' दररोज १०,००० पावले चाललात तर छानच! पण निम्मे चाललात तरी पुरेसे आहे...

दररोज १०,००० पावले चाललात तर छानच! पण निम्मे चाललात तरी पुरेसे आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल आपल्याला सर्रास ऐकू येते की मी इतके इतके किमी रोज चालते, इतकी पावले चालतो. लोक स्वतःच्या आरोग्यबाबत आता जागरूक झालेले दिसून येतात पण नेमके किती वेळ चालावे अथवा किती किती किमी चालावे ह्यात काही लोक संभ्रमात आहेत.

चालायच्या बाबतीती अनेक लोकांची वेगवेगळी मते आहेत जगभरात अनेक संशोधनं झालेली आहेत त्यावरून एकच निष्कर्ष निघतो कि जितके चालला तितके आरोग्यसाठी चांगले.

 

walking featured inmarathi

 

इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज तुम्ही चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नक्की किती चालावे?

साधारणपणे रोज तीस मिनिटे चालल्यास २०० कॅलरी बर्न होतात. एकट्याने चालणे कंटाळवाणे वाटत असल्यास मित्र-मैत्रिणीसोबत चालण्यास सुरुवात करावी. सुरुवातीला कमी वेळ आणि अंतर चालून, हळू हळू सकाळ-संध्याकाळ ३० मिनिटे चालायला सुरुवात करणे फायदेशीर असते.

===

हे ही वाचाकुणीही करू शकेल इतके सोपे ८ व्यायामप्रकार मधूमेहापासून १००% दूर ठेवतात…

===

वेळ कमी असल्यास घरच्या घरी किंवा सोसायटीमध्ये रात्री जेवल्यानंतर किंवा सकाळी अर्धा तास तरी चालावे. अ‍ॅपच्या साहाय्याने रोज किती चालतो हे मोबाइलवर किंवा पेडोमीटरवर तपासण्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे. त्याचा योग्य वापर करता येईल.

१६ ते १७ वयोगटातील मुलामुलींसाठी कमीत कमी १२ हजार ते १५ हजार पावले चालणे आवश्यक आहे. १८ ते ४० वयोगटातील पुरुषांनी दररोज १२ हजार पावले आणि महिलांनी देखील निदान तेवढीच पावले चालणे आवश्यक आहे.

 

walking 2 inmarathi

 

४० ते ५० वयोगटातील पुरुष आणि महिलांनी कमीतकमी दिवसातून ११ हजार पावले तरी चालले पाहिजे.

१९६४ च्या टोकियो ऑलिंपिकच्या काही दिवस आधी करण्यात आलेल्या एका मार्केटिंग कॅम्पेनमध्ये १० हजार पावले या मॅजिक फिगरचा जन्म झाला.

एका कंपनीने Manpo-kei नावाचं पेडोमीटर यंत्र बाजारात आणले. यातल्या ‘Man’ चा अर्थ १० हजार, ‘Po’ म्हणजे पावले आणि ‘kei’ म्हणजे मीटर. अल्पावधीतच हे यंत्र फारच लोकप्रिय झाले आणि लोकांच्या मेंदूत १०००० ही संख्या नोंदली गेली.

तेव्हापासून वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये ५००० पावलांचे लाभ विरुद्ध १०००० पावलांचे लाभ, यांची तुलना करण्यात आली. यात अर्थातच मोठी संख्या विजयी ठरली.

मात्र, या दोन संख्यांच्या मधल्या आकड्यांचे काय? त्यावर अगदी आता आतापर्यंत अभ्यास झाला नव्हता.

इतकंच नाही तर सर्वसामान्य प्रौढांवर अजूनही अभ्यास करण्यात आलेला नाही त्यामुळे त्यातला त्यात एक सुवर्णमध्य आपण काढू शकतो की शक्यतो दिवसाला ६ ते ८ हजार पावले चालणे गरजेचे आहे.

फायदे :

१) हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू राहते, रक्ताभिसरण सुधारते व रक्तदाब नियंत्रणात राहतो.

 

heart patient inmarathi

 

२) वाढत्या वयात आपले स्नायू कमकुवत होतात. चालण्याने या स्नायूमध्ये अधिक ताकद येते. हाडांमधील ठिसूळपणा कमी होतो.

३) रोजच्या चालण्याने पचनशक्तीदेखील सुधारते. जेवल्यानंतर शतपावली करण्याचे हेच कारण आहे.

४) चालण्याने फुप्फुसाची क्षमता वाढते. शरीराला अधिक प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. तुमची कार्यक्षमता वाढते.

५) चालणे या व्यायाम प्रकाराने शरीराची आणि मनाची मरगळ निघून जाते. मनातील ताणतणाव, नराश्य कमी होते आणि ताजेजवाने वाटते.

६) चालण्याने मेंदू व मज्जासंस्था तणावरहित होतात. विचारांना चालना मिळते. स्मृतिभ्रंश व वृद्धत्व अशा आजारांची बाधा शक्यतो होत नाही.

७) चालण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते जेणेकरून आजारांशी सामना करणे सोपे जाते.

 

immune system inmarathi

 

नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा शरीराला होणारा पुरवठा होतो.

हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले ‘डी’ जीवनसत्व सकाळच्या उन्हातून मिळते.

====

हे ही वाचा सुपरफिट व्हायचंय? येत्या वर्षात या “२५” गोष्टी लक्षात ठेवा आणि “जिम”शिवाय उत्तम आरोग्य मिळवा..!

काळजी काय घ्याल?

चालताना शक्य असल्यास बुटांचा वापर करा, शक्यतो अनवाणी चालू नका जखम व्हायची शक्यता असते. गवतावर किंवा मातीवर चालल्यास जास्त फायदेशीर ठरेल.

गुडघेदुखी ,सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच चालावे. सर्वसाधारण व्यक्तीने चालताना खूप जोरात अथवा खूप हळू चालू नये.

 

knee problems inmarathi

 

ह्या सगळ्या लेखातून आपल्या मराठी म्हणीची आठवण होते ती म्हणजे  ‘वाचाल तर वाचाल’ त्यालाच अनुसरून असे म्हणता येईल ‘चालाल तरच वाचाल’!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?