' पॉप स्टारला १८ कोटी रुपये देऊन ट्विट केलं गेलं: टूलकिट प्रकरणात संशय – InMarathi

पॉप स्टारला १८ कोटी रुपये देऊन ट्विट केलं गेलं: टूलकिट प्रकरणात संशय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेले अनेक दिवस सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन, त्यामुळे एकीकडे तापलेलं आणि दुसरीकडे गढूळ होऊ पाहणारं घाणेरडं राजकारण, या सगळ्याचे पडसाद किती आणि कसे उमटले, ते आपण सगळ्यांनीच पाहिलंय. अजूनही हे सगळं सुरूच आहे.

आता तर, देशाबाहेर सुद्धा या गोष्टींची पाळंमुळं असल्याचं दिसू लागलंय. पॉप सिंगर रिहाना हिने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केलेलं ट्विट आणि त्यावरून भारतात सुरु असलेला गदारोळ हादेखील आता मोठा चर्चेचा विषय झाला आहे.

भारतातील अनेक बड्या मंडळींनी यावर मतप्रदर्शन करून या वादात उडी घेतली आहे. भारतरत्न पुरस्कार विजेत्या लतादीदी आणि सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा रिहानाच्या ट्विटबद्दल त्यांचं मत व्यक्त करून टीकाकारांच्या नजरा स्वतःकडे ओढवून घेतल्या.

 

lata-didi-sachin-inmarathi

 

अर्थात या सगळ्या आंतरराष्ट्रीय वादाला ज्या ट्विटमुळे तोंड फुटलं, ते चक्क ‘पेड ट्विट’ असल्याचं समोर आलं आहे.

‘द प्रिंट’ यांनी त्यांच्या एका वृत्तामध्ये, कॅनडामधील एका पी. आर. फर्मने रिहानाला तब्बल २५ लाख डॉलर्स इतकी मोठी रक्कम देऊ केल्याचं म्हटलं आहे. ही रक्कम भारतीय चलनात सांगायची झाल्यास, जवळपास १८ कोटी रुपये इतकी होते.

कॅनडामधील राजकारण्यांचा यामागे हात असल्याचा संशय सुद्धा ‘द प्रिंट’ने व्यक्त केला आहे. खलिस्तानी विचारांचे कॅनडास्थित धलीवाल हे स्कायरॉकेट या पीआर फर्मचे डायरेक्टर आहेत. याच फर्मने रिहानाला पैसे दिलं असल्याचं म्हटलं जात आहे.

 

mo-daliwal-inmarathi

 

‘द प्रिंट’च्या म्हणण्यानुसार, पर्यावरण वाचविण्यासाठी झटणारी ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलेलं टूलकिट सुद्धा याच कारस्थानाचा एक भाग होता. हा वाद अधिक वाढावा यासाठी घेण्यात आलेलं ते पाऊल होतं.

हे ही वाचा – कृषीकायद्याविरोधात हैदोस घालणाऱ्यांना चिथवणारा दीप सिद्धू आहे तरी कोण?

धलीवाल, पीआर फर्मसाठी रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या मरिना पॅटर्सन, कॅनडामधील ‘वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशन’च्या डायरेक्टर अनिता लाल आणि कॅनडामधील खासदार जगमित सिंग यांचा यामागे हात असल्याचं, त्याच सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या टूलकिटमध्ये सर्वाधिकवेळा उल्लेख झाला आहे, तो कॅनडामधील ‘पोएटिक जस्टीस फाउंडेशन’चा! (PJF) अनिता लाल या संस्थेच्या सहसंस्थापक सुद्धा आहेत. ‘द प्रिंट’ यांच्या माहितीनुसार, खासदार जगमित सिंग यांनी याआधी शिखांच्या अनेक चळवळींना पाठिंबा दर्शविला आहे.

स्वतःला ‘पिडीतांवरील दडपशाहीविरुद्ध आवाज उठवणारी संस्था’ मानणाऱ्या PJF च्या वेबसाईटवर ‘त्यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं’ म्हटलं आहे.

 

poetic-justice-foundation-inmarathi

 

एवढंच नाही, तर या प्रकरणात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याच विषयावर ते ट्विटरवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसत आहेत.

‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार रिहानाच्या या ‘पेड ट्विट’ची पाळंमुळं कॅनडात आहेत. शेतकरी आंदोलन हा फक्त भारतापुरता मर्यादित विषय उरलेला नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?