' रोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी – InMarathi

रोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नैसर्गिक गोडवा असलेला मध अनेक पिढ्यांकडून जगभरात वापरला जातो. केवळ गोड चवीसाठी नाही तर मधाच्या औषधी गुणधर्मामुळेही त्याचा वापर केला जातो.

मधामधे असं नेमकं काय असतं की ते आरोग्यासाठी इतकं हितकारक आहे? जाणून घ्या मधाविषयी…

 

lemon honey inmarathi

 

फ़ुलातील मकरंदापासून मधमाशा जो चिकट, गोड आणि सोनेरी रंगाचा द्रव पदार्थ तयार करतात त्याला मध म्हणतात हे तर तुम्हाला माहितच आहे.

पूर्णत: नैसर्गिक पध्दतीनं मधमाशा जो मध तयार करतात त्यात मकरंदातील सुक्रोज या शर्करेचे मोठ्या प्रमाणात फ़्रुक्टोज व डेक्स्ट्रोज शर्करेत पर्यवसन होते.

या प्रक्रियेदरम्यान मकरंदातील पाण्याचे प्रमाणही कमी होते. परिणामी फ़ुलातील मकरंद मधात रूपांतरीत होतो.

मधाची गुणवत्ता किंवा प्रतही त्यातल्या साखरेच्या प्रमाणावर ठरते. मधाचे शरीराला अनेक फायदे आहेत. सौंदर्य साधनेतही मध वापरला जातो आणि औषधोपचारातही वापरला जातो. म्हणूनच मधाला बहुगुणी म्हटलं जातं.

दिवसाची सुरवात कॉफी किंवा चहानं न करता मध आणि कोमट पाण्यानं करण्याचा सल्ला डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञ देतात.

एक कप कोमट पाणी आणि चतकोर लिंबाच्या फोडीचा रस यात एक चमचा मध घालून त्याचं सेवन केल्याचे इतके फायदे आहेत याचा तुम्ही विचारही केला नाही.

मात्र आपल्याला दिवसाची सुरवात चहा कॉफ़ी अशा कॅफेनयुक्त पदार्थानी करण्याची वाईट सवय असल्यानं आपण या सल्ल्याकडे दूर्लक्ष करतो.

हे ही वाचा – चहाचे इतके प्रकार… तुमच्या कट्टर चहाप्रेमी मित्रांनाही माहित नसतील!

 

immunity tea inmarathi2

 

मध, लिंबू,पाणी या तिकडीतल्या प्रत्येक घटकांत अनेक गुणधर्म आहेत. याच्या औषधी गुणधर्मांबद्दल सर्व पॅथीमधे भरभरून लिहिलं गेलं आहेच.

या अद्भूत अशा पेयाचे नेमके फायदे तुम्ही जाणून घेतले तर सकाळच्या चहा कॉफीला राम राम करून मध लिंबू पाण्याचं नियमीत सेवन नक्कीच कराल.

शरीराचं शुद्धीकरण

या आंबटगोड चवीच्या पेयाचा सर्वात मोठा गुणधर्म आहे, डिटॉक्सिफिकेशन.

 

detox inmarathi

 

दिवसभरात आपण विविध मार्गानी विषारी, आरोग्याला घातक असे जिवाणू, विषाणू शरीरात येऊ देत असतो. हे सगळं इतकं नकळत होत असतं की तुम्हाला जाणवतही नाही की तुमच्या शरीरात कोण कोण येऊन मुक्काम करत आहे. हळूहळू यांचा प्रभाव वाढत जाऊन आरोग्यावर परिणाम होतो.

घरातला केर जसा रोज काढतो, शरीराची बाह्य स्वच्छता जशी रोज करतो तसं जर आतूनही शरीर रोजच्या रोज स्वछ केलं तर हा विषारी कचरा शरीरात रहाणार नाही आणि दुष्परिणामही दिसणार नाहीत.

ही स्वछता कशी करायची? तर ते अगदीच सोपं आहे.

कोमट पाणी आणि लिंबू रस मध या मिश्रणात परिणामकारक असे ॲण्टी-पॅथोजेन गुणधर्म आहेत. यामुळे शरीरातील घातक पदार्थांचा परिणाम कमी आणि पूर्णपणे नाहीसा करण्यास मदत होते.

