' "पुढच्याला ठेच मागचा शहाणा!" फॅमिली मॅन २ पुढे का ढकलली जातीये?

“पुढच्याला ठेच मागचा शहाणा!” फॅमिली मॅन २ पुढे का ढकलली जातीये?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

लॉकडाउन काळात थेटर्स बंद असल्याने त्याचा फायदा सर्वात जास्त कुणाला झाला असेल तर तो डिजिटल माध्यमांना म्हणजेच आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर ओटीटी प्लॅटफॉर्म्सना!

या काळात घरबसल्या लोकांना नेटफ्लिक्स, प्राइम, हॉटस्टार अशा प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचा कंटेंट बघायची सवय झाली आणि लोकं आणखीनच सुज्ञ झाले असं म्हणायला काहीच हरकत नाही. 

डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिपचं बंधन नसल्याने त्यातल्या फिल्म्स आणि वेबसिरिज मधून सर्रासपणे बोल्ड कंटेंट दाखवला जाऊ लागला. शिवीगाळ, न्यूड सीन्स, हिंस्त्र किळसवाणी दृश्य, अशा बऱ्याच गोष्टींचा भडिमार यातून व्हायला लागला.

आणि या सगळ्या बरोबरच आणखीन एक गोष्ट मोठ्या प्रमाणात होऊ लागली ती म्हणजे धर्म, जात पात, संस्कृती, परंपरा यावर उलट सुलट भाष्य करणं!

मग भले ते सेक्रेड गेम्स असो किंवा सुटेबल बॉय असो, पाताल लोक असो किंवा नुकतीच आलेली तांडव ही वेबसिरिज असो! प्रत्येक वेबसिरिज मधून पद्धतशीरपणे एकाच प्रकारचा मेसेज पसरवला जाऊ लागला.

हे ही वाचा – ‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

 

web content inmarathi

 

सेक्रेड गेम्स मध्ये दिलेले रामायण महाभारताचे संदर्भ शिवाय त्यातला हिंदूद्वेष यामुळे बऱ्याच लोकांनी यातल्या कित्येक सीन्सवर आक्षेप घेतला.

पाताल लोक मध्येसुद्धा देशातल्या हिंदू समाज आणि मायनॉरिटी लोकांमधला वाद अधोरेखित करून दाखवला गेला. नुकत्याच आलेल्या द व्हाईट टायगर या सिनेमातसुद्धा काही अंशी असाच अजेंडा पाहायला मिळाला.

यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती ‘तांडव’ मधल्या एका विवादीत सीनची, आणि तांडव या वेब सिरिज मधल्या एका आक्षेपहार्य सीनमुळे सोशल मीडिया वर बरंच वादळ उठलं.

 

tandav scene inmarathi

 

यंत्रणेतल्या काही अधिकाऱ्यांनी मुद्दा पकडून धरल्याने आणि लोकांच्या विरोधामुळे या सिरिजच्या मेकर्सना लोकांची जाहीर माफी मागायला लागली आणि तो सीन वेब सिरिज मधून काढायला लागला.

हा सगळा वाद निवळतोय इतक्यातच आणखीन एक बातमी आली की प्राइम व्हीडियोच्या ‘द फॅमिलीमॅन’ सीझन २ ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.

‘द फॅमिलीमॅन’ या वेबसिरिजचा पहिला सीझन जेंव्हा रिलीज केला गेला तेंव्हा सुद्धा या सिरिजच्या बद्दल बरीच लोकं नाखुश होते. कारण या सिरिजच्या पहिल्या सीझन मधून आतंकवादाला जस्टीफाय करायचा थोडा का होईना पण प्रयत्न झाला होता.

आतंकवादी हे कसे इनोसंट असतात आणि त्यांना कशाप्रकारे ब्रेनवॉश केलं जातं हे सगळं या सिरिज मधून दाखवलं गेलं होतं. शिवाय याबाबरोबरच हिंदू मुस्लिम यांच्यातलं वैर दाखवायचा मोह या सिरिजच्या मेकर्सनासुद्धा आवरता आला नाही!

