' स्वतः गायलेल्या गाण्यांचीसुद्धा रॉयल्टी न घेणारा नव्या पिढीतील ‘फकीर गवैया’! – InMarathi

स्वतः गायलेल्या गाण्यांचीसुद्धा रॉयल्टी न घेणारा नव्या पिढीतील ‘फकीर गवैया’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट तुम्ही बघितलेला असेलच. हा पिक्चर हृतिकच्या अभिनयामुळे जितका प्रसिद्ध व लोकप्रिय झाला तितकाच या फिल्मच्या गाण्यामुळे ही तो प्रसिद्ध आहे.

आजही आपण कहो ना प्यार है या पिक्चर मधले गाणे गुणगुणत असतो. एक पल का जीना, ना तुम जानो ना हम ही सदाबहार गाणी आज कित्येक वर्षांनीसुद्धा लोकांच्या तोंडी आहेट. त्या गाण्यांच्या तालावर आपले पाय थिरकत असतात.

आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना वेड लावणारा, एकशे बढकर एक अशा गीताची भेट देणारा हा अवलिया गायक कोण? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.

आपल्या उपजत कलाकौशल्याद्वारे भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि आपल्या मस्तमौला स्वभावामुळे कधी प्रसिद्धीच्या झोतात तर कधी काळाच्या अंधारात मागे पडलेला एक हरहुन्नरी कलाकार लकी अली!

 

lucky ali inmarathi

 

गेले काही दिवस लकी अलीच्या ‘ओ सनम’ या फेमस गाण्याची त्यानेच लाईव्ह गायलेली बरीच वर्जन्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. आणि त्याचे कित्येक चाहते पुन्हा त्या जुन्या काळात हरवले. 

१९९० चा तो काळ, जेंव्हा भारतात पॉप कल्चर आणि अल्बम जोर धरत होते. शान, अलिशा चिनॉय, अदनान सामी असे कित्येक कलाकार वर येत होते यांच्याच मांदियाळीतला एक झकास गायक म्हणजे लकी अली!

===

हे ही वाचा फकिराचा आशिर्वाद अन अविश्रांत मेहनत : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग १)

===

पदार्पणातच पहिल्या अल्बमद्वारे म्हणजे ‘सूनोह’ द्वारे सुपर डुपर हिट झाला, लोकांनी त्याला डोक्यावर घेतला!

 

lucky ali 3 inmarathi

 

आपल्या दर्जेदार कलाकृतीतून प्रेक्षकांना खेचून आणणारा व खिळवून ठेवणारा हा कलाकार ,जन्मजात कलेची पार्श्वभूमी असणारा प्रसिद्ध विनोदी सिनेअभिनेता महमूद यांचा दूसरा मुलगा.

हिंदी सिनेमात आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे प्रसिद्ध अभिनेते महमूद हे लकी अलीचे वडील.

आपल्याप्रमाणेच लकी अली ने अभिनय क्षेत्रात करिअर कराव अशी इच्छा महमूद यांची होती पण लकी अली ने स्वतंत्र क्षेत्र निवडलं ते म्हणजे गायकीचं!

वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता लकी आली ने आपल्या करीयरची सुरुवात वेगळ्या वाटेने केली. पदार्पणातच त्याचा पहिला अल्बम सूनोह हा सुपर-डुपर हिट झाला.

त्यानंतर लकी अलीने एकापेक्षा एक सदाबहार गीताची देणगी हिंदी सिनेमाला दिली. महमूदचा मुलगा एवढीच त्यांची ओळख न राहता त्याच्या कामामुळे लोक त्याला ओळखू लागले.

संगीत क्षेत्रात आपल्या जादुई आवाजाने लकी अलीने अनेक पुरस्कारांना गवसणी घातली. गीतकार- संगीतकार- अभिनेता या विविध क्षेत्रात लकी अली चे काम हे कायम लक्षात राहण्यासारखे आहे. नव्वदच्या दशकातला प्रसिद्ध पॉप गायक म्हणून लकी आली ओळखला जातो.

बालपणापासूनच लकी अलीला आपल्या वडिलांचा सहवास खूप कमी लाभला. महमूद हे त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते त्यामुळे त्यांच्याकडे काम खूप असायचं याचा परिणाम लकीच्या आयुष्यावर झाला.

 

lucky ali mehmood inmarathi

 

एखादी व्यक्ती व्यवसायात कुणीही असो पण तो मुलांसाठी फक्त त्याचा बाप असतो. बालवयात जर मुलांना बाप म्हणून आपण वेळ देऊ शकलो नाही तर त्याचा वेगळा परिणाम मुलावर होतो.

