' लॉकडाऊनमधे या वकिलाने आलिया भट, रणबीर कपूर सारख्याना फिटनेस फ्रीक बनवलं

लॉकडाऊनमधे या वकिलाने आलिया भट, रणबीर कपूर सारख्याना फिटनेस फ्रीक बनवलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला फिटनेस उत्तम राहावा यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. त्याबाबतीत आता समाजदेखील अधिक जागरूक झाला आहे. फिटनेस मिळवण्यासाठी लोक निरनिराळ्या पद्धतीचा वापर करतात.

वजन कमी करणे म्हणजेच फिटनेस हा एक गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये आहे. पण फिटनेस म्हणजे वजन कमी करून शारीरिक क्षमता सुद्धा वाढवणे.

फिटनेस मिळविण्यासाठी दररोजच काही प्रयत्न करावे लागतात आणि प्रत्येकाला नियमितपणे हा वेळ देता येईलच असे नाही. म्हणून केवळ थोड्याच दिवसात फिटनेस मिळवता येतो का हे पाहिलं जात आहे.

एखाद्या व्यक्तीची प्रकृती, त्याला असणाऱ्या शारीरिक समस्या, अडचणी लक्षात घेऊन अभ्यासपूर्वक ४० दिवसाचे चॅलेंज घेऊन फिटनेस मिळवण्याचे फंडे येत आहेत.

हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील मागे नाहीत. आलिया भट, कियारा अडवानी या कलाकारांनी देखील हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. फिटनेसचा हा फंडा भारतात लोकप्रिय झालाय तो सोह फिट या ब्रँडमुळे.

 

alia-sohrab-inmarathi

 

इथे फिटनेस ट्रेनिंगसाठी जाणाऱ्या व्यक्तीला २१ दिवसाचे किंवा ४० दिवसाचे फिटनेस चॅलेंज दिले जाते. पहिल्या दिवशी फिटनेस टेस्ट केली जाते. त्यादिवशी ठराविक व्यायामप्रकार किती वेळात आणि किती संख्येने केले जातात हे पाहिलं जातं.

त्यानंतर पुढच्या २१ दिवसाचे किंवा ४० दिवसाचे शेड्युल ठरवले जाते. त्या प्रत्येक दिवशी किती व्यायाम करायचा? कोणता व्यायाम करायचा? कोणतं डाएट पाळायचं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशाप्रकारे आपला दिनक्रम ठेवायचा हे प्रत्येक दिवसाच्या शेड्युलमध्ये लिहिलेले असते.

हे ही वाचा – दिवसांत दोन वेळा, ५५ मिनिटांत पाहिजे ते खा, “दीक्षित-डाएट” बद्दल आयुर्वेद काय म्हणतं?

सकाळी उठल्यानंतर अर्धा तास आणि रात्री झोपायच्या आधी अर्धा तास मोबाईलपासून लांब राहायला सांगितले जाते. दिवसभरात कामातून थोडा थोडा वेळ स्वतःसाठी काढून त्यात आत्मचिंतन करण्याचेही सुचवले जाते.

हे चॅलेंज स्वीकारणाऱ्या व्यक्तींच्या या २१ आणि ४० दिवसातील प्रत्येक कृतीवर लक्ष दिले जाते. चॅलेंजच्या शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशीच्या तुलनेत किती प्रगती झाली आहे हे पाहिले जाते. हे चॅलेंज स्वीकारणाऱ्या व्यक्तींना असा अनुभव आहे की चॅलेंज नंतर त्यांचं वजन कमी झाले आहे तसेच स्टॅमिना वाढला आहे.

बॉलीवूड सेलिब्रिटी आलिया भट आणि कियारा आडवाणी यांनी हे चॅलेंज शो फिट फिटनेस सेंटरमधून पूर्ण केले आहे. आलिया भट्टने चॅलेंज पूर्ण केल्यानंतर रणबीर कपूर कसा मागे राहिलं!! त्याने देखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

 

kiara-advani-inmarathi

 

आता हे ‘शो फिट’ काय आहे? आणि हे कोणी चालू केले, ही मात्र एक आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे. कारण शो फिट चालू करणारा एक वकील आहे त्याचं नाव सोहराब खुश्रुशाही. वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने आपली वकिली सोडली आणि शो फिट सुरू केले.

२०१७ मध्ये शो फिट सुरू झाले. तसे ते व्यवस्थित चालले होते पण त्याला जास्त लोकप्रियता मिळाली ती या कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात. संपूर्ण देशभर लॉकडाऊन झाला. जिम, स्विमिंग पूल तसेच इतरही व्यायाम करता येणाऱ्या गोष्टी बंद झाल्या आणि लोक फिटनेस करता ऑप्शन शोधू लागले.

त्यावेळेस शो फिटने आपलं ४० दिवसांचं चॅलेंज जाहीर केलं ज्यामध्ये दिवसभराचा वर्कआउट आणि न्यूट्रिशियन डाएट काय असावं ते सांगितलं जायचं. झूमवर लोकांना मार्गदर्शन केलं जायचं. लॉकडाऊनमुळे हे चॅलेंज स्वीकारणाऱ्यांची संख्या ४०० वरून एक हजारावर गेली.

सोहराब खुष्रुशाही यांनी जेव्हा वकिली सोडली आणि फिटनेस कोच व्हायचं ठरवलं त्यावेळेस, तो निर्णय म्हणजे अंधारात उडी मारणं होतं. कारण त्यांचा वकिलीचा जम तसा बसला होता. पण तो व्यवसाय त्यांच्या मनाला समाधान देत नव्हता.

