सौंदर्य आणि हुशारीचा संगम असलेली जगातील सर्वात चलाख महिला हेर ‘माता हारी’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गुप्तहेरांच्या विश्वामध्ये नेहमीच पुरुषांचे नाव पहिले घेतले जाते.

म्हणजे बहुतेकांना केवळ असेच वाटत असेल की गुप्तहेरी फक्त पुरुषच करायचे, स्त्रिया नाही, असा तुमचा समज असले तर तो एक गैरसमजच म्हणावा लागेल, कारण स्त्री हेरांनी देखील गुप्तहेर जगात अगदी निनादून सोडलं होतं.

या स्त्री हेरांमध्ये सर्वात पहिलं नाव कोणाच घेतलं जातं असेल तर माता हारी हीचं!

 

mata-hari-inmarathi
pinterest.com


जगभरातील महिला गुप्तहेरांमध्ये माता हारीचा उल्लेख नाही असं होणारच नाही!

माता हारीचा जन्म १८७६ साली नेदरलँड्स देशामध्ये झाला. पुढे काही काळ त्यांनी पॅरीस मध्ये व्यतीत केला. माता हारी हे त्यांच टोपण नाव. त्यांच खरं नाव होतं गेरत्रुद मार्गरेट जेले!

त्यांचे सौदर्य आणि अद्कारी लाजवाब होती. त्या उत्तम नृत्यांगना देखील होत्या आणि याच गोष्टीच्या आधारे त्यांनी भल्या भल्या गुप्त मोहिमा लीलया पार पाडल्या होत्या.

 

mata-hari-inmarathi
donhollway.com

 

माता हारी यांना भारतीय नृत्यकले बद्दल खास आकर्षण होतं. त्यांनी भारतीय नृत्यकला आत्मसात केली आणि त्यात त्या पारंगत देखील झाल्या.

 

mata-hari-marathipizza02
mashable.com

 

आपल्या नृत्यादरम्यान त्या अनेक मादक हालचाली करून समोरच्याच्या काळजाचा ठाव घ्यायच्या. ज्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्तींना त्यांच्याबद्दल आकर्षण होते.

गुप्त मोहिमेवर असताना त्या अनेक देशामध्ये फिरायच्या, तेथील अधिकाऱ्यांशी गोड बोलून, प्रसंगी शरीरीसंबंध ठेवून त्यांना वश करायच्या आणि गुप्त माहित्या काढून घ्यायच्या आणि नेदरलँड्सला पुरवायच्या.

 

mata-hari inmarathi
economictimes.indiatimes.com

 

माता हारी यांचे पती नेदरलँड्सच्या सैन्यामध्ये कार्यरत होते.

तेथून त्यांची इंडोनेशिया मध्ये बदली करण्यात आली होती. त्यांच्या समवेत माता हारी देखील इंडोनेशिया मध्ये आल्या, तेथे येऊन त्यांनी एक डान्स ग्रुप स्थापन केला.

याच दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:चे माता हारी असे टोपण नामकरण केले.

 

mata-hari-inmarathi
pinterest.com

 

माता हारीचा मलय अर्थात इंडोनेशियन भाषेमध्ये अर्थ होतो सूर्य!

नवऱ्यासोबतच्या रोजच्या भाडंणाला वैतागून त्यांनी घटस्फोट घेतला आणि आपले बस्तान पॅरीस मध्ये हलवले.

पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान माता हारी यांनी अनेक युरोपियन देशांमध्ये प्रवास केला होता. याच वेळेस स्पेनला जाताना इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तहेर संस्थेने त्यांना ताब्यात घेतले.

फ्रान्स आणि ब्रिटीश गुप्तहेर संस्थांना शंका होती की माता हारी या जर्मनीला गुप्त माहिती पुरवतात.

या आरोपाबद्दलचे त्यांच्याजवळ ठोस पुरावे देखील नव्हते, तरी माता हारी यांच्यावर डबल एजंटचा आरोप लावण्यात आला. याच आरोपाच्या आधारावर फ्रान्समध्ये त्यांना अखेर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.

 

mata-hari-execution-marathipizza
donhollway.com

 

अतिशय वाईट शेवट नशिबी येऊन देखील आजही ही सौंदर्यवती महिला हेर गुप्तहेरी जगतात आपले नाव अजरामर करून गेली!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?