' काळी की हिरवी; आरोग्यासाठी कोणती द्राक्षे जास्त चांगली? वाचा – InMarathi

काळी की हिरवी; आरोग्यासाठी कोणती द्राक्षे जास्त चांगली? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सध्या द्राक्षाचा सिझन असल्याने फळविक्रेत्यांकडे द्राक्षं विकायला आलेली दिसतात. ताजी, रसाळ द्राक्ष पाहिली की ती विकत घ्यायचा मोह आवरत नाही.

 

grapes inmarathi

 

काळी आणि हिरवी अशा दोन प्रकारात मिळणारी द्राक्षं निवडताना अनेकांना प्रश्न पडतो की या दोन्हीतली कोणती द्राक्षं चांगली? आरोग्याच्या दृष्टिनं यातली कोणती द्राक्षं खावीत? तर जाणून घ्या आणि सुज्ञपणे निवड करा. तरच द्राक्ष तुमच्यासाठी वरदान ठरू शकतील.

थंडी संपता संपता फळबाजारात द्राक्षांचं आगमन होतं. आंबट गोड चवीची द्राक्षं निसर्गाचा अनमोल खजिना समजली जातात याचं कारण म्हणजे द्राक्षं खाण्यानं शरीरात नवचैतन्य निर्माण होतं.

जगभरातील अनेक देशांत म्हणजे जवळपास ९० टक्के देशांत द्राक्षं लागवड होते. भारतात पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रातील तासगाव (सांगली) आणि नाशिकची द्राक्षं लोकप्रिय आहेत.

 

grapes farm inmarathi

 

एकूणच फळं खाणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं कारण फळात असणारे अॅन्टिऑक्सिडंट आणि खनिजं आपल्या शरीराला लाभकारक असतात.

आता जगभरातच सगळीच फळं वर्षंभर मिळतात मात्र आपल्या देशांतील ऋतुमानानुसार फळं खाल्ली तर त्याचा जास्त फ़ायदा होतो कारण ऋतुनुसार आपलं शरीरही बदलत असतं. जानेवारीनंतर उष्म्याची चाहूल लागते आणि या काळात शरीराचा दाह कमी करणारी मधुर फळं खावीत असा सल्ला दिला जातो.

हेच कारण आहे की द्राक्षं हे थंडी संपता संपता येणारं फळ प्रकार आहे.

पूर्वी आपल्याकडे हिरवी द्राक्षं मोठ्या प्रमाणात मिळत असत. साधारण नव्वदीच्या दशकात चित्र बदललं आणि हिरव्यांसोबतच काळी द्राक्षंही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रिला दिसू लागली.

सुरवातीच्या काळात या काळ्या द्राक्षांबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतुहल होतं. मुळात द्राक्षाचा काळा रंगच इथल्या सामान्यांना अपरिचित होता. अनेकांचा या रंगावर आक्षेपही होता, काही शंका होत्या, तर काहींची नाराजी होती मात्र आता ही काळी द्राक्षंही नित्याची झालेली आहेत.

तरीही एक प्रश्न अजूनही पडतो की, खाण्यासाठी, तब्येतीसाठी कोणती द्राक्षं चांगली? कोणत्या रंगाच्या द्राक्षामुळे सर्दी, कफ अशा विकारांचा संभव असतो.

 

grapes basket inmarathi

 

हे ही वाचा – आंबट गोड चव असणाऱ्या या फळाला जगभरातून होते प्रचंड मागणी!

मुळात हा रंग बदलतो याचं कारण आहे द्राक्षामधील anthocyanin हा घटक. हिरव्या द्राक्षात हा घटक निर्माण न झाल्यानं त्यांचा रंग हिरवाच रहातो. या घटकामुळेच काळ्या किंवा लाल द्राक्षातील antioxidants चं प्रमाणही हिरव्याच्या तुलनेत जास्त असतं.

शरीर तरूण राखण्यासाठी हे काम करतात आणि या कारणामुळेच त्वचेच्या सौंदर्यासाठी काळ्या द्राक्षांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.

काळी द्राक्षं ही चवीला हिरव्या द्राक्षांपेक्षा मधुर असतात. हिरवी द्राक्ष किंचित आंबट असतात.

काळ्या द्राक्षात औषधी गुणधर्म हिरव्याच्या तुलनेत जास्त असल्यानं ती औषधांमध्येे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. याचा अर्थ हिरवी द्राक्षं कमी उपयुक्त असा नाही.

आयुर्वेदानुसार द्राक्षं ही मधुर रसात्मक, मधुर विपाकी आणि शीतवीर्याची असतात. तसेच ती मृदू विरेचक, दाहनाशक, तृप्तीदायक, श्रमहारक व ज्वरघ्न असतात.

द्राक्षांत कॅल्शियम, फॉस्फरस,लोह, क जीवसत्व भरपूर प्रमाणात असते. याशिवाय अ आणि ब जीवनस्वही काही प्रमाणात आढळते. द्राक्षात फ्रुक्टोज आणि पिष्टमय पदार्थ मुबलक असतात (म्हणूनच ज्यांना वजन, मधुमेह यांची पातळी कमी करायची आहे त्यांना द्राक्षं खाऊ नका किंवा अगदी कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो) हे फ़्रुक्टोज नैसर्गिक असल्यानं ते खाल्ल्याबरोबर रक्तात शोषलं जातं.

