' पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर या भारतीय ठिकाणांना भेट द्या

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर या भारतीय ठिकाणांना भेट द्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या दैनंदिन आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन कुठे फिरायला जाणे ही आता फक्त हौस राहिली नसून मानसिक गरज सुद्धा झाली आहे.

मागच्या एका वर्षात प्रत्येक जण वेगवेगळ्या संघर्षातून इथपर्यंत पोहोचला आहे. आपण निरोगीपणे हे वाचू शकतोय हेच आपल्यावर याबद्दल आपण निसर्गाकडेही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

निसर्गाच्या सानिध्यात असल्यावर आपल्याला आपले प्रश्न खूप छोटे दिसायला लागतात हे अगदी खरं आहे.

 

guy treking inmarathi

 

तुम्हाला अद्भुत वस्तू बघायच्या असतील तर परदेशात जा आणि निसर्ग बघायचा असेल तर ‘भारत भ्रमण’ करा असं सगळे पर्यटक नेहमीच म्हणतात. आपण राज्यनिहाय जरी यादी केली आणि फिरायचं ठरवलं तरी भारतातील सगळे पर्यटन स्थळ बघण्यासाठी कित्येक वर्ष लागतील.

गडकिल्ले, डोंगरदऱ्या, वर्षा विहाराचे ठिकाण आणि प्राचीन लेण्या हे भारताचं खरं वैभव आहे.

 

prtapgad fort inmarathi

==

हे ही वाचा – जगातील ११ अदभूत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत!

==

नवीनच पर्यटन करायला सुरुवात करणाऱ्या व्यक्तींना असा प्रश्न पडू शकतो की, इतक्या पर्यायांपैकी नेमकं कुठे जावं ? आजच्या धावपळीच्या जगात जर तुम्हाला थोडी शांतता अनुभवायची असेल तर ‘लेण्या’ हा उत्तम पर्याय असू शकतो.

लेण्यांमध्ये गेल्यावर तिथल्या त्या पिवळसर मातीचा येणारा विशिष्ठ वास, आवाज दिल्यावर येणारा प्रतिध्वनी, अनाकलनीय बांधकाम हे तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जाईल.

आम्ही आपल्याला अश्या ११ लेण्यांबद्दल माहिती देणार आहोत जिथे गेल्यावर तुम्हाला परत यावंसं वाटणार नाही इतका तो अनुभव सुखद असेल.

आपल्या मुलांना सुद्धा ह्या लेण्या बघताना भारतीय संस्कृती बद्दल माहिती मिळेल आणि ते थोड्या वेळासाठी विडिओ गेमच्या दुनियेतून बाहेर पडतील.

एका वर्षात ५२ विकेन्ड्स असतात, आपण नियोजन केलं केलं तर हे ११ ठिकाणं बघणं सहज शक्य होईल:

१. बदामी लेणी, कर्नाटक:

कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामध्ये ६ व्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या ‘बदामी लेणी’ ला एकदा तरी नक्की भेट द्यावी अशी जागा आहे.  प्राचीन काळातील चालुक्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाचे नाव ‘बदामी-चालुक्य’ हे सुद्धा आहे.

 

badami caves inmarathi

 

बदामी लेणीमध्ये दगडात केलेलं कोरीव काम हे खूप रेखीव आहे. एकूण सहा लेण्या असलेल्या या जागेत शिव-तांडव, भगवान विष्णू ची भिंतीमध्ये कोरलेली मूर्ती, जैन देवता बाहुबली यांची मूर्ती, जवळच असलेली बुद्धिस्ट लेणी हे तुमचं मन निदान थोड्या वेळासाठी तरी नक्की शांत करतील.

२. उदयगिरी लेण्या, मध्यप्रदेश

विदिशा शहराच्या जवळच असलेल्या या लेण्या या चौथ्या शतकात बांधण्यात आल्या आहेत अशी माहिती उपलब्ध आहे.

