' या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार'!

या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हंटलं की आपल्यासमोर उभी राहते ती चंदेरी दुनिया, ग्लॅमरचं वलय, ऊंची कपडे, राहणीमान आणि त्यांच्यामागे फिरणारे मीडिया रिपोर्टर्स.

हा सगळा तामझाम पाहिल्यावर प्रत्येकाला बॉलिवूडमध्ये यायची इच्छा होते. पण या सगळ्यामागे त्या सेलिब्रिटीजची मेहनत फार कमी लोकांना माहीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शाहरुख, अक्षय कुमार सारख्या सेल्फमेड स्टार्सपासून रणबीर कपूर, आलिया भट सारख्या कित्येक स्टारकिड्सचा अनेकांना हेवा वाटतो. आपल्या लोकांनी वेळोवेळी या अभिनेत्यांना प्रेम, सपोर्ट दिला आहे, तसंच गरज पडेल तेंव्हा त्यांना त्यांची जागा सुद्धा दाखवली आहे.

पण एकंदरच आपल्या देशातलं सिनेमावेड पाहता गॅंग्स ऑफ वासेपूर मधल्या रामधीर सिंगचा तो डायलॉग नक्की आठवतो तो म्हणजे “जब तक हिंदुस्तान में सिनेमा है तब तक लोग #### बनते रहेंगे!”

 

ramadhir singh inmarathi

 

पण या ग्लॅमरच्या दुनियेत असेही काही सेलिब्रिटीज होते ज्यांचा या क्षेत्राशी काही संबंधसुद्धा नव्हता, कसली फॅमिली बॅकग्राउंड देखील नव्हतं, तरी त्यांनी वेगवेगळ्या सिनेमातून पुढे यायचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्यांना पहिल्या प्रयत्नातच नाकारलं!

आज आपण अशाच काही अयशस्वी बॉलिवूड सेलिब्रिटीजबाबत जाणून घेणार आहोत!

१) रघु राम – राजीव लक्ष्मण :

 

raghu rajiv inmarathi

 

भारतात टेलिव्हिजनवर एकता कपूर नंतर क्रींज कंटेंट जर कुणी सुरू केला असेल तर तो म्हणजे रघु – राजीव या जोडीने! रोडीज हा टीव्ही शो कुणाला माहीत नसेल अशी व्यक्ती सापडणं कठीणच.

एकंदरच तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हा शो चालू केला गेला ज्यात बीभत्स भाषा आणि भयानक स्टंटस तुम्हाला खूप बघायला मिळतील.

या शोचे निर्माते आणि सर्वेसर्वा म्हणजे रघु – राजीव. या एकंदर शोमुळे ते दोघे बरेच चर्चेत आले. आणि टेलिव्हिजन मधून थेट शिरीष कुंदर याच्या ‘तीस मार खान’ या सिनेमासाठी या दोघांना एका विनोदी भूमिकेत घेण्यात आलं.

===

हे ही वाचाभरपूर चर्चेत आलेल्या ११ हिंदी चित्रपटांच्या या रंजक गोष्टी जाणून घ्या!

===

या सिनेमात प्रमुख भूमिकेत अक्षय कुमार कतरिना कैफ होती. सिनेमा तसा आपटलाच पण या दोघांनासुद्धा लोकांनी पहिल्या नजरेतच नापसंत केलं. यापुढे त्यांनी सिनेमाची वाट कधीच धरली नाही!

२) विजेंदर सिंग :

 

fugly inmarathi

 

भारताला ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवून देणाऱ्या तूफान बॉक्सर विजेंदर सिंग याने सुद्धा बॉलिवूड मध्ये पदार्पण करायचा प्रयत्न केला. पण फगली हा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर एवढा फ्लॉप गेला की आपण बॉक्सिंगकडेच वळलेलं बरं असं समजून त्याने कधीच पुन्हा सिनेमात काम केलं नाही!

सध्याच्या बॉलिवूडमध्ये टॉप लिस्ट मध्ये असलेल्या कियारा अडवाणी या अभिनेत्रीचा हा पहिला सिनेमा होता!

 

३) हिमेश रेशमिया :

 

himesh reshamiya inmarathi

 

स्वतःच्या विचित्र आवाजामुळे एकेकाळी फेमस झालेला म्युझिक कंपोजर म्हणजे हिमेश रेशमिया. इम्रान हाशमीच्या बऱ्याच गाण्यांना यानेच संगीत आणि आवाज दिला. एक काळ असा होता जेंव्हा हिमेशकडे ढीगभर सिनेमे होते.

