' कारने केलेली जगभ्रमंती आणि अनेक भन्नाट व्यक्तींची भेट! वाचा एक अफलातून प्रवास...

कारने केलेली जगभ्रमंती आणि अनेक भन्नाट व्यक्तींची भेट! वाचा एक अफलातून प्रवास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जग फिरायचं स्वप्न कोणाचं नसतं? मात्र यातही एक गट आहे, वेगळ्याच प्रकारची भटकंती करणारा. मुंबईच्या प्रवीण मेहता आणि डॉ. सुधीर बाल्डोटा यांनीही थोड्याथोडक्या नाही तर ५९ देशांची भटकंती केली, तीही कारमधून!

केवळ भटकंती नाही तर प्रत्येक देशातल्या, वेगळं आणि हटके कार्य करणार्‍या एखाद्या व्यक्तीची त्यांनी भेटही घेतली. त्यांच्या या celebrate the life, connect the world and aspire for peace या नावानं केलेल्या जगावेगळ्या प्रवासाबद्दल-

मुंबईच्या प्रवीण मेहता आणि सुधीर बाल्डोटा या दोन मित्रांचं स्वत: कार चालवत जग फिरण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न त्यांनी आशिया-युरोपमधले ५९ देश पादाक्रांत करत पूर्ण केलं.

११ महिने आणि ७० हजार किमी प्रवास करताना केवळ जग बघायचं हे एवढंच त्यांचं ध्येय नव्हतं, तर या देशातल्या उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना भेटून त्यांनी हा प्रवास जगावेगळा बनवला.

 

praveen-mehta-sudhir-baldota-inmarathi

 

कोण आहेत प्रवीण मेहता आणि डॉ. सुधीर बाल्डोटा?

इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट राहिलेल्या किंवा खरं ते सोडलेल्या (कारण शेवटच्या पेपरच्या दिवशी ते चक्क एक हिंदी फिल्म बघायला निघून गेले होते.) प्रवीण यांनी पुढे टेक्सटाईल उद्योगात जम बसवला.

सुधीर बाल्डोटा हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, म्हणजे होते असं म्हणायला हवं. कारण फ़ोटोग्राफीच्या छंदासाठी वेळ देता यावा यासाठी त्यांनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस सोडून पूर्णवेळ फोटोग्राफीला वाहून घेतलं आहे.

जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटानं सुधीर यांना फारच इंम्प्रेस केलं आणि आयुष्यात हे असं जगावेगळं काहीतरी करायला हवं असं त्यांच्या मनात पक्कं रूजलं.

प्रवासाची ओढ असणार्‍या प्रवीण यांनाही जग फिरून बघण्याची इच्छा होतीच. हे दोघे मित्र मग प्रवासाचे बेत आखू लागले. हळूहळू या स्वप्नांना आकार येऊ लागला आणि कारमधून जमेल तितकं जग बघण्याचं स्वप्न सत्यात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.

हे ही  वाचा – दीडशे वर्षांपूर्वी एकटीने अडीच लाख किमीचा जगाचा प्रवास करणाऱ्या महिलेची गोष्ट!

 

dreams-inmarathi

 

नुसतंच स्वप्न बघून भागणार नव्हतं. ते सत्यात आणायचं तर पैशांची, प्रवासात भक्कम साथ देईल अशी गाडी आणि प्रसंग आला तर ती दुरूस्त करण्याचं तंत्रही शिकणं आवश्यक होतं.

विविध देशांना भेटी द्यायच्या तर तिथला व्हिसा आणि प्रवासाला लागणारा वेळ याचं गणितही जमवून आणणं गरजेचं होतं. ज्या देशांत उजवीकडून वाहन चालविलं जातं तिथल्या वाहन चालविण्याच्या विशेष परवानग्या घ्याव्या लागणार होत्या.

या सगळ्याची जुळवा जुळव करून अखेर २०१९ च्या एप्रिलमधे त्यांनी प्रवासाला सुरवात केली. भारतातील नॉर्थ ईस्टमधे प्रवास करत त्यांनी आधी भूतान आणि नंतर बर्मामधे प्रवेश केला.

योगायोग म्हणजे सगळं जग लॉकडाऊन नावाच्या तुरूंगवासात गेलं त्याच्या अगदी थोडे दिवस आधी सुधीर- प्रवीण यांची जगभटकंती पूर्ण झाली होती.

 

lockdown-picture-inmarathi

 

८ एप्रिल २०१९ ला त्यांनी प्रवास सुरू केला आणि १५ मार्च २०२० ला ते घरी परतले. हे ११ महिने त्यांनी विविध देशांत फिरून तिथली संस्कृती, विविध क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती यांना भेट देऊन घालविले.

८ एप्रिल २०१९ या दिवशी मुंबईतील जुहू येथून या जगावेगळ्या प्रवासाला सुरवात झाली. मात्र प्रवासाची सुरवातच तांत्रिक अडचणीनं झाली.

भूतानहून म्यानमारला जायचं तर म्यानमारचा व्हिसा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे व्हिसाचं काम पूर्ण करण्यासाठी त्यांना घरी परतावं लागलं. आशिया खंडातील विविध देशांत कारने प्रवास करून त्यांनी युरोपमधे प्रवेश केला.

