'न्यूड फोटो मागणाऱ्या 'आंबटशौकीन' फॅनची मागणी अभिनेत्री पुजा हेगडेने अशी पुरवली

न्यूड फोटो मागणाऱ्या ‘आंबटशौकीन’ फॅनची मागणी अभिनेत्री पुजा हेगडेने अशी पुरवली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मिडीयावर सक्रीय सेलिब्रिटींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात कैद झालेल्या सेलिब्रिटींनी तर सोशल मिडीयावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

आता कोरोनामुळे आलेली बंधन सैल होत असली तरी फॅन्सशी कनेक्ट राहण्यासाठी सेलिब्रिटी हरत-हेचे प्रयत्न करताना दिसतात. यामध्ये फेसबुक लाइव्ह द्वारे आपली प्रत्येक खाजगी बाब फॅन्सशी शेअर करणं असो वा वादग्रस्त ट्विट करत कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न असो…

सध्या अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकताना या प्रक्रियेतही फॅन्सना सहभागी करताना दिसत आहेत. आपल्या पीआर टिमच्या माध्यमातून हळद, संगीत, लग्न अशा सगळ्याच सोहळ्यांचे क्षणाक्षणाचे अपडेट्स पोस्ट करणारे कलाकार ही बाब आता प्रेक्षकांसाठीही काही नवी नाही. 

 

sidharth wedding inmarathi

 

प्रेक्षकांशी जिव्हाळ्याचं नातं जपणा-या कलाकारांसाठी त्यांचे प्रेक्षक डोकेदुखी ठरल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. कधी अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या प्रेक्षकाने घातलेला धुमाकूळ असो वा कधी मर्यादेपलिकडे झालेलं ट्रोलिंग….

प्रेक्षकांची मानसिकता बदलत नसली तरी अशा परिस्थिती कलाकार कसा वागतो ?, काय भुमिका घेतो ?, हा नव्या चर्चेचा विषय ठरतो.

मात्र एका मॉडेलनी दाखवलिलेली हुशारी सध्या सोशल मिडीयावर कौतुकाचा विषय ठरतोय.

काय होतं प्रकरणं…

मॉडेल पुजा हेगडे कायमच चर्चेत असते. कधी तिचे बोल्ड फोटो पाहून प्रेक्षक चक्रावतात तर कधी तिच्या अदांनी तरुण प्रेक्षक घायाळ होतात.  अर्थात सोशल मिडीयावर तिचा वावर कायम असतोच.

हे ही वाचा – न्यूड सिन करण्यासाठी तिने अशा काही विचित्र अटी ठेवल्या की सेटवर सगळेच गांगरले…

 

pooja hegde inmarathi

 

आपल्या फॅन्सशी संवाद साधण्याच्या निमित्ताने पुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘आस्क मी एनिथिंग’ म्हणत प्रेक्षकांना साद घातली. या फिचरमार्फत कलाकारांना त्यांचे फॅन्स कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

हे करण्यामागे पुजाचा उद्देश चांगला असला तरी आपली हीच कृती मनस्ताप देणारी ठरू शकेल याची तिला कल्पनाही नव्हती. 

पुजाला तिच्या अनेक फॅन्सही फॅशन, आवडीनिवडी, येत्या काळातील प्रोजेक्ट्स असा वेगवेगळ्या विषयांसंदर्भात अनेक प्रश्न विचारले. त्यावर पुजानेही मनमोकळा संवाद साधला.

मात्र यामध्ये एका विचित्र फॅननी पुजाकडे चक्क न्युड फोटोची मागणी केली.

त्याची ही मागणी वाचल्यानंतर पुजाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही न केलेली बरी! अभिनेत्री, मॉडेल्स यांना अशा प्रकारच्या परिस्थितीला अनेकदा सामोरेे जावे लागत असले तरी यावेळी मात्र पुजाने या प्रश्नाला दिलेलं उत्तर पाहिल्यानंतर अनेकांनी तिची पाठ थोपटली.

खरं तर या अजब फॅनच्या गजब मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा पर्यायही पुजाकडे होता, मात्र तिने चतुराई दाखवत एक फोटो त्या फॅनला पाठवला.

थांबा, तुमच्या मनातील शंकांना आवर घाला, आणि आधी तो फोटो पहा….

 

pooja hegde 2 inmarathi

 

पुजाने आपल्या दोन्ही पायांचा फोटो पोस्ट करत त्या फॅनचं तोंड बंद केलं. यामागील तिची हुशारी म्हणजे, त्याने न्युड अर्थात नग्न अवस्थेतील फोटोची मागणी केली होती. मात्र पुजाने आपल्या उघड्या पायांचा फोटो पोस्ट करत सभ्यतेच्या मर्यादेचे पालनही केलं आणि त्याचवेळी त्या चावट फॅनला अद्दल घडवली.

त्या फॅनचा मागणीपेक्षाही पुजानी दिलेलं उत्तर सोशल मिडीयावर वा-याच्या वेगात व्हायरल होत आहे. अनेकांनी यासाठी तिचं कौतुक केलं आहे.

यानिमित्ताने महिला अभिनेत्री, मॉडेल्स यांना चंदेरी दुनियेत काम करताना प्रेक्षकांकडून होणारा त्रास, अनेकदा विचित्र प्रसंगांना द्यावं लागणारं तोंड हे मुद्दे देखील चर्चेत आले आहेत. 

मॉडेलिंग, फोटोशुट यासाठी अभिनेत्रींना ‘बोल्डनेस’ दाखवावा लागला, तरी सोशल मिडीयावर अशा प्रकारचे प्रसंग घडणं किंवा सोशल मिडीयावर अशा मागण्यांना सामोरं जाणं हे अवघड असल्याचंही यापुर्वी अनेकींनी सांगितलंय.

 

pooja inmarathi

 

अर्थात आपला संयम ढळू न देता, थोडी हुशारी दाखवली तर मर्यादेच्या चौकटीत राहूनही अशा प्रकारच्या आंबटशौकीन फॅन्सना अद्दल घडवता येते हे सिद्ध करणारी पुजा या नव्या प्रकरणामुळे भाव खाऊन गेली हे मात्र नक्की…

हे ही वाचा – गोड नटीने २ कोटींची जाहिरात नाकारली – ज्याचं आपण मनापासून कौतुक करायला हवं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?