' वायरलेस चार्जिंगच्या टेक्नॉलॉजीत होतेय क्रांती! वाचा या नव्या अनोख्या चार्जरबद्दल...

वायरलेस चार्जिंगच्या टेक्नॉलॉजीत होतेय क्रांती! वाचा या नव्या अनोख्या चार्जरबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मानवाच्या मुख्य गरजा कोणत्या.? शाळेत शिकत असलेली मुलं पण याचं ठरलेलं उत्तर देतील. – अन्न, वस्त्र आणि निवारा! तुम्ही म्हणाल हा कॉमन सेन्स आहे. त्यात काय नवीन?

आता यात भर पडली आहे ती मोबाईल, इंटरनेट आणि इतर तत्सम टेक्नॉलॉजिकल डिव्हाईसेसची. खोटं वाटत असेल तर स्वतःचेच परीक्षण करून बघा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतपर्यंत, माणूस जेवतो कमी आणि इंटरनेटवर वेळ जास्त घालवतो.

असो, आधी डेटा ट्रान्स्फर करण्यासाठी फ्लॉपी असायच्या, मग सीडी आल्या. त्यानंतर मग डीव्हीडी आल्या.आता हे सगळं काळाच्या पडद्याआड जायच्या मार्गात आहे. आता पेनड्राइव्ह आलेत तेसुद्धा १ टीबी कॅपसीटीचे.!

 

pendrive-inmarathi

 

मोबाईल टू मोबाईल डेटा ट्रान्स्फरमध्ये सुद्धा खूपच वेगवान क्रांती झाली आहे. आधी इन्फ्रारेड, मग ब्ल्यूटूथ, त्यानंतर वायफाय टेक्नॉलॉजीच्यामार्गे झेंडर आणि शेअर इट सारख्या अॅपमधून मोठमोठ्या डेटा फाईल्स हेदेखील शेअर व्हायला लागलं आहे.

आता एवढा मोठा डेटा प्रोसेस करायला त्या कॅपसीटीचा प्रोसेसर पण मोबाईलमध्ये वापरले जाऊ लागले आहेत. स्नॅपड्रॅगनची ८०० सिरीज तयारच झाली वेगवान प्रोसेसिंग साठी! आजच्या घडीला त्यांचाच ८८८ प्रोसेसर तुफान वेगवान असल्याचं म्हटलं जातं.

आता प्रोसेसिंग म्हटलं तर उत्तम आणि जास्तवेळ टिकणारी बॅटरी हवी. २००० एमएएच असलेली बॅटरी आता ७००० एमएएच पर्यंत पोहोचली. बॅटरी कॅपसीटी वाढली, त्याचबरोबरीने त्याला वेगात चार्ज करण्यासाठीची टेक्नॉलॉजी सुद्धा येऊ लागली. वनप्लसचं डॅश, रियलमीचं वोक, मोटोरोलाचं टर्बो अशांसारखे नवनवीन फास्ट चार्जिंगचे तंत्रज्ञान बाजारात आले.

 

fast-charging-inmarathi

 

फास्ट चार्जिंगनंतर वायरलेस चार्जिंगची संकल्पना अस्तित्वात आली. यात नावाला वायरलेस असलेल्या एका चार्जिंग मॉड्युलवर मोबाईल ठेवून तो चार्ज करावा लागायचा. मोबाईलला पिन कनेक्ट करायची नाही एवढाच त्याचा काय तो त्याचा उपयोग!

ऍपलच्या आधी अनेक कंपन्यांनी हे केलं आहे. पण आयफोनच्या डब्ब्यातून चार्जर गायब झाल्यापासून वायरलेस चार्जिंगवर सगळ्याच कंपनीज मेहनत घेत असल्याचं आज दिसून येत आहे.

चीनच्या शाओमी या कंपनीने या सगळ्यांच्या पुढे एक पाऊल टाकून वायरलेस चार्जिंग म्हणजे काय असतं ते जगासमोर आणलं.

वायरलेस म्हणजे काय तर कुठल्याही केबल किंवा अडॅप्टर शिवाय मोबाईल चार्ज होणं. याच संकल्पनेवर आधारित असलेला शाओमीचा ‘मी एयर चार्ज’ ही रिमोट चार्जिंग टेक्नॉलॉजी जगासमोर आली आहे. शाओमीने ट्विटरवर एक ट्विट करून याबाबत माहिती शेअर केली आहे.

या टेक्नॉलॉजीमुळे एकावेळी अनेक डिव्हायसेस चार्ज होऊ शकतात. तुम्ही गेम खेळत असाल, नेटवर सर्फिंग करत असाल किंवा आपली नेहमीची इतर कामं करत असाल, तरीही तुमचा मोबाईल चार्ज होतच राहणार आहे. कोणत्याही केबलच्या शिवाय, कोणत्याही चार्जिंग पॅडवर न ठेवता.

 

wireless-charging-inmarathi

 

शाओमीच्या या तंत्रज्ञानाकडे टेक इंडस्ट्रीमधले जाणकार ‘क्रांती’ म्हणून बघत आहेत. केवळ मौखिक असलेली ही टेक्नॉलॉजी आता सत्यात उतरत असल्याने हे विचार येणं आपसूकच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

जसं घरात गेल्यावर आपलं वायफाय ऑन असल्यावर घरातल्या नेटवर्कला ते आपोआप कनेक्ट होतं, तसंच आता या टेक्नॉलॉजीमुळे काही लिमिटेड मीटर अंतरावर तुम्ही आलात की तुमचा मोबाईल आपोआप चार्ज व्हायला सुरुवात होईल.

नेमकं या टेक्नॉलॉजीमध्ये कशापद्धतीने चार्जिंग होईल, किंवा हे चार्जर काम कसं करेल हे शाओमीने गुलदस्त्यात ठेवलेलं असलं, तरी ट्रेंडमध्ये असलेल्या डेमो व्हिडीओच्या माध्यमातून याचा थोडाफार अंदाज लावता येऊ शकतो.

आपल्या प्लगला कनेक्ट असलेला चार्जर त्याच्या भोवती असलेल्या डिव्हाईसला कनेक्ट होऊन त्याला चार्ज करायला सुरुवात करेल. सध्या ही चार्जिंग पॉवर ५ वॅट एवढी असेल. जी भविष्यात वाढू शकेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा – मोबाईलची बॅटरी लवकर संपल्यामुळे होणारी धांदल-गैरसोय-चीडचीड टाळा, या टिप्स वापरा!

चार्जरमध्ये असलेला अँटेना मोबाईल डिव्हाईसला कनेक्ट होऊन त्याच्या लोकेशनची खात्री करून घेईल. त्यानुसार मोबाईलशी कम्युनिकेशनचा सिग्नल निर्माण करून वाईड वेव्ह मोबाईलच्या दिशेने सोडायला सुरुवात करेल. मोबाईलमध्ये असलेला अँटेना, या लहरी स्वीकारण्याचं काम करेल. या लहरी ना पुन्हा इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये बदलल्या जातील आणि मोबाईल चार्ज व्हायला सुरुवात होईल.

ढोबळमानाने नेमकं काय होणार याचा अंदाज जरी लावता येत असला तरी कंपनी नेमकं काय सांगणार आहे, याकडे सगळ्या टेक दुनियेची नजर आहे.

जस वायफाय मुळे आता डेटा वायरलेस पद्धतीने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे, तसंच आता वायरलेस चार्जिंगच्या नव्या पायरीवर मोबाईल चार्जिंगचं भविष्य उभं असल्याचं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

 

wireless-charging-inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?