पण लोकांना नंतर नंतर त्या आवाजाचा आणि त्याच्या संगीताचा तिटकारा येऊ लागला, मग त्याने आपला मोर्चा सिनेमाकडे वळवला. स्वतःच निर्माता, दिग्दर्शक, म्युझिक कंपोजर, अभिनय असा आव आणून त्याने बरेच सिनेमे केले.

त्याच्या एकाही सिनेमाकडे लोकांनी ढुंकुनही पाहिले नाही.

हिमेश रेशमियाची सिनेमात काम करण्याची हौस म्हणजे लहान मुलाच्या वागण्यासारख झालं ‘ बॅटही माझी, बॉलही माझा, बॅटिंगसुद्धा मीच करणार आणि अंपायर सुद्धा मीच!”

 

४) सोनू निगम :

 

sonu nigam inmarathi

 

ज्या आवाजाने ९० पासून आपल्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असा सोनू निगम म्हणजे संगीत क्षेत्रातला बच्चन. संगीतात त्याचा हात धरायचं धाडस कुणीच करू नये.

आज जरी सोनू निगम खूप काम करत नसला तरी तो अधून मधून लोकांना त्याची गाणी आपल्या कानावर पडतातच. पण या अशा गुणी गायकाला सुद्धा अभिनयाचा मोह आवरता आला नाही.

‘जानी दुश्मन: एक अनोखी प्रेम कहानी’ तसेच ‘लव्ह इन नेपाल’ अशा सिनेमातून सोनूने अभिनयाचा प्रयत्न केला खरा पण लोकांच्या ते पचनी पडलं नाही आणि मग त्याने अभिनयातून काढता पाय घेतला!

५) अजय जडेजा :

 

ajay jadeja inmarathi

 

क्रिकेट विश्वातलं एक ग्लॅमरस नाव म्हणजे अजय जडेजा. तो सध्या कॉमेंट्रीसाठी प्रसिद्ध असला तरी एकेकाळी अजय जडेजा म्हणजे एकेकाळचा क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत. मॅच फिक्सिंगमध्ये सुद्धा त्याचं नाव आलं आणि त्याचं क्रिकेट करियर पार बरबाद झालं!

त्यानंतर त्याने अभिनयात नशीब आजमवायचा प्रयत्न केला. सनी देओल, सुनील शेट्टी, सेलीना जेटली यांच्यासोबत ‘खेल’ या सिनेमात अजयने काम केलं. पण या सिनेमाने त्याच्या अभिनयातला खेळ कायमचा संपवला!

 

६) यो यो हनी सिंग :

 

yo yo honey singh inmarathi

 

काही वर्षांपूर्वी रिमिक्स आणि रॅपचं वारं देशभर घुमत होतं. या वाहत्या गंगेत हात धुवून घेणारा आणखीन एक माणूस म्हणजे रॅपर हनी सिंग. काही लोकं म्हणतात की पंजाबी मध्ये त्याने केलेले रॅप खरंच चांगले आहेत.

पण लोकांसमोर त्याची जी गाणी आली त्यातून अश्लीलतेचच दर्शन घडलं, आणि लोकप्रिय असूनसुद्धा त्याच्यावर बरीच टीकादेखील झाली, पण लोकांनी त्याची गाणी डोक्यावर घेतली!

===

हे ही वाचास्क्रिनवर दिसणाऱ्या बॉलिवूडमागील लपवलेला, भयानक, काळाकुट्ट इतिहास!

===

हिमेश रेशमियाच्या ‘द एक्सपोज’ या सिनेमातून त्याने अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं. त्याची निवड तर चुकलीच कारण हिमेशच्या सिनेमातून पदार्पण करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखंच होतं!

 

७) अंगद बेदी :

 

angad bedi inmarathi

 

राज्यस्तरावर खेळणारा क्रिकेटर म्हणजे अंगद बेदी. पण का कुणास ठाऊक त्याने त्याच्या क्रिकेटमधल्या करियरला रामराम ठोकून अभिनयात करियर करायचं ठरवलं!

पिंक सारख्या सिनेमातून किंवा इनसाईड एज या सिरिजमधून त्याने अभिनयाचा प्रयत्न केला खरा, पण त्यातून त्याला लोकांच्या मनावर छाप पाडता आलेली नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?