असंच लकी आलीच्या बाबतीतही घडलं म्हणजे लकी आली बोर्डिंग स्कूल मध्ये असताना तेथे त्याच्या वडिलांना बाप म्हणून तो ओळखू आला नाही तर विनोदी अभिनेता म्हणून महेमूद यांना लकी अलीने ओळखले.

महेमूद त्या वेळी अभिनेता म्हणून जिंकले पण बाप म्हणून हरले.

हिंदी बरोबरच मल्याळम मध्ये सुद्धा लकीने बरीच गाणी म्हंटली आहेत. तसेच रेहमान साठी तामीळ आणि कन्नड मध्ये सुद्धा त्याने बरीच गाणी म्हंटली आहेत!

गायकी किंवा संगीतात करियर सुरुवात करण्याआधी लकीने वेगवेगळी कामं केली. कारपेट क्लीनरची कामं. शेतीची कामं सुद्धा त्याने केली. पण संगीताची ओढ त्याला या इंडस्ट्रीकडे खेचून घेऊन आली!

लकी अलीने अफाट मेहनतीच्या जोरावर, गुणवत्तेच्या बळावर, कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपला नावलौकिक केला. सुर, कांटे अशा सिनेमातून लकीने अभिनयाचासुद्धा प्रयत्न केला, पण लोकांनी त्याला गायक म्हणूनच जास्त पसंती दर्शवली.

 

lucky ali movies inmarathi

 

कहो ना प्यार है नंतर लकीने वेगवेगळे प्रयोग केले पण लोकांना त्याची गाणी तितकीशी आवडली नाहीत. पण बचना ए हसीनो या रणबीर कपूरच्या सिनेमातून त्याला पुन्हा एकदा ब्रेक मिळाला आणि लकी अलीचा तो वेगळा आवाज कित्येकांना मोहात पाडू लागला.

त्यानंतर पाठशाला मधलं ‘बेकरार’ अंजाना अंजानी मधलं ‘हैरत’ पासून नुकत्याच रणबीर दीपिकाच्या तमाशा मधलं ‘सफरनामा’ ही गाणी देऊन लकीने पुन्हा त्याच्या चाहत्यांच्या मनात स्वतःची हरवलेली जागा मिळवली!

कोणत्याही गायकाला त्याच्या गाण्याची रॉयल्टी मिळणं हे आपल्याला काही नवीन नाही. आज लता मंगेशकर जरी गात नसल्या तरी आजवर त्यांनी गायलेल्या लाखो गाण्यांच्या रॉयल्टी (म्हणजेच आर्थिक स्वरूपातलं मानधन) त्यांना मिळतात.

पण त्याच्याच बरोबरच्या मुहम्मद रफि या अजरामर गायकाने कधीच रॉयल्टीची मागणी केली नाही. गाणं रेकॉर्ड करताना जितकं मानधन मिळायचं त्यावरच ते समाधानी होते.

सध्याच्या काळात बहुदा लकी अली हा एकमेव गायक आहे जो त्याच्या गाण्यांची रॉयल्टी घेत नाही. असे त्याने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले आहे.

 

lucky ali on royalty inmarathi

 

ज्या कंपन्यांसाठी त्याने गाणी गायली त्या कंपन्या आज त्याच्या गाण्यांची रॉयल्टी घेतात पण त्यातला काही भाग गायकांसोबत शेयर करावासा त्यांना वाटत नाही असं देखील लकीने त्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे!

लकी अलीच्या आयुष्याकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की प्रसिद्ध विनोदी अभिनेता महमूद यांचा मुलगा असूनही लकी अलीची फिल्म इंडस्ट्रीने म्हणावी तशी दखल घेतलीच नाही आणि म्हणावी तशी प्रसिद्धी पण त्याला मिळाली नाही.

लकीने या गोष्टींची पर्वा केली नाही. लोक काय म्हणतील लोकांना काय वाटत यापेक्षा स्वतःला काय वाटतं तेच त्यांनी केलं. प्रसंगी स्वतःच्या जन्मदात्या बापाच सुध्दा ऐकलं नाही.

आयुष्यात अनेक चढउतार आले. कौटुंबिक पातळीवर ३ लग्न, पाच मुलं, व्यसन, संगितकार, गीतकार, गायक, अभिनेता ते शेतकरी अश्या विविध क्षेत्रात तो रमला, जगला पण अडकला नाही.

 

lucky ali 2 inmarathi

 

आपल्या आयुष्याचंही तसंच असतं, आयुष्यातील प्रत्येक क्षण जगून घ्यावा पण त्यात गुंतुन राहू नये. लकी अलीच्या आयुष्याकडे बघितलं तर तसेच वाटते नाही का?

===

हे ही वाचा बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?