'IPO म्हणजे नेमकं काय? आणि त्यात सामान्यांना शेयर्स कसे मिळतात, जाणून घ्या!

IPO म्हणजे नेमकं काय? आणि त्यात सामान्यांना शेयर्स कसे मिळतात, जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“IPO म्हणजे काय रे भाऊ?” हा प्रश्न पडणारे आजही कित्येक लोक नक्कीच असतील. शेअरमार्केट हे प्रकरण तसं आपल्याकडे फारच भीतीने बघितलं जातं.

यशस्वी लोकांच्या चर्चेपेक्षा नुकसान झालेल्या लोकांबद्दल चवीने चर्चा करणाऱ्या आपल्या समाजात शेअरमार्केटमध्ये करिअर करणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे याचं कारण लोकांची ही वृत्तीच म्हणावी लागेल.

 

share market inmarathi

 

एक काळ होता जेव्हा लोकांपर्यंत योग्य ती माहिती पुरवण्याचे साधन नव्हते, इंटरनेट महाग होते. आता इंटरनेट स्वस्त आहे पण त्याचा वापर हा माहिती वाढवण्यापेक्षा वेबसिरीज बघण्यासाठी जास्त होतोय असं आकडे सांगतात.

मध्यंतरी आलेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेबसिरीज ने मात्र लोकांच्या ज्ञानात भर पाडली आहे असं म्हणायला हरकत नाहीये.

शेअर मार्केट मधले क्लिष्ट शब्द सहजपणे समजावून सांगायला बरेच युट्युब चॅनल मध्यंतरी तयार झाले आहेत ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे.

शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? डीमॅट अकाउंटचा वापर, डिबेंचर्स, म्युचल फंड या सतत कानावर पडणाऱ्या शब्दात सध्या IPO या शब्दाची एक भर पडली आहे.

कोणतीही कंपनी तेव्हा जास्त लोकांपर्यंत पोहोचते जेव्हा त्या कंपनीचा IPO बाजारात येतो हे आपण बऱ्याच बातम्यांमध्ये वाचलं, ऐकलं असेल. अगदी सुरुवातीपासून जाणून घेऊया की IPO म्हणजे काय?

IPO म्हणजे ‘इनिशीयल पब्लिक ऑफरिंग’ हे खाजगी कंपन्यांचे शेअर्स (समभाग) हे लोकांपर्यंत स्टॉक मार्केट मार्फत पोहोचवणे असं म्हणता येईल.

 

ipo inmarathi

 

लोकांपर्यंत कंपनीचे शेअर्स पोहोचवण्याचा मूळ उद्देश हा कंपनी साठी पैसे उभे करणे हा असतो.

कोणत्याही कंपनी ला IPO बाजारात आणण्यासाठी सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशन (SEC) च्या काही नियम व अटींची पूर्तता करावी लागते तेव्हाच ती कंपनी IPO लाँच करू शकते.

IPO लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘प्रायमरी मार्केट’ म्हणजेच सर्वात प्रथम जिथे तुम्ही कंपनीचे शेअर्स विकू शकतात त्या कॅपिटल मार्केटच्या प्रकाराचा आधार घ्यावा लागतो. ते कसं करायचं?

हे सांगायला आपण आर्थिक सल्लागार व्यक्तींची मदत घेऊ शकता. एखाद्या कंपनीचा IPO लाँच झाला म्हणजे ती कंपनी नफ्यात आहे की तोट्यात? मालकी हक्क पूर्ण बदलेल का? याचं नेमकं उत्तर सांगणं कठीण आहे.

पण, IPO ही कंपनीच्या आर्थिक अडचणीचं लक्षण हे नक्की म्हणता येईल. कारण, प्रत्येक कंपनीचे IPO घेऊन येण्याचे कारणं वेगळे असतात.

