' सावधान! हे गूढ जंगल तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायला भाग पाडेल

सावधान! हे गूढ जंगल तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायला भाग पाडेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘जंगल’ म्हंटलं की आपल्या समोर येते ती घनदाट झाडी, झाडांच्या मधून असलेल्या अरुंद वाटा आणि काही प्राणी जे आपण फक्त टीव्ही मध्ये बघितलेले असतात.

वातावरण छान असलं की, आपल्याकडे नेहमीच ताडोबा जंगल सफारी किंवा गौताळा अभय अरण्य असे प्रवास ठरत असतात. जंगलाच्या पायवाटेवरून आपली जीप चालत असते आणि अधूनमधून वाघोबा दर्शन देत असतात.

 

tadoba inmarathi

 

आपण बसमध्ये असल्यावर एक मार्गदर्शक आपल्याला दिलेला असतो. तो काहीतरी सांगत असतो, लोकांचं सगळं लक्ष त्या जंगलाकडे असतं. सगळेजणं ती हिरवळ, सहज दिसणारे हरीण हे आपल्या नजरेच्या आणि कॅमेरामध्ये कैद करण्याच्या प्रयत्नात असतात.

आपण जेव्हा त्या संस्थेच्या गाडीने जंगल ची सहल करत असतो तेव्हा जास्त प्रमाणात सुरक्षित असतो असं म्हणता येईल. मात्र या जंगालात घडणारे काही अपघात आठवले की आजही अंगाला कापरं भरतं.

प्रत्येकाने हे मान्य करावं की, प्राणी हे आपल्या जगात राहत नसून आपण त्यांच्या जगात राहत आहोत. मग, आपण प्राण्यांचा आदर करायला शिकू.

जंगलात सुरक्षा खूप असते, पण तिथे तुम्ही हरवल्यावर काहीही होऊ शकतं हे सर्वजण मान्य करतील. जंगलातल्या वाटा लक्षात ठेवणं हे खूप कठीण आहे. या कठीण परिस्थितीचा फायदा घेऊनच ‘विरप्पन’सारख्या दरोडेखोराने कित्येक निष्पाप लोकांना खंडणीसाठी ओलीस ठेवलं आणि त्यांचे जीव घेतले हे आपल्याला माहीत आहे.

पण, आज आम्ही जपानमधील एका अश्या जंगलाबद्दल सांगणार आहोत जिथे कित्येक लोकांनी स्वतःच जीव दिले. होय, ‘औकिघारा’ या नावाचं जपानमध्ये एक जंगल आहे, जिथे गेल्यावर माणसांमध्ये आत्महत्या करण्याचे विचार निर्माण होतात अशाही बातम्या तुम्ही ऐकल्या असतील.

हे ही वाचा – गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ११ ठिकाणे

 

forest inmarathi

 

युट्युबवर लोकप्रिय असलेल्या ‘लोगन पॉल’ या एका प्रवासी ‘व्हीलॉगर’ने मध्यंतरी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या विडिओ मध्ये एका व्यक्तीने झाडाला लटकून आत्महत्या केल्याचं भयावह चित्रण करण्यात आलं होतं.

 

japan forest inmarathi

 

या विडिओमुळे लोगन पॉलवर खूप टीका झाली. पण, त्यामुळे ‘औकिघारा’ या जंगलाबद्दल लोकांना ही माहिती कळली की, आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेले लोक हे ‘औकिघारा’ या जंगलात जाऊन ते चुकीचं कृत्य करतात.

टोकियो शहरापासून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या ‘औकिघारा’ हे जंगल फुजी डोंगराच्या पायथ्याशी आहे.

या जंगलाच्या दारावरच “जीवन हे तुम्हाला तुमच्या पालकांकडून मिळालेली सुंदर भेट आहे, त्याचा आदर करा.” असा बोर्ड लावण्यात आला आहे. त्यासोबतच दुसऱ्या ओळी अश्या लिहिल्या आहेत की, “शांत पणे एकदा तुमच्या आई वडिलांबद्दल, मुलांबद्दल, भावंडांबद्दल विचार करा” आणि सर्वात महत्वाचं, “स्वतःला एकट्याला त्रास करून घेऊ नका, तुमचे प्रश्न लोकांसमोर मांडा. कोणीतरी नक्की मदत करेल.”

 

okighara inmarathi

हे ही वाचा – या तलावांजवळ गेलात तर तुमचं काही खरं नाही! ‘मृत्यूचं घर’ मानले जाणारे ९ तलाव

२०१३ ते २०१५ मध्ये ‘औकिघारा’ जंगलात १०० पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

स्थानिक सरकारच्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, संपूर्ण जपान देशात या दोन वर्षात मिळून २४,००० लोकांनी आत्महत्या केली होती.

भारतातच फक्त असे प्रकार होतात असा आपला एक समज असतो. पण, तसं नाहीये. जपानसारख्या प्रगत देशात सुद्धा हे प्रमाण मागील काही वर्षात सतत वाढत आहे अशी माहिती आरोग्य आणि कामगार कल्याण मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये अजूनही कित्येक लोक आहेत ज्यांनी आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

१९६० मध्ये सिचो मात्सुमोटो या लेखकाने त्याच्या कादंबरीत या जागेत झालेल्या एका हिरोईनच्या आत्महत्येचा उल्लेख केला होता. २०१६ मध्ये सुद्धा अमेरिकन भयपट “द फॉरेस्ट”मध्ये कथा अशी दाखवण्यात आली आहे की, एक महिला या ‘औकिघारा’ जंगलात तिच्या जुळ्या बहिणींचा शोध घ्यायला जाते आणि स्वतःच गायब होते असा आशय आहे.

