'आणि ट्विटरकरांनी पॉर्नस्टार मिया खलिफाला तोंडावर पाडलं...!

आणि ट्विटरकरांनी पॉर्नस्टार मिया खलिफाला तोंडावर पाडलं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडियावर सध्या एकच विषय तापलेला आहे तो म्हणजे शेतकरी आंदोलन त्यावरून वेगवेगळ्या सेलिब्रिटीजनी वादात घेतलेली उडी आणि त्यांची वादग्रस्त विधानं!

विदेशी गायिका रिहाना हिने केलेलं ट्विट, त्याबरोबरच ग्रेटा थनबर्गची विधानं आणि यावरून अक्षय कुमार पासून सचिन तेंडुलकर यांनी नुकतीच दिलेली प्रतिक्रिया हे सगळंच सध्या सगळीकडे चर्चिला जाणारा विषय आहे.

 

rihaana inmarathi

 

गेल्या काही महिन्यांपासून भारतात चाललेल्या शेतकरी आंदोलनाने वेगवेगळी वळणं घेतलेली पाहिली. २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेला गदारोळ, आणि एकंदरच पेटलेलं वातावरण यामुळे भारतातल्या या परिस्थितीवर काही इंटरनॅशनल सेलिब्रिटी त्यांची पोळी भाजून घेत आहेत!

यात आता फेमस पॉर्न फिल्म अभिनेत्री मिया खलिफा हिनेदेखील उडी घेतली आहे.

मिया खलिफा हिने भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राला टार्गेट करत एक ट्विट केलं आहे ज्यात तिने प्रियांका जॉनस हिने भरतातल्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला पाहिजे अशा आशयाचं स्टेटमेंट केलं आहे!

===

हे ही वाचा पॉप स्टारला १८ कोटी रुपये देऊन ट्विट केलं गेलं: टूलकिट प्रकरणात संशय

===

 

mia khalifa tweet inmarathi

 

प्रियांका चोप्रा ही आता अमेरिकेत स्थायिक झाली असून तिने तिथल्या इंडस्ट्री मध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. सातासमुद्रापार जाऊन एवढी प्रसिद्धी मिळवणारी ती पहिली भारतीय फिल्म स्टार आहे.

कदाचित त्यामुळेच तिला टार्गेट केलं जात आहे असंही नेटीजन्समध्ये चर्चिलं जातंय.

मिया खलिफाचं हे ट्विट तिच्यावरच उलट पडलं आहे, कारण या ट्विट नंतर प्रियांकाच्या कित्येक फॅन्सनी मियाला झोडपून काढले.

 

tweet 1 inmarathi

 

tweet 2 inmarathi

 

tweet 3 inmarathi

 

प्रियांकाने याआधीच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे आणि तिला याबाबतीत बराच रोषसुद्धा पत्करायला लागला आहे. असं तीच्या फॅन्सनी ट्विट करून मियाला टॅग सुद्धा केलं आहे.

 

priyanka inmarathi

 

डिसेंबरच्या महिन्यात पंजाबी कलाकार दलजित दोसांझ याच्या ट्विटला पुन्हा शेयर करत प्रियांकाने शेतकऱ्यांसाठी पाठिंबा दर्शविला होता, ज्यावर तिला बऱ्याच चांगल्या वाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता!

याच महिन्यात मियाने शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी आणखीन एक ट्विट केलं होतं. या ट्विट मध्ये तिने ह्युमन राईट्स व्हायलेशन संदर्भात ट्विट केलं शिवाय दिल्लीतल्या एका शेतकऱ्याचा फोटो सुद्धा पोस्ट केला होता!

 

mia khalifa tweet inmarathi 2

 

एकंदरच या सगळ्या वादंगात इंटरनॅशनल सेलिब्रिटिंच्या लुडबुडीमुळे सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत. काही लोकं सचिन तेंडुलकर अक्षय कुमार यांना भलं बुरं बोलताना दिसत आहे. तर काही लोकं इंटरनॅशनल सेलिब्रिटीजची री ओढताना दिसत आहेत.

हा सगळा प्रकार खरंच खूप भयावह आहे कारण आपल्याच देशात आपल्याच लोकांच्या मानसिकतेमुळे २ वेगवेगळे गट पडले आहेत आणि या सगळ्याचा परिणाम आपल्याच देशाच्या विकासावर पडणार आहे!

आपला देश हा एकसंध रहायला पाहिजे, बाहेरच्या कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या सेलिब्रिटीजच्या व्यक्तव्यावरून आपण आपल्या लोकांना जज करता कामा नये हाच यावरचा एकमेव उपाय आहे, नाहीतर या अखंड देशाचे असंख्य तुकडे व्हायला वेळ लागणार नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?