' मधुमेहावर ‘चहा’ ठरेल अत्यंत गुणकारी! बघा या चहाचे इतर आरोग्यदायी फायदे! – InMarathi

मधुमेहावर ‘चहा’ ठरेल अत्यंत गुणकारी! बघा या चहाचे इतर आरोग्यदायी फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

डायबिटीस.. मधुमेह हा आजार आजकाल सर्रास झालेला आढळतो. पूर्वी या आजाराची वयोमर्यादा पन्नास साठ वर्षे होती, पण आजकाल हा आजार चाळीशीच्या आतच उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

काहीजणांना तर जन्मतः डायबिटीस असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते ही सोपी माहिती…एका ओळीत! त्यांचे परिणाम म्हणून शरीराची कार्यक्षमता कमी होते. खूप लवकर थकवा येतो.. हृदयाची कार्यक्षमता कमी होते. मग हृदयविकार होण्याची शक्यता बळावते.

 

sugar test inmarathi

 

डायबिटीस शरीरातील प्रतिकारशक्ती पण कमी करतो. गेल्या वर्षी संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोविडचे बळी गेले त्यातील बहुतांश लोक हे शुगर किंवा बीपी पेशंट होते. प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे या रोगाला पट्कन शरीर बळी पडलं आणि कितीतरी लोक मृत्युमुखी पडले.

 

 

शुगर वाढली की रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास संभवतात. वारंवार लघवीला जावे लागते, अंगाला खाज सुटते, थकवा येतो वगैरे वगैरे.

 

diabetes symptoms inmarathi

हे ही वाचा – वेळेला चहा लागतो हे मान्यच पण ही गोष्ट देखील त्यासोबत करत जा….

काही रोग येतात..काही दिवस मुक्काम ठोकतात आणि नंतर निघून जातात, पण काही रोग असे चिवट असतात.. एकदा का आले की तहहयात मुक्काम ठोकतात. ब्लडप्रेशर, डायबिटीस, थायरॉईड ही सगळी भावंडं. एकदा आली की जायचं नांवच घेत नाहीत.

अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद चिकित्सा या सर्व प्रकारांनी औषधं घेत हे रोग कंट्रोल करता येतात पण कायमचे बरे होत नाहीत. पातळी कमी जास्त होते पण संपूर्णपणे नष्ट होत नाही.

वेगवेगळ्या पॅथी वेगवेगळ्या उपचार पद्धती सुचवतात. कडू खा… फिरायला जा.. व्यायाम करा .. याबरोबरच औषधं न चुकता घेतली तर त्रास होत नाही.

डायबिटीस होतो म्हणजे आपल्या स्वादुपिंडाकडून शरीराला आवश्यक तेवढे इन्सुलिन तयार होत नाही. मगच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. ते नियंत्रित करण्यासाठी एक उपचार पद्धती सुचवतात. ती म्हणजे GI – Glycemic index.

यात आपण खात असलेल्या अन्न पदार्थांचे प्रमाण काय ठेवले तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते हे पाहणे. काही अन्न पदार्थात कर्बोदके जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढत जाते. या पद्धतीने आपल्या जेवणातील उच्च कर्बोदके असणारे पदार्थ टाळून त्यानुसार जेवणाचा प्लॅन ज्याला आपण डाएट प्लॅन म्हणतो तो ठरवता येतो.

या पद्धतीनुसार काही पदार्थांची निवड ही साखरेची पातळी योग्य ठेवण्यासाठी केली जाते.. असे पदार्थ ज्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण अगदी योग्य आहे. उदा, लसूण! वाटलं ना आश्चर्य?

 

garlic inmarathi

 

आपण लसूण कशात वापरतो? लसणीची चटणी, मिरचीचा ठेचा, वाटण, ग्रेव्ही यात सर्रासपणे लसूण वापरला जातो. बाळाला सर्दी खोकला झाला तर लसणाच्या कुड्यांची म्हणजे पाकळ्यांची माळ त्यांच्या गळ्यात बांधतात. पालेभाजीला लसणाची चरचरीत फोडणी घातली की तिचा स्वाद बघा..या लसणाचे सेवन केल्याने बरेच फायदे होतात..

