' भर मॅचमध्ये टेनिस चॅम्पियनच्या पाठीत खंजीर... करिअर कायमचं बरबाद...

भर मॅचमध्ये टेनिस चॅम्पियनच्या पाठीत खंजीर… करिअर कायमचं बरबाद…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खेळ कोणताही असो.त्यात असामान्य कामगिरी करणारा खेळाडू असतोच असतो. क्रिकेटमध्येच घ्या ना, सचिनला तर त्याच्या खेळामुळे चाहत्यांनी देवच बनवलं आहे.

टेनिसमध्ये आंद्रे आगासी, नदाल, फेडरर, जोकोविच. फुटबॉलमध्ये पेले, मॅराडोनापासून ते आजचे मेस्सी, रोनाल्डो वगैरे.

पाहिलं गेलं तर या सर्व खेळाडूंची त्यांच्या समकालीन खेळाडू सोबत स्पर्धा ही होत आली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सचिनची लारा, स्टीव्ह वॉ सोबत. आज विराट कोहलीची स्मिथ, जो रूट आणि विल्यम्सन सोबत. नदाल, फेडरर, जोकोविच यांची एकमेकांसोबत. तर मेस्सी आणि रोनाल्डो वॉर ऑल टाईम सुरूच असतं.

 

indian sportsperson inmarathi

 

पण ही स्पर्धा असते ती त्यांच्या चाहत्यांमध्ये. खेळाडूंमध्ये असं काही असतं हे सहसा दिसत नाही. त्यामुळे हेवेदावे, वादविवाद हे चाहत्यांपुरती मर्यादित असते. ज्याचा खेळ आणि खेळाडू यावर काही परिणाम होत नसतो.

पण हे सगळं खोटं ठरवलं ते महिला टेनिस खेळाडूच्या चाहत्याने. आज याच घटनेबाबत आणि त्या खेळाडूबाबत सविस्तर बघूया.

महिला टेनिसमध्ये शारापोव्हा, विल्यम्स भगिनी यांच्या यायच्या आधी राज्य केलं ते स्टेफी ग्राफने!

 

steffi graf inmarathi

 

टेनिस फॉलो करत असाल तर स्टेफी ग्राफ कोण हे वेगळं सांगायची गरज नाही. टेनिसविश्वाची एकेकाळची चॅम्पियन, टेनिस सम्राट आंद्रे आगासीची पत्नी. दिसायला ही सुंदर आणि त्यापेक्षा अप्रतिम तिचा खेळ होता. त्यामुळे अख्या जगभर तिचे चाहते पसरले होते.

तर, दिनांक ३० एप्रिल १९९३. जर्मनीच्या हॅमबर्ग शहरात सिटीजन कप या टेनिस स्पर्धेचा सामना चालू होता.

सामना चालू असताना प्रेक्षकांमधून एक प्रेक्षक सुरक्षा रक्षकांना चुकवून, स्पर्धेत लीड घेऊन खेळत असलेल्या खेळाडूवर चाकू घेऊन धावला आणि बघता क्षणीच त्याने तो चाकू त्या महिला खेळाडूच्या पाठीत भोसकला.

या घटनेने पूर्ण स्टेडियम हादरून गेलं. हल्लेखोर दुसरा हल्ला करणार तेवढ्यात प्रेक्षकांनीच त्याला अडवून धरून ठेवले.

गुंतेर पार्श नावाच्या या हल्लेखोराने ज्या महिला टेनिसपटूवर हल्ला केला ती होती तत्कालीन महिला टेनिस मधली टॉप रँकिंग खेळाडू ‘मोनिका सेलेस’.

 

monica seles inmarathi

 

हा हल्ला का झाला याची चौकशी केली गेली तेव्हा विचित्र गोष्ट जगासमोर आली.

हल्लेखोर हा स्टेफी ग्राफचा चाहता होता आणि मोनिका सेलेस ही तिचा खेळ दिवसेंदिवस उंचावत होती. ज्यामुळे स्टेफी ग्राफची पिछेहाट होत होती. हे सहन न झाल्यामुळे त्याने मोनिकावर हल्ला केल्याचं स्पष्ट झालं.