 

lemon honey water

 

शरीरातून हे घातक पदार्थ बाहेर काढण्यात याची मदत होते.

त्वचेच्या सौंदर्यासाठी

मृदु, मुलायम त्वचा कोणाला नको असते?

पिंपल्स, मुरुम यापासून सुटका हवी असते पण त्यासाठी आपण काय करतो? तर महागडी क्रिम्स, लोशन्स आणि सलोनच्या महागड्या ट्रिटमेंटस घेतो. पण या त्वचेचं रहस्य आपल्याच स्वयंपाकघरात दडलेलं आहे.

हे ही वाचा – ना महागडं क्रीम, ना औषधं : ‘पाण्याचा’ असा वापर तुमची त्वचा कायम तजेलदार ठेवेल!

 

dark circles inmarathi

 

ही ट्रिटमेंट अगदी सोपी आणि तुम्ही वापरता त्या उत्पादनांच्या तुलनेत स्वस्तही आहे.

अलिकडे प्रदुषण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, सूर्यकिरणातून येणारे घातक किरण आपल्या त्वचेवर थेट पडतात आणि त्यापासूनही त्वचेला हानी पोहोचते. याशिवाय हार्मोन्सचं असंतुलन आणि विविध ॲलर्जी यामुळेही त्वचेच्या समस्या उद्भवतात.

पिंपल्समुळे मागे राहिलेले काळपट डाग हा अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. यावर उपाय म्हणजे दोन ते तीन कप लिंबू, मध पाणी पिणे.

 

detox body inmarathi

 

या पाण्यात ॲण्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे ब्रेकआऊटवर परिणाम करतात. लिंबू आणि मध त्वचेतल्या तेलाचं संतुलन राखण्यास मदत करतात. लिंबू, मध, पाणी नियमित सेवन केल्यानं तुमची त्वचा इतकी मृदु मुलायम आणि तुकतुकीत दिसेल की महागड्या क्रिम्स आणि लोशन्सची गरजच उरणार नाही.

रोगप्रतिकारक शक्तीचा साठा

कोमट पाण्यात मध आणि लिंबू पिळून प्यायल्यानं रोगप्रतिकारकशक्ती ताबडतोब वाढण्यास मदत होते.

कॉमन फ़्ल्यू, सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी याचं नियमीत सेवन नक्कीच फायदेशीर ठरतं.

हे ही वाचा – रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःहून रोगाला आमंत्रण देणे

 

cold inmarathi

 

सूज उतरविण्यासाठी

किरकोळ दुखापतींमुळे सूज आली असेल तर कोमट पाणी, लिंबू, मध फ़ारच उपयुक्त ठरतं.

 

feet swelling inmarathi

 

याचबरोबर जखमेवर होणारा संसर्ग यातील ॲण्टिबॅक्टेरियल गुणधर्मामुळे टाळता येतो.

अतिरिक्त पाण्याचा निचरा

शरीरात पाण्याचं अतिरिक्त प्रमाण झाल्यास अनेक समस्या उदभवण्याची शक्यता असते. जसं की उच्च रक्तदाब ज्यामुळे ह्रदयविकारांसारखा धोका निर्माण होतो.

मुळात जर हे शरीरातील अतिरिक्त पाण्याचं प्रमाण नियंत्रणात राहिलं तर फायद्याचं ठरतं. यासाठी उपयोगाला येतं, कोमट पाणी लिंबू आणि मध.

याच्या सेवनानं लघवीवाटे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडतं आणि शरीराला हलकेपणा तर येतोच शिवाय रक्तदाबावरही नियंत्रण राखता येतं.

बध्दकोष्ठतेवर उपाय

ज्यांना बध्दकोष्ठतेचा त्रास आहे अशांनी नियमीतपणे कोमट पाणी आणि मध-लिंबू प्यावे. याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

 

constipation inmarathi

 

गरम पाण्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शौचाचा कडकपणा जाऊन बध्दकोष्ठतेपासून आराम मिळतो.