उदाहरण सांगायचं तर, रिलायन्स कंपनी जेव्हा IPO घेऊन येते तेव्हा त्याचं कारण मार्केट मधूनच पैसा उभा करणे हे असू शकतं. तेच जेव्हा LIC सारखी कंपनी IPO घेऊन येते तेव्हा त्याचं कारण हे खासगीकरणाकडे वाटचाल असं म्हणता येईल.

===

हे ही वाचा “जिंदगी के साथ और बाद भी” असं म्हणणाऱ्या LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का?

===

 

LIC ipo inmarathi

 

कोणत्याही कंपनीचा जोपर्यंत IPO येत नाही तोपर्यंत ती कंपनी ही मालकी हक्क असलेली समजली जाते. कंपनीची आजवरची वाढ ही केवळ स्वगुंतवणूक किंवा फायनान्सर यांच्या मार्फत झालेली असते.

आता त्यामध्ये सामान्य माणूस सुद्धा भर घालणार असतो असं सोप्या भाषेत सांगता येईल. आपल्या गुंतवणूकदारांचा फायदा करून देणे ही त्यानंतर कंपनी ची एक महत्वाची जबाबदारी असते.

कोणती कंपनी IPO लाँच करू शकते?

कोणतीही अशी कंपनी ज्या कंपनीची मालमत्ता ही १०० करोड यु एस डॉलर्स इतकी आहे ज्याला की ‘युनिकॉर्न स्टेटस’ असं म्हणतात.

पण, काही कंपनी अश्या पण असतात की ज्यांचा निव्वळ नफा हा त्यांच्या स्पर्धेतील कंपनीपेक्षा नेहमी वाढतच गेला आहे आणि ज्या की, सेक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशन (SEC) च्या कागदपत्रांची पूर्तता करू शकतात त्या सर्व कंपनी IPO लाँच करू शकतात.

IPO लाँच करण्याचे कंपनी ला नेमके कोणते फायदे आहेत?

‘पैसा उभा करणे’ हा मूळ फायदा म्हणता येईल ज्यामुळे कंपनी त्यांचे रखडलेले प्रोजेक्ट्स पूर्ण करू शकते.

 

money inmarathi

 

जेव्हा कंपनी चा IPO बाजारात येतो आणि शेअर्स मध्ये गुंतवणुकीच्या ते पात्र बनतात तेव्हा एकंदरीत लोकांमध्ये त्यांच्या बद्दल विश्वास, ओळख वाढते आणि त्यामुळे कंपनीचे थकीत पैसे सुद्धा वसूल करायला कंपनीला मदत होत असते.

IPO ची किंमत कोण ठरवतं?

कंपनी काही बँकांशी, अर्थसंस्थांशी संपर्क साधते. या संस्था कंपनीचं एक ऑडिट करतात ज्यामध्ये त्यांचा स्थापनेपासून आजवरचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड चेक केला जातो.

या प्रक्रियेला ‘ड्यु डिलीजन्स’ असं म्हणतात. यावरून कंपनीच्या मालमत्तेची आणि समभाग (शेअर्स) ची किंमत ठरवली जाते.

===

हे ही वाचा १०००० कोटींचं साम्राज्य असणाऱ्या “बिग बुल”च्या टिप्सनी तुम्हीही व्हाल मालामाल!

===

IPO चा आपल्याला काय फायदा आहे?

ज्या लोकांनी IPO लाँच करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आधी विकत घेतले आहेत त्यांना ही वेळ म्हणजे नफा कमावण्याची वेळ असते.

जे लोक कंपनीत आधीपासून समभाग बाळगून आहेत ते IPO लाँच झाल्यानंतर त्यातील काही शेअर्स जास्त किमतीत विकून त्या कंपनीबद्दल मार्केट मध्ये झालेल्या चर्चेचा फायदा घेऊ शकतात.

कोणत्याही कंपनी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी IPO ही सर्वात योग्य वेळ मानली जाते.

IPO ची सुरुवात कधी, कुठून झाली?