नंतर मात्र किरकोळ अडचणी वगळता त्यांचा प्रवास सुखकर झाला. युरोपमधल्या ३० देशात त्यांनी आपली एसयुव्ही चालवत प्रवास केला. याचसोबत बाल्टिक नेशन्सनाही भेट दिली. लंडन आणि अमेरिकेत प्रवेश करताना मात्र त्यांनी त्यांची कार जहाजावर लोड केली.

लोक साधारणपणे भटकंतीला निघतात तेव्हा विविध शहरं आणि तिथली प्रख्यात स्थळं यांना भेट देतात. सुधीर आणि प्रवीण यांनी मात्र एक निराळी गोष्ट करत या प्रवासाला वेगळेपण दिलं. त्यांच्या या विश्र्वप्रवासात त्यांनी जवळपास १५० लोकांची भेट घेतली ज्यांना changemakers किंवा influencers म्हणून जगभरात ओळखलं जातं.

जगभरातल्या भारतीय दूतावासांनी अशा अनोख्या लोकांशी या दोघांची भेट घडवून आणली. त्यांनी ज्यांची भेट घेतली त्या व्यक्तींना मॅगेसेसेसारखे सन्माननीय पुरस्कारही मिळालेले आहेत.

हे ही वाचा – “माझ्याबरोबर जगभर प्रवास करा – २६ लाख रुपये मिळवा”- करोडपती तरुणाची अजब ऑफर!

गुत्सोव्ह गोरेट्टी ज्याची शोध पत्रकार म्हणून ओळख आहे. त्याच्या देशाचे अध्यक्ष असणा‍र्‍या अलबर्टो फुजिमोरी यांच्या ड्रग्ज ट्रॅफिक संबंधातल्या शोध पत्रकारितेनं इतकी खळबळ उडाली होती की गुत्सोव्हचं अपहरणही करण्यात आलं होतं.

 

GUSTAVO-GORETTI-inmarathi

 

ज्येन्थिया मुआगचं कार्य आणखीच जगावेगळं आहे. थोड्याथोडक्या नाही तर तब्बल ४ हजार स्त्रियांचं बाळंतपण करण्याचा विक्रम नावार असणार्‍या ज्येन्थियाची मुलाखत घेऊन हे कार्य जगासमोर आणण्याचं काम या दोघांनी केलं.

याशिवाय जिनिव्हाच्या कॅरेन यांचं कार्यही जगावेगळं आहे. गुन्ह्याचा तपास करताना छळ करण्याचं जे तंत्र अवलंबलं जातं त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला.

मॅक्डोनियाच्या अल्बर्ट मुसिलु यांनी तर सरकारी देशभक्तीविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांच्या मते देशभक्तीची दुहाई देत सरकार महत्वाच्या समस्यांपासून जनतेचं लक्ष विचलीत करत असते.

या सगळ्या व्यक्तिमत्वांनी आणि प्रवासात भेटलेल्या विविध देशांतल्या आम जनतेनं आवर्जून नमूद केलं की भारताबाबत त्यांच्या मनात ममत्व आहे. विशेषत: भारतीय “योग” आणि बॉलिवुडची ओळख जगात सर्वत्र आहे हे या भेटीदरम्यान जाणवलं.

या प्रवासादरम्यान त्यांना अनेक हळवे अनुभवही आले. देशांच्या सीमा मानवी भावनांना बांध घालू शकत नाहीत याचे अनुभवही त्यांनी घेतले.

यापैकी एक अनुभव म्हणजे, डंकर्क येथे त्यांच्या यजमानांनी आवर्जून त्यांच्याकडचं “होली वॉटर” या दुकडीच्या गाडीवर शिंपडून पुढचा प्रवास विनाविघ्न, सुखकर व्हावा यासाठी मनापासून प्रार्थना केली. लॅतव्हिया येथे त्यांना मदत करण्यासाठी रस्त्यात भेटलेल्या एका व्यक्तीने त्याच्या प्रवासाची दिशा बदलली.

 

holy-water-inmarathi

 

प्रवासात जर काही रोमांचक घटना घडली नाही, तर तो अविस्मरणीय कसा होणार? नाही का? या दोघांनीही हा थरार पुरेपूर अनुभवला.

इटली येथील मिलानमधे त्यांच्या कारमधून त्यांच्या सहाच्या सहा बॅग्स चोरीला गेल्या. हे सामान म्हणजे त्यांच्यासाठी अर्थातच जीवन मरणाचा प्रश्न होता. यातल्या एका बॅगेत सर्व महत्वाची कागदपत्रं होती, ज्यांच्याशिवाय अन्य देशांत प्रवास दूरच, पण प्रवेश करणंही अशक्य होतं.

हे सामान शोधता शोधता सहा दिवस गेल्यानं त्यांच्या पुढच्या प्रवासाचं वेळापत्रक गडबडलं. एकीकडे चोरीसारखी अनपेक्षित आणि तणाव वाढवणारी घटना घडलेली असतानाच दुसरीकडे एक सुखद गोष्टही घडली. एका भारतीय-इटालियन महिलेनं यांना उदार मनानं आपल्या घरात आश्रयही दिला आणि त्यांचं सामान शोधायला मदतही केली. हे आठ दिवस त्यांच्यासाठी संपूर्ण प्रवासात सर्वात जास्त रोमांचक होते.

त्यांचा हा प्रवास केवळ जगप्रवासच ठरला नाही, तर त्याहूनही भन्नाट असा जबरदस्त अनुभव ठरला…!

 

world tour 2 inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?