 

udaygiri inmarathi

 

एकाच ठिकाणी १४ लेण्या असलेली ही जागा म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुना आहे.

चंद्रगुप्त मौर्य यांच्या अधिपत्याखाली निर्माण झालेल्या या लेण्यांमध्ये सुद्धा रेखीव मुर्ती आहेत. येथिल दुमजली बांधकाम बघण्यासारखं आहे.

३. वराह लेणी, तामिळनाडू

मामलपूरम जिल्ह्यात असलेली वराह लेणी ही सातव्या शतकात बांधण्यात आल्याची नोंद आहे.

 

varah inmarathi

 

भगवान विष्णूच्या वराह रूपाचं मूर्तीस्वरुप कथन या लेणीमध्ये आपल्याला बघायला मिळते.

 

varah caves inmarathi

 

आकाराने लहान असलेली ही लेणी खूप रेखीव आहे. दगडांनी केलेलं बांधकाम हे या लेणीचं सुद्धा वैशिष्ठय आहे.

४. भाजे लेणी, महाराष्ट्र

पुणे-मुंबई रोड वरील भाजे लेणी ही बुद्धिस्ट लेणीचा अप्रतिम नमुना आहे. भाजे लेणीमध्ये एकूण १८ लेण्या आहेत.

दुसऱ्या, तिसऱ्या शतकात बांधण्यात आलेल्या या लेण्यांमध्ये खूप खांब आहेत. या खांबांवर फुलं आणि इतर चित्र काढण्यात आले आहेत.

 

bhaje caves inmarathi

 

एका लेणीला ‘चैत्य दालन’ असं नाव देण्यात आलं आहे तर एका लेणीमध्ये एक जोडपं नृत्य करतांना मूर्तीस्वरूपात दाखवण्यात आले आहे.
अजूनही न बघितलेल्यांनी भाजे लेणीला एकदा तरी भेट द्याच.

५. कार्ला लेणी, महाराष्ट्र

लोणावळ्याजवळच असलेली कार्ला लेणी ही सुद्धा बुद्धिस्ट लेणीचा अद्भुत नमुना आहे. कार्ला लेणी ही भारतातील सर्वात मोठी बुद्धिस्ट लेणी आहे.

अखंड दगडातून साकारण्यात आलेल्या या लेणीतील मूर्ती बघितली की आपण एखाद्या लाकडी मूर्तीकडे बघत आहोत असा भास होतो.

भगवान गौतम बुद्ध यांची रेखीव मूर्ती हे या लेणीचं वैशिष्ठय आहे. कार्ला लेणीमध्ये एकूण ३७ खांब आहेत आणि त्यावर हत्तीचे शीर रेखाटण्यात आले आहे.

 

karla inmarathi

 

लेण्यांमध्ये प्रवेश करतांनाच दिसणारा अशोक स्तंभ हे सुद्धा या लेणीचं प्रमुख आकर्षण आहे.

६. अजिंठा-एलोरा लेणी, महाराष्ट्र

आपल्या भारताचं वैभव आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीतील समाविष्ट अजिंठा-एलोरा लेणी या दुसऱ्या शतकात निर्माण झाल्याची नोंद आहे.

औरंगाबाद-सिल्लोड रोडवर असलेल्या या लेणी बघितल्या नाहीत असं क्वचितच कोणी असेल.

 

ajintha verul leni inmarathi

==

हे ही वाचा – ह्या ९ जगप्रसिद्द वास्तूंमधील गुप्त गोष्टी लोकांना कळू दिल्या जात नाहीत!

==

अखंड दगडात झालेलं हे बांधकाम हे सह्याद्रीच्या कुशीत असल्याने अजूनच मोहक दिसतात. प्रशस्त जागा असलेल्या या लेण्या नेहमीच महाराष्ट्रातील शाळांचं सहलीचं प्रमुख ठिकाण असतं.