‘डच ईस्ट इंडिया कंपनीने’ सर्वात पहिल्यांदा IPO लाँच केल्याची नोंद आहे. लोकांचा आपल्या व्यवसायात सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणारी ही पहिली कंपनी होती.

 

dutch inmarathi

 

IPO चा सर्वात फायदा झाला तो डॉट कॉम कंपनी आहेत त्यांना आणि ज्या कंपनी स्टार्टअप आहेत त्यांना. २००८ हे वर्ष सर्वात कमी IPO लाँच होणारं होतं.

आजच्या इतकं तेव्हा प्रत्येक IPO ची बातमी होत नव्हती इतकाच काय तो फरक.

IPO चं यश कशात आहे?

दोन पद्धतीद्वारे IPO लोकांपर्यंत पोहोचत असतो. पहिली – त्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणे आणि दुसरं – प्रत्यक्ष IPO चं वितरण करणे.

हे करण्यासाठी कंपनीला आधी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमावे लागतात. त्यानंतर IPO ची मुदत ठरवली जाते आणि मग IPO हा स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट केला जातो.

 

IPO 3 inmarathi

 

ज्या कंपनी आधीपासूनच खासगी मालमत्तेच्या नाहीयेत त्यांना IPO चा फायदा जास्त होऊ शकतो असं अर्थतज्ञ सांगतात. कारण, या कंपन्यांनी लोकांचा विश्वास आधीच जिंकलेला असतो. खासगी कंपनीबद्दल नेहमीच मतमतांतरे पहायला मिळतात.

खासगी कंपनीला एक अजून त्रास वाटू शकतो की त्यांना आजपर्यंत कधीच न जाहीर केलेली सर्व माहिती IPO च्या वेळेस जाहीर करावी लागते.

ही माहिती कधी कधी त्यांच्या स्पर्धकांना कळते आणि त्यांच्या व्यवसायात तसे आवश्यक बदल करून घेतात, म्हणजे तुम्हीच तुमच्या स्पर्धकांना प्रशिक्षण देण्याची ही शक्यता आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या कंपनीला IPO ला पर्याय म्हणजे डायरेक्ट शेअर्सची स्टॉक मार्केट मध्ये लिस्टिंग करणे. त्यामध्ये कमी किंमत येण्याचा धोका असतो. पण, इतर मार्केटिंगचा खर्च कंपनी वाचवू शकते.

काही वेळेस डायरेक्ट लिस्टिंगचा फायदा सुद्धा होतो आणि कंपनीला अपेक्षेपेक्षा चांगली रक्कम सुद्धा मिळू शकते. ज्या कंपनीचा ब्रँड तयार झाला आहे त्या कंपनी हा मार्ग अवलंबत असतात.

काही यशस्वी IPO ची नावं सांगायची तर फेसबुक (२०१२), जनरल मोटर्स (२०१०), व्हिसा (२००८) हे प्रामुख्याने सांगता येतील.

 

facebook inmarathi 2

 

कोणत्या कंपनीचा IPO विकत घ्यावा हे सांगण्यासाठी कंपनीचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड तपासून मग निर्णय घ्यावा आणि जर नुकसान झालं तर आपण ते किती प्रमाणात सहन करू शकतो हे तपासूनच निर्णय घ्यावा असं चार्टर्ड अकाउंटंट नेहमीच सांगत असतात.

आपले अतिरिक्त पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी आपण IPO सारखे पर्याय नक्कीच निवडू शकतो. हे करत असताना फक्त आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.

जसं कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टर चा सल्ला घ्यावा तसंच तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी सुद्धा योग्य ज्ञान घेऊनच पुढे जाण्यात शहाणपण आहे.

या लेखातून IPO बद्दलच्या तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल तर ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा.

===

हे ही वाचा म्युच्युअल फंड ठरू शकतो बचतीचा उत्तम पर्याय! कसा ते जाणून घ्या…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?