वेगळं काहीतरी करण्याची त्यांची लहानपणापासूनच इच्छा होती. एक तर क्रिकेटर व्हायचं किंवा लॉ करायचं, असं त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं. त्यांची आईदेखील वकील असल्यामुळे त्यांना वकिलीची आवड होती. म्हणून मग विधी विभागात पदवी घेऊन ते वकील झाले.

 

Laws Inmarathi

 

वकिली व्यवस्थित चालत होती. सोहराब अमरचंद मंगलदाससारख्या मोठ्या मोठ्या लॉ फर्ममध्ये होता. तसेच सिंगापूरमधील एका लॉ फर्ममध्ये कन्सल्टेशन करायचा. पण तो व्यवसाय त्याला समाधान देत नव्हता.

सोहराब म्हणतो, की तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर कुठलीही बंधने त्यासाठी आड येत नाहीत.

त्याला मनापासून लोकांना फिटनेसबद्दल सांगायला आवडायचं, त्यातून त्याला आनंद मिळतो आणि हे या महामारीच्या काळात तर प्रकर्षाने जाणवले. लोकांना आलेले फ्रस्ट्रेशन, नकारात्मकता, त्यांच्या अपेक्षा याबद्दल त्यांच्याशी बोलणं त्याला शक्य झालं.

सोहराबला प्रशिक्षक बनण्यात जास्त रस आहे. ट्रेनर हा जिममध्ये ठराविक काळात तुमच्याकडून व्यायाम करून घेत असतो. प्रशिक्षक मात्र तुमच्या संपूर्ण दिवसभराचं प्लॅनिंग ठरवून तुमच्याशी बोलून तुमच्या समस्या जाणून त्यावर उत्तर शोधत असतो.

एखाद्या व्यक्तीला फिटनेसबद्दल पूर्णपणे जागरूक करण्यासाठी काय करावं लागेल, याचा सोहराबने पूर्ण अभ्यास केला. त्यासाठी त्याने फिजिकल थेरपिस्ट, फंक्शनल एक्सरसाईज कोच, मुहमेंट ट्रेनर या सगळ्यांशी बोलून, मदत घेऊन आपला एक फिटनेसचा प्लॅन तयार केला.

सोहराबच्या मते लोकांना फिटनेस म्हणजे सिक्स पॅक कमावणे असं वाटतं. मात्र तुम्ही किती पुशअप मारताय किंवा burpee करताय हे महत्त्वाचं नाही. तर फिटनेस म्हणजे कोणतीही इच्छित गोष्ट करण्यासाठी फारसा वेळ न घेता ती करण्याची क्षमता.

 

fitness inmarathi 8

 

रोज दिवसातून १५ मिनिटे तरी व्यायाम केलाच पाहिजे. एकाच दिवशी तासभर व्यायाम केला आणि पुढच्या आठवड्यातील सहा दिवस कोणताही व्यायाम केला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. त्याचबरोबर योग्य पोषक आहार, व्यवस्थित झोप, आनंदी राहणे यांची देखील तितकीच आवश्यकता आहे.

लोक केवळ वजन कमी करण्याकरिता व्यायाम करतात. सेलिब्रिटी, फिल्म स्टार, मॉडेल १५ तास जिममध्ये व्यतीत करून वजन कमी करतात.

सोशल मीडियावरील त्यांचे फोटो पाहून सामान्य लोकांनाही वाटते, की आपणही असंच करावं. बऱ्याच वेळा तर हे फोटो अॅपचा वापर करूनही काढता येतात.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याची गरज आहे असं सांगितलं जातं. पण सामान्य लोकांना जिममध्ये जाऊन हे करणं शक्य होईल असं नाही. तसेच फिटनेस म्हणजे केवळ रोज एक तास व्यायाम करणे नव्हे किंवा चित्रविचित्र डाएट करणेदेखील नव्हे.

सोहराबचा फिटनेस मंत्र अगदी सोपा आहे. त्याचा मुलगा ज्यावेळेस पंधरा वर्षाचा असेल त्यावेळेस तो पन्नास वर्षांचा असेल. तरीही त्यावेळेस तो त्याच्या मुलाबरोबर क्रिकेट खेळण्याइतका फिट असायला हवा, असं त्याला वाटतं.

२०१९ मध्ये सोहराबला ‘फिटनेस पर्सन ऑफ द इयर’ हा व्होग कडून दिला जाणारा पुरस्कार मिळाला. हा त्याच्या आयुष्यातील पहिलाच पुरस्कार होता. त्यामुळे त्याला खरोखरच मनापासून आनंद झाला आणि तो चुकीच्या क्षेत्रात नाही हेदेखील त्याला कळलं.

 

sohrab-inmarathi

 

त्याचं शो फिट हे फक्त सेलिब्रिटीजसाठी नाही, तर सामान्य लोकांसाठी देखील आहे. कियारा अडवानी त्याच्या बिल्डिंगमध्ये राहते. तिला या शो फिटची कल्पना होती. तिच्यामुळेच मग आलियाने सुद्धा ४० दिवसांचं चॅलेंज स्वीकारलं आणि आलीयामुळे रणबीरनेही!

तर असा हा सोहराब सुश्रुषाही ज्याने तरुणपणीच वकिली सोडून, थोडी वेगळी वाट निवडली आणि यशस्वीदेखील झाला.

===

हे ही वाचा – जिम न लावता घरच्या घरी वजन आटोक्यात आणायच्या या पद्धती वापरून बघाच!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?