' "जिंदगी के साथ और बाद भी" असं म्हणणाऱ्या LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का?

“जिंदगी के साथ और बाद भी” असं म्हणणाऱ्या LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यावर्षीचं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केले. बँकेचे विलीनीकरण आणि एलआयसीचं आयपीओ या दोन गोष्टींवर मार्केट, संसद भवन आणि कट्टे यावरचे वातावरण गरम झालं.

या दोन बातम्या जाहीर होताच दोन अफवा उडाल्या. एक म्हणजे बँका विकल्या जाणार आणि दुसरं म्हणजे एलआयसीचं खाजगीकरण होणार. आता अफवा त्या अफवा. त्यामध्ये खात्रीलायक अस काहीच नसतं!

मध्ये जास्त चर्चिले गेले ते तथाकथित एलआयसीचं खाजगीकरण. आयपीओ काढणे म्हणजे खाजगीकरण करणे अशी अफवा उडाली आणि सरकार वर ताशेरे ओढायला सुरुवात झाली!

 

LIC ipo inmarathi

 

मात्र आयपीओ म्हणजे नेमकं काय कळल्यावर लोकं आयपीओ विकत कसे घेतात हे गुगल वर शोधायला लागले.

तर आयपीओ म्हणजे नेमकं काय आणि एलआयसी चा आयपीओ घेणे नेमकं किती फायदेशीर आहे याबाबत आपण आज बघणार आहोत.

देशातली सगळ्यात मोठी इन्शुरन्स कंपनी कोणती, हे विचारल्यावर कोणीही डोळे बंद करून उत्तर देईल भारतीय आयुर्विमा मंडळ अर्थात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-एलआयसी.

===

हे ही वाचा शेअर मार्केटमधून नफा मिळवण्यासाठी या अत्यंत महत्वाच्या टिप्स तुम्ही वाचायलाच हव्यात

===

इन्शुरन्स मार्केटमध्ये एलआयसीचा तब्बल ७०% पेक्षा जास्त वाटा आहे. ही कंपनी एवढी मोठी आहे की हिच्या व्हॅल्यूएशनच्या जवळ दुसरी कोणती कंपनी फिरकू पण शकत नाही.

तब्बल १५ लाख करोड एवढं व्हॅल्यूएशन आहे एलआयसीचं. एलआयसी काम कसं करतं ते थोडक्यात जाणून  घेऊ!

इन्शुरन्सच्या प्रिमियमच्या नावाखाली लोकांकडून घेतलेले पैसे मार्केट मध्ये लावून, कर्ज देऊन एलआयसी बक्कळ पैसा छापते आणि त्याच्यातून मिळालेल्या फायद्यातून लोकांना त्यांचे पैसे रिटर्न करते.

 

LIC inmarathi 2

 

सरकारी आस्थापन असल्या कारणाने लोक पैसा बुडणार नाही या खात्रीने एलआयसी मध्ये डोळे बंद करून पैसा गुंतवतात हे आपल्याला माहीतच आहे.

आता हीच एलआयसी पब्लिक होणार आहे. लिस्टिंग नंतर एलआयसीचं व्हॅल्यूएशन हे दुप्पट होण्याची शक्यता मार्केट एक्स्पर्ट सांगत आहेत.

१५ लाख करोडचे दुप्पट अर्थात तीस लाख करोड! एलआयसीच्या आताच्या व्हॅल्यूएशनच्या जवळपास देशातली कोणतीच कंपनी फिरकू शकत नाही आयपीओ नंतर तर मग एलआयसी सातव्या आसमानावर असेल हे ग्राह्य धरून चालले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही.

तर, या एलआयसीच्या ३०% भाग हे पब्लिक होणार आहे. अर्थात सामान्य माणूस सुद्धा या कंपनीत आता भागीदार होऊ शकतो.

मार्केट मध्ये एलआयसी :

२०२० या आर्थिक वर्षात एलआयसीचं क्रमांक एक ची कंपनी होती जिने मार्केट मध्ये सर्वाधिक पैसा गुंतवला होता. ७२००० करोड एवढी मोठी गुंतवणूक एलआयसीने मार्केट मध्ये केली होती.

२०१९ या आर्थिक वर्षातील स्वतःच्याच गुंतवणुकीचा रेकॉर्ड तोडत एलआयसीने ही गुंतवणूक केली होती. २०१९ मध्ये ६८,६२० करोड एवढी गुंतवणूक एलआयसी ने केली होती.

यातून मिळणारा नफा बघितला तर २०१९ मध्ये एलआयसी ने २३६०० करोड एवढा निव्वळ नफा मिळवला होता तोच २०२० मध्ये २५६५० करोड एवढा होता.

एलआयसीची गुंतवणूक आणि मिळणारा नफा बघता मार्केट मधली ‘बिग बुल’ कंपनी जर कोणती असेल तर ती एलआयसी.

 

big bull inmarathi

 

आता मार्केट व्हॅल्यूएशन, मार्केटमध्ये असलेली गुंतवणूक आणि मिळणारा नफा बघता एलआयसी मध्ये केलेली गुंतवणूक ही नक्कीच फायद्याची ठरणार यात दुमत नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्गुंतवणुकीचं २.१ लाख कोटींचं उद्दिष्टं ठेवलं आहे. हे आजवरचं सगळ्यांत मोठं उद्दिष्टं आहे. एलआयसी आणि आयडीबीआयच्या माध्यमातून ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा बेत आहे.

विशेष म्हणजे आयडीबीआय जेव्हा बुडीत निघाली होती तेव्हा तिला सावरायला एलआयसीच पुढे आली होती.

निर्मला सीतारामन एलआयसीचं लिस्टिंग बद्दल बोलताना सांगतात, शेअर मार्केट मध्ये एखादी कंपनी लिस्टेड झाल्यावर कंपनीला एक शिस्त लागते आणि त्यामुळेच कंपनी वित्तीय बाजारपेठेत पोहोचू शकते.

कंपनी समोर पैसा उभा करायला अनेक पर्याय उपलब्ध होतात. शिवाय लहान लहान गुंतवणूकदारांना सुद्धा कंपनीच्या कमाईत भागीदार होऊ शकतात.

माझगाव डॉक, बर्गर किंग, इंडिगो पेंट यांच्या आयपीओला मिळालेला प्रतिसाद बघता एलआयसीला सुद्धा तेवढाच चांगला प्रतिसाद किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळायची शक्यता आहे.

 

md burger king inmarathi

 

एलआयसीची मार्केटमध्ये असलेली उपलब्धता. मोठा ग्राहक वर्ग, गुंतवणूक केलेल्या कंपन्या याचा एकूण आढावा बघता एलआयसीमध्ये गुंतवणूक ही कोणत्याच बाजूने धोकादायक वाटत नाही.

एलआयसीचा भूतकाळच एवढा ब्राईट होता की, जिने स्वतः नुकसान झेलले पण आपल्या ग्राहकांना नुकसान होऊ दिल नव्हतं. शिवाय सरकारला जेव्हा जेव्हा पैसा लागला आहे तेव्हा एलआयसी एकहाती मोठी मदत करायला वेळोवेळी उभी राहिली आहे.

आणि मुख्य म्हणजे ग्राहकांचा असलेला विश्वास यामुळे एलआयसी इतर कंपन्यांपेक्षा वेगळी ठरते.जी त्यांची जमेची सगळ्यात मोठी बाजू आहे.

===

हे ही वाचा – म्युच्युअल फंडमध्ये अवश्य गुंतवणूक करा..पण या गोष्टी कटाक्षाने पाळा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?