अजिंठा लेणी या त्यामध्ये असलेल्या चित्र, मूर्ती मुळे लोकप्रित आहेत, तर एलोरा लेणी या रेखीव कामामुळे लोकांचं मन जिंकतात.

७. एलिफंटा लेणी, मुंबई

युनेस्कोच्या ‘वर्ल्ड हेरिटेज’ यादीत समाविष्ट झालेली ही अजून एक लेणी आहे. मुंबईपासून केवळ ७ किलोमीटर अंतर असलेल्या या लेणीला ‘घारपुरी’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

बुद्धिस्ट लेणी असलेल्या या जागेत एक पाण्याची टाकी सुद्धा आहे. बेसॉल्ट खडका पासून तयार झालेल्या या लेणीत २० फुट उंचीची त्रिमूर्ती स्वरूपात असलेली भगवान शंकराची सुद्धा मूर्ती आहे.

 

elephanta caves inmarathi

 

५ ते ७ व्या शतकात निर्माण झालेल्या या लेण्याचं नाव पोर्तुगिज लोकांनी काही हत्तीच्या तोंडाची प्रतिकृती बघून एलिफंटा हे ठेवलं होतं.

८. दुर्गेश्वरी लेणी, बिहार

भारतातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे दुर्गेश्वरी लेणी जी की बोधगया पासून १२ किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

या लेण्यांमध्ये भगवान गौतम बुद्ध यांनी ध्यान केलं होतं असं मानलं जातं. दुर्गेश्वरी लेणीमध्ये भगवान गौतम बुद्धांची सोनेरी मूर्ती आहे जी या लेणीला नेहमीच प्रकाशमान ठेवते.

 

durgehwari caves inmarathi

 

याच लेणी मध्ये दुर्गा मातेची सुद्धा मूर्ती आहे ज्यामुळे या लेणीला दुर्गेश्वरी हे नाव देण्यात आलं आहे.

९. खंदगिरी, ओडिशा

भुवनेश्वरपासून जवळच असलेल्या या लेणीसुद्धा अखंड दगडाने बनलेल्या आहेत. खंदगिरी लेण्यांमध्ये हत्ती, फुलं अशा रचना कोरीव स्वरूपात रेखाटण्यात आल्या आहेत.

 

khandgiri caves inmarathi

 

खरवेला राजाच्या राज्यात या लेण्या जैन साधूंना ध्यान धारणेसाठी वापरण्यास दिल्या होत्या अशी नोंद आहे.

१०. पाताळेश्वर लेणी मंदिर, महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात असलेली ही लेणी आठव्या शतकात निर्माण करण्यात आली होती. भगवान शंकराचं मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेण्या अखंड दगडातून साकारण्यात आल्या आहेत.

 

pataleshwar inmarathi

 

स्थापत्य कलेचा नमुना म्हणून पाताळेश्वर लेणी ही प्रसिद्ध आहे. या आवारात असलेल्या राम, लक्ष्मण, सीता आणि देवतांच्या मूर्ती या जागेचं मुख्य आकर्षण आहे.

११. उंडवली लेणी, आंध्रप्रदेश

विजयवाडा शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या या लेणी कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत. दगडांवर होणाऱ्या कोरीव कामाचं उंडवली लेणी या खूप योग्य उदाहरण आहे.

 

undavalli inmarathi

 

७ व्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या या लेणीमध्ये सुद्धा भगवान बुद्ध आणि भगवान विष्णू यांच्या मूर्ती रेखाटण्यात आल्या आहेत. भिंतीवरील कोरीव काम हे उंडवली लेण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना विशेष आवडतं.

भारतातील या आणि अजूनही कित्येक ऐतिहासिक वास्तूंना भेट देणे हे आपल्या सर्वांना नक्कीच आनंद देईल आणि तुमचा वेळ, पैसे सत्कारणी लागेल. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना या ठिकाणांची माहिती देऊन आपण त्यांना सुद्धा आपल्या आनंदात सहभागी करु शकता.

==

हे ही वाचा – छत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत

==

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?