 

the family man inmarathi

 

शिवाय भारतातल्या डिफेन्स फोर्स आणि डिपार्टमेंट यांचं खूप चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण केलं गेलं!

त्यामुळे जरी मनोज वाजपेयी, शरद केळकर सारखे तगडे कलाकार या सिरिजमध्ये असले तरी या सिरिजचा मुख्य अजेंडाच इतका विचित्र असल्याने लोकांना ते पचणं अशक्यच होतं.

आणि आता तांडव वरुन झालेल्या कॉंट्रोवर्सीमुळे या सिरिजच्या मेकर्सनी सिरिजची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. या फेब्रुवारीत सिरिजचा दूसरा सीझन येणार होता पण त्याचा ट्रेलर सुद्धा अजून रिलीज केला गेला नाही आणि थेट रिलीज डेटच पुढे ढकलली आहे.

यावरून एक मेसेज नक्कीच जातो की तांडव वरुन झालेल्या वादाचा काहीतरी परिणाम हा डिजिटल माध्यमांवर आणि कलाकारांवर पडला आहे.

फॅमिलीमॅनच्या मेकर्सनी दुसऱ्या सीझनचा ट्रेलरसुद्धा रिलीज न करून खूप शहाणपणा दाखवला आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण जर यांनी ट्रेलर रिलीज केला असता अनाई त्यातली एक जरी गोष्ट लोकांना खटकळी असती तरी याचा निगेटिव्ह इमपॅक्ट सिरिजवर पडला असता हे नक्की!

 

family man season 2 inmarathi

 

त्यामुळे ट्रेलर रिलीज न करता रिलीजडेट पुढे नेणं हा निर्णय तसा योग्य होता हे नक्की. आता अर्थात ही फक्त मार्केटिंग स्ट्रॅटजी असेल तर त्याला खरंच काही अर्थ नाहीये.

कारण लोकं आता या गोष्टींना चांगलेच सरावले आहेत. या सिरिजच्या येणाऱ्या दुसऱ्या सीझन मध्येसुद्धा हा असलाच थील्लरपणा आणि चुकीचा अजेंडा पसरवला जाणार असेल तर याचीही अवस्था तांडव सारखीच होईल हे निश्चितच आहे.

पण तांडव च्या मेकर्सना जी ठेच लागली आहे त्यामुळे मागून येणाऱ्या फॅमिलीमॅनला काहीतरी धडा मिळाला असावा अशी आशा करुयात.

अर्थात या अशा विचारांना प्रमोट करणाऱ्या फिल्म्स आणि सिरिज यायचं बंद होतील किंवा यांच्यावर बहिष्कार हा एकाच पर्याय आहे असा विचार करणं मूर्खपणाचं ठरेल. कारण कला क्षेत्राची ही संपूर्ण ईकोसिस्टिमच याच पद्धतीने काम करते.

त्यामुळे असा कंटेंट हा वरचेवर येत राहणार पण त्या विरोधात सभ्य भाषेत चर्चा करूनच यावर सोल्यूशन निघू शकतं. सिनेमा किंवा वेबच्या माध्यमातून पसरवला जाणारा जातीयवाद, द्वेष, धर्मभेद, संस्कृतिची मोडतोड या सगळ्या गोष्टी नक्कीच थांबल्या पाहिजेत.

 

ott content inmarathi

 

पण त्यासाठी तांडवबद्दल ज्या हिरीरीने भाष्य केलं गेलं तसंच अशा प्रत्येक वेब सिरिजच्या बाबत झालं पाहिजे.

शेवटी जनता जनार्दन हीच खरी जज असते. लोकांनी ठरवलं तर हे सहज शक्य आहे, गरज आहे ती फक्त आपलं मत आणि विरोध मांडायची!

हे ही वाचा – “असले” सीन दाखवणाऱ्या नेटफ्लिक्सला केवळ बॉयकॉट करून भागणार नाही, वाचा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?