वजन कमी करण्यासाठी

हे मिश्रण पोटात अल्कलाईन स्थिती निर्माण करत असल्यानं वजन झटपट उतरण्यास मदत होते.

हे पाणी मुळात पचन शक्ती सुधारण्यास मदत करते त्यामुळे भूक व्यवस्थित लागते, मेटाबोलायझम सुधारतो आणि न पचलेलं शरीराबाहेर काढून टाकल्यानं त्याचं अतिरिक्त मेदात रुपांतर होणं टळतं. तसेच, यातील पेक्टिन नावाचं फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवते.

 

shilpa shetty InMararthi

 

मोठ्या आतड्याचं कार्य कोमटपाणी, लिंबू, मधाच्या सेवनानं सुधारतं. त्यांना चालना देतं, स्वच्छता करतं यामुळे कर्करोगासारख्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.

मुखदूर्गंधीवर उपाय

हे मिश्रण मुखातील दूर्गंधी दुर करतं. तोंडात राहिलेल्या अन्नकणांमुळे जीभेवर जो पांढरा थर निर्माण होतो त्यामुळे ही दुर्गंधी येते.

कोमट पाणी-मध-लिंबू ही दूर्गंधी नैसर्गिकरित्या दूर करतं.

 

mouth-smell-inmarathi

 

कोमट पाणीच का?

मध कधीही गरम पाण्यातून सेवन करू नये. कारण अतीउष्णतेच्या संपर्कात मध आल्यानं त्यात विषारी घटक उत्पन्न होतात.

मात्र दुसर्‍या बाजूला मधातील गुणधर्मांचा पूर्ण फायदा करून घ्यायचा असेल तर ते एका विशिष्ट तापमानाला येणंही आवश्यक असतं. म्हणूनच मध नेहमी कोमट पाण्यासोबत सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

 

lemon honey inmarathi

 

कोमटचा अर्थ अगदी किंचित गरम असा आहे. अगदी गारही नाही किंवा चटका बसेल असं गरमही नाही.

मध-लिंबू-पाणी कसं घ्याल?

एक मोठा ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चहाच्या चमचाइतका मध घालून एकत्र करा.

हे पाणी सेवन केल्यानंतर किमान अर्धा तास तरी काहीही खाऊ, पिऊ नये.

सर्वात महत्वाचं म्हणजे महाग असला तरिही चालेल मध शुध्द स्वरूपातीलच वापरावा. म्हणूनच मधाची निवड करताना ती काळजी पूर्वक करा.

शुध्द मध कसा ओळखाल ?

१ स्फटिके

मध तयार होताना त्यातील पाण्याचा अंश कमी होतो आणि मध अधिकाधिक घट्ट होतो. मधाच्या बाटलीत तळाशी स्फ़टिक रूपात मध आढळतो.

२ शुध्द मध पाण्यात विरघळत नाही

शुध्द मध चिकट आणि घट्ट असतो त्यामुळे तो सहज पाण्यात विरघळत नाही.

 

honey-marathipizza

 

ग्लासभर थंड पाण्यात मध टाकल्यास तो जर आधी तळाशी गेला तर मध शुध्द आहे मात्र तो जर भेसळयुक्त असेल तर न ढवळताच पाण्यात मिसळून जाईल.

३ मधाची शुध्दता तपासण्याचा सोपा उपाय म्हणजे मध कागदावर टाका. काहीवेळ तो तसाच राहूद्या. मध शुध्द असेल तर कागद भिजून ओला होणार नाही. भेसळयुक्त असेल तर कागद ओला होईल.

४ तर्जनी आणि अंगठा यामधे मध घेऊन काहीवेळ मध घासा. तो हळुहळू बोटात जिरेल आणि उरलेलं मध चिकट वाटणार नाही. जर बोटाला चिकटपणा आला तर भेसळ असलेलं मध असेल कारण मधात साखरेची भेसळ असते.

५ अस्सल मधात पाण्याचा अंश नसल्यानं मधात कापसाचा बोळा बुडवून तो पेटवला तर आवाज न करता पेटेल. जर चुरचुर असा आवाज आला तर त्यात भेसळ आहे असं समजा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?