' मिंत्राच्या “M” वरून वाद झाला खरा, मात्र त्यानंतरचे हे ७ वादग्रस्त लोगो माहित आहेत का? – InMarathi

मिंत्राच्या “M” वरून वाद झाला खरा, मात्र त्यानंतरचे हे ७ वादग्रस्त लोगो माहित आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशात ब्रॅंडेड गोष्टींना बरच प्राधान्य दिलं जातं. जीन्स घ्यायची तर लिवाईजची, लॅपटॉप किंवा मोबाईल घ्यायचा तर अॅपलचा, गाडी घ्यायची तर स्कोडाची इथपासून ते अगदी आपल्या टुथपेस्टचे सुद्धा ब्रॅंड ठरलेले असतात.

हे ब्रॅंड आपल्या लक्षात राहण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा विशिष्ट लोगो. या लोगोचं महत्व काय ते आपल्याला आणखीन समजावून सांगायची गरज अजिबात नाही. 

आज पाळण्यातल्या बाळाला सुद्धा आयफोन कोणता हे त्यामागच्या लोगो वरूनच समजतं. त्यामुळे ब्रॅंड आणि त्यांचे लोगो आपल्यावर नेमका काय प्रभाव टाकतो हे आपण बघितलंच आहे!

गेल्या दोन तीन दिवसापासून चालू असलेला आणि सर्वात चर्चिला जाणारा विषय म्हणजे मिंत्रा लोगो controversy!

 

myntra inmarathi

 

कुठल्याही गोष्टीकडे चौकसदृष्ट्या बघायची सवय तशी आपल्याकडे आहे, मग अगदी घरातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते अगदी कंपनीच्या लोगो पर्यंत.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फक्त जाहिरातींचा भडीमार न करता आपली कंपनी लक्षात राहावी ह्यासाठी कंपन्यानी लोगो नामक प्रकार जन्माला घातला. जेणेकरून तो लोगो पाहून लोक आपली कंपनी ओळखतील.

जगभरात आज अनेक दिग्गज ब्रँड शंभर वर्षांपासूनअस्तित्वात आहेत, ते त्यांच्या लोगो मुळेच ओळखले गेले आहेत मग ते मॅकडोनाल्ड असो किंवा आजकाल लोकांच्या हातात असलेला आयफोन असो. लोगो हा त्या कंपनीचं प्रतिनिधित्व करतो.

हे ही वाचा – सर्रास ऑनलाईन शॉपिंग करताय..ह्या ६ गोष्टी ऑनलाईन घ्यायचं शक्यतो टाळा!

नक्की प्रकरण काय?

जेव्हा पासून भारतात ई-कॉमर्स व्यवसाय जोमाने सुरु झाला तेव्हा पासून myntra कंपनी अस्तित्वात आहे, फ्लिपकार्ट ही त्यांचीच पॅरेन्ट कंपनी.

मुद्दा असा की ओवेस्ता फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या नाझ पटेल यांनी डिसेंबर २०२० मध्ये मिंत्राच्या लोगो महिलांविषयी अपमानजनक आणि आक्षेपार्ह असल्याचे समजल्यामुळे तक्रार दाखल केली होती.

 

myntra 3 inmarathi

 

त्यावर मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, महिलांसाठी हा लोगो अपमानजनक आहे, असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर कंपनी ला ई-मेल पाठवला गेला व त्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापनाने एक महिन्यात लोगो बदलण्याचे आश्वासन दिले व त्यानुसार त्यांनी सर्व ठिकाणचे लोगो बदलले आहेत.

नेटकरी काय म्हणतात?

असल्या गरमागरम विषयावरून सोशल मीडियावर लगेचच ट्रोलिंग करणे चालू झाले. नेटकरी मंडळींनी मॅडमना ट्रोल करून त्यांना इतर कंपन्यांचे आक्षेपार्ह लोगो दाखव्याला सुरवात केली.

त्यांचे असे म्हणणे आहे की फक्त myntra चाच लोगो दिसला का? बायजूचा लोगो, मास्टरकार्ड अगदी दूरदर्शन सारख्या लोगोला सुद्धा नेटकाऱ्यानी सोडले नाही.

७० च्या काळातला दूरदर्शन च्या लोगोही आज ह्या विषयावरून चर्चेत आला आहे.

 

doordarshan inmarathi

 

फार्मासिटिकल कंपन्या मध्ये अग्रगण्य असलेली लुपिन कंपनी त्यांचा लोगो पुरुषांसाठी आक्षेपार्ह आहे असे ही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे!

 

lupin inmarathi

 

ऑनलाइन क्लासेस घेणाऱ्या बायजु सरांनी थेट कंपनी सुरु करून स्वतःचेच नाव दिले पण त्यांचा लोगो आता ट्रोल होत आहे.

 

byju inmarathi

 

रोजच्या वपरातले gmail आणि त्यांचा लोगो हा साधारण मिंत्रा सारखाच आहे म्हणून तो ही बदलावा अशी मागणी आहे.

 

gmail logo inmarathi

 

airbnb लाही ट्रोल केले जात आहे व लोगो बदलावा अशी मागणी होत आहे.

 

air bnb inmarathi

हे ही वाचा – ऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात

एखादी कंपनी ही त्यांच्या लोगोवरून जरी ओळखली जात असली तरी आपण काय लोगो बनवतो व त्याचा आपल्याच ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार आता प्रत्येक कंपनी करेल अशी अशा आहे.

बाकी अश्लील विनोद, भाषा सर्रास सोशल मीडियावर बोलली जाते त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

शेवटी काय आपण एखादी गोष्ट करतो त्यावर आपला विचार वेगळा असतो आणि बघणाऱ्याचा विचार वेगळा असतो कोणाला दगडात पण मूर्ती दिसते तर कोणाला फक्त दगडच दिसतो, अपनी अपनी सोच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?