यासाठीच थकवा जाणवत असेल तर द्राक्ष खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: रूग्णांना द्राक्ष दिली जातात ती यासाठीच. शरीरात होणार्‍या चयापचयासाठी ज्या ग्लुकोजची गरज असते ती द्राक्ष पूर्ण करतात.

काळी द्राक्षं हिरव्यांपेक्षा जास्त आरोग्य फ़ायदे देत असल्यानं ती खावीत असं आहारतज्ज्ञ सांगतात. काय आहेत हे फायदे?

१- एकाग्रता वाढते

 

 

student-studying-online-inmarathi

 

काळी द्राक्षं नियमित खाल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मायग्रेनचा त्रासही कमी होतो.

२- पचनक्रिया सुधारते

 

acidity inmarathi

 

पचनासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे अपचन झालं असल्यास द्राक्ष खाल्ल्यानं उपयोग होतो.

३ – तारुण्य राखते 

 

grapes inmarathi

 

चीरकाळ तरूण दिसायचं असेल तर काळी द्राक्ष खाल्लीच पाहिजेत. डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठीही द्राक्षांचा उपयोग होतो.

४- केस गळतीला पुर्णविराम

 

hair losss inmarathi

 

द्राक्षात क जीवनसत्व मुबलक असतं. याचा उपयोग केस गळती थांबविण्यासाठी केला जातो. द्राक्षं खाल्ल्यानं केसांच्या मुळांपर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, परिणामी केस वाढतात.

५- स्त्रियांसाठी वरदान

काळ्या द्राक्षात resveratrol flavonoid असतात ज्यामुळे मेनोपॉजच्या काळात याचा उपयोग होतो.

 

menopause inmarathi 4

 

रेड वाईनमधेही हे असल्यानं रेड वाईनचा रंग हा लाल असतो. हिरव्या द्राक्षात मात्र resveratrol चा अभाव असतो.

हे ही वाचा – फळे आरोग्यासाठी हितकारकच, पण ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत !

६ – हाडांची बळकटी

मॅन्गेनिझ शरीरासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.  हाडांच्या बळकटीसाठी याचा उपयोग होतो.

 

strong inmarathi

 

हिरव्या आणि काळ्या दोन्ही प्रकारच्या द्राक्षात मॅन्गेनिझ मुबलक प्रमाणात असतं ज्यामुळे वाढत्या वयातील मुलांना द्राक्ष आवर्जून खायला द्यायला हवीत.

७ – कॅन्सर प्रतिबंधात्मक

 

cancer-inmarathi

 

काळी द्राक्ष काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये प्रतिकारशक्ती आणि प्रतिबंधाचं काम करतात. नियमीतपणे रेड वाईनचं सेवन करणा-यांना कॅन्सरचा धोका तुलनेने कमी असतो.

८ – शरिराचं तापमान संतुलन

 

grapes suger inmarathi

 

द्राक्ष आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने शरीराचा दाह कमी होतो.

९- पित्तावर गुणकारी

 

red wine inmarathi

 

आम्लपित्त, अपचन, ढेकर अशा पित्तविकारांत द्राक्ष गुणकारी ठरतात.

१० – मुतखड्यावर उपयुक्त

द्राक्षात पाणी आणि पोटॅशियम क्षारही अधिक असल्याने मूतखडा, लघवीत होणारी जळजळ आणि वेदना यासाठी फायदेशीर ठरतात.

हे झाले द्राक्षाचे फायदे मात्र काही बाबतीत खबरदारीही घेणं गरजेचं आहे.

१- अती आंबट किंवा कच्ची द्राक्षं अजिबात खाऊ नयेत. यामुळे सर्दी आणि खोकला होऊ शकतो

२ – बाजारातून द्राक्षं आणल्यावर ती आधी गरम पाण्याने दोन – तीन वेळा स्वच्छ धुवावीत. त्यावरचा पांढरा किटकनाशकाचा थर पूर्णपणे निघून जायला हवा.

 

grapes cleaning inmarathi

 

३ – द्राक्षं मूत्रल, विरेचक असल्याने अतिप्रमाणात खाल्ली बाधण्याची शक्यता असते. जुलाब आणि अती प्रमाणात लघवी झाल्यानं अशक्तपणा येतो.

४ – अती प्रमाणात द्राक्षं खाल्ल्याने ग्लानी येते म्हणूनच नियमितपणे पण योग्य प्रमाणात याचे सेवन करावे.

काळ्या द्राक्षांचे शरीरासाठी जास्त फायदे आहेत हे नक्कीच, मात्र याचा अर्थ हिरवी द्राक्ष पुर्णपणे वर्ज करावी असे नाही. अनेकांना हिरवी द्राक्ष अधिक आवडतात, तसेच ती देखील शरिरासाठी निश्चितच गुणकारी आहे, मात्र या दोन प्रकारांमध्ये तुलना केल्यास हिरव्यापेक्षा काळ्या द्राक्षांचे सेवन अधिक हितकारक असल्याचा वैद्यकीय सल्लाही दिला जातो.

===

हे ही वाचा – २० एकर जागेतून ५०० कोटींचा टर्नओव्हर, जगप्रसिद्ध झालेल्या एका भारतीय ब्रॅंडची कथा

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?