पण कच्चा लसूण खाऊन शक्यतो कुणी बाहेर जात नाहीत. कारण लसणाचा उग्र वास लवकर जात नाही. बोलताना भपकारा आला किंवा लसूण सोलला तर हाताला पण तो दर्प येत राहतो. मात्र लसणामध्ये‌ काही औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे ‘लसूण खा’ असं डाॅक्टरही सुचवतात.

लसूण तसा बाजारात सहज उपलब्ध आहे. त्याची किंमत पण फार जास्त नाही. त्यामुळे हा औषधी गुणधर्म असलेला कमी किंमतीचा स्त्रोत आहे असं म्हणायला हरकत नाही.

रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करायला लसूण मदत करतो हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजारांवर लसूण उपयुक्त आहे. त्यामुळे डायबिटीस कंट्रोल करायला सुध्दा लसूण कामी येतो. याची शक्यता जवळपास ८०% आहे.

 

eating garlic inmarathi

 

लसूण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतोच करतो, पण आर्टिरिओस्क्लेरोसिस होऊ नये म्हणून सुद्धा उपयुक्त आहे. आर्टिरिओस्क्लेरोसिस म्हणजे चरबीचे थर रक्तवाहिनीच्या आत जमून रक्तप्रवाह खंडीत होणं. हा रक्तपुरवठा कमी झाला की हृदयविकाराचा झटका येतो.

तो होऊ नये यासाठी लसूण सेवनात असला तर ते थर जमत नाहीत व हृदयविकाराची शक्यता कमी होते. यावर अजून अभ्यास चालू आहे, पण २०१४ सालचा एक अहवाल सांगतो, की लसणाचं सेवन साखरेचे प्रमाण कमी करायला उपयोगी पडतं.

त्याचबरोबर लसणात बी-६ व क हे जीवनसत्त्व असते. हे जीवनसत्त्व पचनक्रिया सुरळीत ठेवते. तर क जीवनसत्त्व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.

म्हणूनच एक नवा उपाय आजकाल लोक करताना दिसतात…लसणाचा चहा. पाण्यात मध, लिंबू आणि लसणाची पाकळी, दालचिनी, आलं टाकून बनवला की हा चहा तयार.

 

garlic tea inmarathi

 

हा चहा तुमची प्रतिकारशक्ती वाढवतो. तुमची एनर्जी लेव्हल वाढवतो. बरेच संसर्ग यामुळे टाळता येतात.

लसणाचे उपयोग-

१. प्रकृतीची काळजी घेणारा लसूण रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढू देत नाही व हृदयविकाराची शक्यता कमी होते.

२. रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

३. लसणाचे सेवन गुठळ्या किंवा शरीरांतर्गत गाठी होण्यास प्रतिबंध करते.

४. कॅन्सरच्या पेशी वाढण्यास अटकाव करतो.

५. लसणात जंतुनाशक व जंतुसंसर्ग टाळण्याचा गुणधर्म आहे.

खबरदारी-

 

garlic inmarathi

हे ही वाचा – वाघ बकरी चहा: वर्णद्वेषाने वैतागून भारतात आलेल्या गांधीजींच्या शिष्याचं अपत्य!

लसूण निसर्गनिर्मित औषधी गुणधर्म असलेलं फळ आहे, पण तो खाताना जर तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास होत असेल तर मात्र डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच लसूण का.. काय आहेत ते त्रास?

१. जळजळणे.

२. गॅसेस होणे.

३. मळमळणे.

४. उलटी होणे.

५. पोट बिघडणे.

पण अल्पमोली बहुगुणी लसूण आहारात नेहमीच ठेवायला हरकत नाही.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?