिगबॉसच्या कचाट्यात घालवणा-या सेलिब्रिटींचा धीर आता मात्र सुटू लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय. टास्क असो वा घरातली ‘ड्युटी’ एकमेकांवर अक्षरशः तुटून पडणा-या बीगबॉसवासीयांचं भयावह रुप पाहिलं की घरबसल्या मनोरंजन शोधणारे प्रेक्षकही हादरतात.

 

fight inmarathi

 

अभिनेता अभिनव शुक्लाच्या मागे हात धुऊन लागलेली राखी सावंत आणि तिच्या जाचातून नव-याला सोडवणारी रुबीना दिलेक किंवा एकेमकांच्या बाहुपाशात रमणारे अली- जास्मिन, निकीच्या मागेे धावून थकलेला जान तर ‘वाईल्ड लव्हर’ म्हणून प्रसिद्ध झालेले पवित्रा- एजाज या जोडप्यांनी बिगबॉसच्या घरात यंदा प्रेमाचे अनेक दाखले दिले.

 

love story inmarathi

 

मात्र या सगळ्यांमध्ये मराठमोळा गायक राहुल वैद्य याची लव्हस्टोरी मात्र प्रेक्षकांना जास्त भावली, कारण घराच्या चार भिंतीत अडकलेल्या राहुलने  आपल्या कृतीतून “दुराव्यातून प्रेम वाढतं” हा भन्नाट संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.

गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार या दोघांची लव्हस्टोरी गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच व्हायरल होत असतानाच दुरावा सहन करणा-या या लव्हबर्ड्ससाठी प्रेक्षकही हळहळत होते.

हे ही वाचा – या आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या “कर्तृत्ववान” बायका!

 

disha rahul inmarathi

 

मात्र ‘का रे दुरावा’ म्हणणा-या या जोडप्याचं मीलन व्हावं यासाठी बिगबॉसच्या टिमने एक भन्नाट प्लॅन आखल्याचं समजतंय.

यंदाच्या व्हॅलेंटाईन डे चा मुहुर्त साधून दिशा राहुलच्या भेटीसाठी बिगबॉसच्या घरात जाणार आहे.

प्यारवाली लव्हस्टोरी

गायक राहुल वैद्य याच्या सुरांची जादु अनुभवणा-या प्रेक्षकांनीच बिगबॉसमधील त्याचं आक्रमक रुपही पाहिलं, काहींना ते पसंत पडलं नसलं तरी लाखो ट्विट्स करणा-या राहुल आर्मीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. घरात रंगणा-या रुबीना आणि राहुलमधील वादाचा पडसाद सोशल मिडीयावरही सातत्याने दिसून येत आहेत. मात्र या सर्वांमध्ये बिगबॉसच्या घरात १५० कॅमे-यांची पर्वा न करता दिशाला लग्नाची मागणी घालणारा राहुल प्रेक्षकांना अधिक आवडला.

 

 

झालं असं, की राहुल आणि दिशा यांची मैत्री जुनी असली तरी राहुलने घरात प्रवेश करण्यापुर्वीपर्यंत आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं. मात्र शो सुरु झाल्यानंतर दिशाशी कोणताही संपर्क ठेवण्याची संधी न मिळाल्याने राहुलला प्रेमाची जाणीव झाली. त्यातच दिशाच्या वाढदिवसाचा मुहुर्त साधून राहुलने ऑनकॅमेेराच तिला लग्नाची मागणी घातली.

घरात मर्यादित साधनं असल्याने आपल्या पांढ-या रंगाच्या टि-शर्टवर लिपस्टिकने “will you marry” असं लिहीत राहुलने दिशाला मागणी घातली खरी मात्र त्यानंतर पुढचे अनेेक दिवस दिशाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने केवळ राहुलचीच नव्हे तर संपुर्ण घराची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

 

rahul v inmarathi

 

तोपर्यंत बाहेर सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह झालेल्या दिशाने राहुलच्या प्रत्येक कृतीला समर्थन देत आपल्या प्रेमाची मुकपणे कबुली दिली होती. बिगबॉस होस्ट अभिनता सलमान खाननेही ‘वीकेंड का वार’ च्या एके एपिसोडमध्ये दिशाचं उत्तर कळवलं मात्र त्याखुद्नंतर कुटुंबियांच्या टास्कमध्ये राहुलच्या आईने तर दिशा आणि राहुलच्या नात्यावर शिक्कामोर्तब केेला आणि राहुल फॅन्सचा जीव एकदाचा भांड्यात पडला.

त्यानंतर अनेेकदा राहुलन बिगबॉसकडेे दिशाच्या भेटीची मागणी केली, सध्या सुरु असलेल्या कनेक्शन वीकमध्य दिशा घरात येईल अशा अनेेक चर्चांना उधाण आलं होतं, मात्र दिशाने या सगळ्या प्रस्तावांना नकार देत सोशल मिडीयावरच ती राहुलसाठी खिंड लढवत आहे.

‘व्हेलेन्टाईन्स डे’ ला बहरणार प्रेमाचेे रंग

यंदाचा व्हॅलेन्टाईन्स डे खास असून राहुल आणि दिशाची अखेर भेट घडणार आहे. बिगबॉसतर्फे आखलेल्या या प्लॅनसाठी दिशानीही होकार दिला असून सध्या ती क्वारंटाइन असल्याचं समजतंय.

अर्थात दिशा ही केवळ काही तासांसाठी बिगबॉसच्या घरात प्रवेश करणार असून यावेळी ती फक्त राहुलला भेटणार असल्याचं समजतंय. या दोघांसाठी बिगबॉसच्या टिमने काहीतरी स्पेशल प्लॅन केला असून या दोघांची रोमॅन्टिक डेट सगळ्याच प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

 

rahul dissha inmarathi

हे ही वाचा – लव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज… काय आहे बेस्ट?

दिशा घरात जाण्यापुर्वीपासूनच सोशल मिडीयावर या डेटची उत्सुकता दिसून येत आहे.

आता ही डेट नेमकी कशी असेल? राहुलला हा सुखद धक्का कसा बसेल? दिशासाठी राहुल कोणतं गीत गुणगुणेल? यासाठी रविवारपर्यंत वाट पहावी लागेल.

मात्र अखेरच्या आठवड्यात घरात कंटाळलेल्या राहुलसाठी दिशाची भेट हा मोठा एनर्जी सोर्स ठरू शकेल हे मात्र नक्की.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?