 

the forest inmarathi

 

आत्महत्या एक तर करूच नये. पण, केलीच तर जंगल मध्येच का ? असा प्रश्न एका जपानी मानसशास्त्रज्ञाला विचारण्यात आला होता. त्यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं की, “जगाचा अतिविचार करणारे हे काही लोक जंगल सारखी जागा निवडतात जिथे त्यांना हे कृत्य अगदी शांततेत करता येतं. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढू नये यासाठी या जागेची माहिती जगासमोर यायला पाहिजे, जेणेकरून ‘औकिघारा’ हे जंगल पर्यावरण संवर्धनासाठी आहे, स्वतःचा जीव देण्यासाठी नाही हा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. मीडिया ने जास्त प्रसिद्धी देऊन जी ओळख ‘औकिघारा’ जंगलाची केली आहे तेच ही इमेज बदलू सुद्धा शकतात.”

संपूर्ण ‘औकिघारा’ जंगलात CCTV लावण्याचा सल्ला सुद्धा कित्येक सामाजिक संस्थांनी जंगल प्रशासनास दिला आहे. या सामाजिक संस्थांना काही माणसांना वाचवण्यात यश आलं होतं.

आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाण त्या लोकांचं होतं ज्यांची मधल्या काही वर्षात नोकरी गेली होती. या संस्थांना असे काही लोक सापडले होते जे की ‘औकिघारा’ या जंगलाकडे जाण्याचं फक्त एका बाजूचं म्हणजेच ‘वन वे’ तिकीट काढून इथे पोहोचले होते. परतीच्या प्रवासासाठी ना तिकीट होते ना त्यांच्याकडे पैसे होते.

 

danger forest inmarathi

 

स्थानिक प्रशासनाने सुद्धा ही बाब गांभीर्याने घेतलेली असून ते सध्या ‘औकिघारा’ जंगलातील पुलांची उंची वाढवण्याचं काम करत आहेत. त्यासोबतच, या जंगलाच्या प्रवेशद्वाराशी काही अधिकारी नेमण्याचा विचार करत आहेत जे की प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला असे काही प्रश्न विचारतील ज्यामुळे समोरच्या व्यक्तीची सध्याची मानसिकता जंगल प्रशासनाच्या लक्षात येईल.

पोलिसांची गस्त वाढवणे आणि ‘औकिघारा’ या जंगलाची ‘आत्महत्या करण्याचं ठिकाण’ अशी ओळख करणाऱ्या सिनेमा, टीव्ही शो वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी जंगल प्रशासनाने जपान सरकारकडे केली आहे.

विशेषतः या आत्महत्या मार्च महिन्या अखेरीस म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटी जास्त होतात असं आकडे सांगतात आणि ते थांबवण्याच्या दृष्टीने यावर्षी जपान सरकार सतर्क झालं आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या अहवालानुसार, २०१९ साली जपान देश हा सर्वत जास्त आत्महत्या होणाऱ्या देशात २६ व्या क्रमांकावर होता. या यादीमध्ये जपान ने अमेरिका, इंग्लंड, इटली यासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या प्रगत देशांना सुद्धा मागे टाकले आहे. आत्महत्येचा दर हा जपानपेक्षा जास्त दक्षिण कोरिया आणि बेल्जीयम या देशांमध्ये अजून जास्त आहे हे या अहवालात सांगण्यात आलं आहे.

‘झाडांचा समुद्र’ या नावाने ‘औकिघारा’ जंगलाची असलेली सुंदर ओळख बदलून ही नवीन ओळख सर्व देशवासीयांच्या भावना दुखावणारी आहे. इथे असलेल्या गर्द झाडीमुळे या जंगलाच्या जवळपास कोणतेही मोबाईल टॉवर सुध्दा नाहीये. त्यामुळे इथे येणारी व्यक्ती ही काही वेळातच ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ जाते आणि नंतर कळतं की, त्या व्यक्तीचा जगाशी कायमचाच संपर्क तुटला आहे.

पर्यटकांनो, काळजी घ्या

भविष्यात जपानला फिरायला गेलात तर या ठिकाणाही भेट द्या मात्र काळजी घेऊनच. फुजी डोंगराचं सौन्दर्य बघायला येणारे पर्यटक हे या जंगलाला नक्की भेट देतात. ‘औकिघारा’ जंगल बघायला जातांना कोणीही एकटं येऊ नये असा नियम आता लावण्यात आला आहे.

 

forest visit inmarathi

 

प्रत्येक व्यक्तीला एक प्लास्टिक टेप एक मार्कर सारखं सोबत आणण्याची सूचना देण्यात आली आहे जेणेकरून जंगलात कोणीही हरवणार नाही.

३०० वर्षांपेक्षा जुनी झाडं असलेल्या या जंगलावर इतके बंधनं लादण्याची गरज ही २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जपानच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसल्या पासून झाली आहे असं स्थानिक नागरिक सांगतात.

‘औकिघारा’ या जंगलाची ही ओळख बदलावी आणि लोकांनी परत या जंगलाचा वापर केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून करावा अशी आशा व्यक्त करूयात.

प्रत्येकासमोर खूप प्रश्न असतात, त्यापैकी मुख्य प्रश्न कोणते? हे कळले आणि त्यांचं समाधान झालं तर आत्महत्येचा दर कमी होईल हे नक्की. ऊन, वारा, पाऊस या परिस्थितीत स्वतःला उंच आणि मजबूत ठेवणाऱ्या झाडांकडून आपण ‘प्राप्त परिस्थितीला सामोरं जाणे’ हे शिकायला पाहिजे.

हे ही वाचा – भारतातील या हॉंटेड जागा तुमचा भयपटाहून अधिक थरकाप उडवतील

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?