हा हल्ला मोनिकाच्या पाठीवर झाला होता. आणि कोणत्याही स्पोर्ट्सविश्वातील हा एक भयानक दिवस होता. पण या हल्ल्याने तिच्यावर मानसिक परिणाम झाला ज्यामुळे पुढे तिला ‘इटिंग डिसऑर्डर’ आजाराची लागण झाली.

तर नेमकी ही मोनिका सेलेस आहे तरी कोण?

१९९० मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जिने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून आपल्या येण्याचं बिगुल वाजवलं होतं, ती म्हणजे युगोस्लाव्हियाची महिला टेनिसपटू मोनिका सेलेस.

तिचा खेळ एवढा जबरदस्त होता की पुढच्या ११ पैकी ७ ग्रँडस्लॅम स्पर्धा मोनिकाने आपल्या खिशात घातल्या होत्या.

 

grand slam inmarathi

 

टेनिस कोर्टवरची आपली चपळता, प्रेझेंस ऑफ माइन्ड आणि धारधार खेळाने मोनिकाने टेनिस विश्वात एक नवीन बेंच मार्क तयार केला होता.

तर वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी आपल्या बाविसाव्या सिंगल खिताबाच्या दिशेने जाणाऱ्या मोनिकाने आतापर्यंत ८ ग्रँडस्लॅम जिंकले होते. त्यामुळे प्रसिद्धीच्या बाबतीत स्टेफी ग्राफ आणि ती एकाच लेव्हलला होत्या.

त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूच्या प्रेमापोटी काहीही करण्याची इच्छा मोनिकाच्या जीवावर बेतली अस म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

जेव्हा मोनिकाने आपलं पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं तेंव्हा स्टेफी ८ ग्रँडस्लॅम जिंकून महिला टेनिसमध्ये टॉपला होती.

पण १९९१ नंतर मोनिकाने जी प्रगती केली त्याने स्टेफी मागे हटताना दिसत होती. मोनिकाने आपला खेळ एवढा उंचावला की १९९१-९३ मध्ये झालेल्या ८ पैकी ७ ग्रँडस्लॅम तिने एकटीने पटकावल्या.

 

monica seles sports inmarathi

 

एवढंच नव्हे तर स्टेफी ग्राफला पछाडत टेनिस रँकिंगमध्ये अव्वल पद सुद्धा काबीज केले आणि १९९३ मध्ये मोनिकावर हा जीवघेणा हल्ला झाला.

मोनिकाच्या बाहेर जाण्याने स्टेफी समोरचा सगळ्यात मोठा अडथळा दूर झाला होता. समकालीन कोणी मोठी खेळाडू समोर नसल्याने स्टेफी ने आपल्या करियर मध्ये २२ किताब आपल्या नावे केले.

मोनिकाच्या गैरहजेरीने स्टेफीला टेनिस विश्वातील एक मोठं नाव होण्यास भरपूर मदत केली.

हल्ल्यात झालेल्या जखमेमुळे मोनिका तब्बल २३ महिने खेळापासून लांब होती. आपल्या मजबूत इच्छाशक्ती बळावर तिने १९९५ मध्ये कॅनेडियन ओपन मधून परत खेळामध्ये आपली एन्ट्री मारली.

एवढच नव्हे तर पुढच्याच वर्षी १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून आपण परत आल्याचे जगजाहीर केले. पण अनायसे हे मोनिकाचे अंतिम ग्रँडस्लॅम ठरले.

२००० साली सिडनी येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत मोनिकाने कांस्यपदक आपल्या नावे केले. पुढच्याच वर्षी म्हणजे २००१ मध्ये मोनिकाला टेनिसच्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट केले गेले.

हल्ल्यानंतर तिच्या खेळामध्ये अनेक चढउतार आले. कारकिर्दीत आलेल्या या चढउतारानंतर मोनिकाने २००८ साली टेनिसमधून निवृत्ती घेतली.

१९९३ मध्ये जर मोनिकावर हल्ला झाला नसता तर आता तिच्या नावे जेवढे ग्रँडस्लॅम आहेत त्याच्या दुप्पट तिने जिंकले असते हे आजही तिचे चाहते मान्य करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?