' व्होटर आयडी ऑनलाईन काढायचं असेल, तर हीच आहे सुवर्णसंधी! प्रक्रिया जाणून घ्या...

व्होटर आयडी ऑनलाईन काढायचं असेल, तर हीच आहे सुवर्णसंधी! प्रक्रिया जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशात निवडणुका त्या देशातील सर्वात मोठा सण असतो. ‘लोकांनी लोकांसाठी स्थापन केलेले सरकार’ अशी लोकशाहीची व्याख्या करण्यात येते.

निवडणुकांच्या माध्यमातून मतदानाचा पवित्र अधिकार प्राप्त नागरिकांकडून लोककल्याणासाठी लोकसेवक निवडले जातात.

स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते देशाच्या सर्वोच्च नेता म्हणजे पंतप्रधान निवडण्याचा अधिकार भारतीय संविधानाने आपल्याला दिला आहे.

स्त्री असो वा पुरुष, गरीब असो वा श्रीमंत या सर्वांना समान म्हणजे ‘एक व्यक्ती, एक मत देण्याचा’ अधिकार आहे. आपल्या लोकशाहीची हीच खरी सुंदरता आहे.

 

voting rights inmarathi

 

भारतातील निवडणुका या जशा आपल्या उत्सुकतेचा विषय असतो तसाच तो जगभरातील लोकांचाही उत्सुकतेचा विषय असतो. निवडणुकांचे भारलेले, मंतरलेले वातावरण, निवडणुकीदरम्यान एक वेगळेच वलय मतदार भोवती निर्माण झालेले असते.

प्रशासन सुद्धा निवडणुका निर्भय, निपक्ष, पारदर्शी व्हाव्यात यासाठी सज्ज झालेली असते. शिखर संस्थेचे पासून ते अगदी गाव पातळीवर प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन केले जाते.

  1. आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
       

याबरोबरच मतदाराच्या बाबतीतही वेळोवेळी योग्य ती खबरदारी काळजी घेण्याचा प्रयत्न होतो. जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारत देशात “निवडणूक आयोग” ही अत्यंत महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे.

२५ जानेवारी १९५० ला स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून देशांतर्गत निवडणुकांबरोबरच त्याअनुषंगाने अनेक कार्य हाती घेतले जाते. लोकशाहीतील महत्त्वाचा घटक असणारा मतदारांच्या बाबतीत माननीय निवडणूक आयोग अत्यंत गांभीर्यपूर्वक आपली पावले उचलत असतो.

 

election commission inmarathi

 

१८ वर्षावरील नागरिकांना संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यापासून ते मतदारांनी मतदान करेपर्यंत व नंतरही आयोगाकडून वेळोवेळी विविध कार्यक्रम हाती घेतले जातात.

माननीय, निवडणूक आयोगाने सन २०११ पासून मतदार जागृती मोहिमेचा भाग म्हणून २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.

याच निमित्ताने या वर्षी म्हणजे दिनांक २५ जानेवारी २०२१ आपल्या देशातील मतदारांना ई- मतदार पत्र e-EPIC उपलब्ध करून देणार आहे. EPIC आणि e-EPIC काय आहे फरक?

EPIC- हे मा. निवडणूक आयोगाने मतदार असल्याबाबतचे ओळखीचा अधिकृत ओळखपत्र आहे. जे मतदाराला काळजीपूर्वक आपल्या जवळ बाळगावे लागते. विविध शासकीय कामासाठी विशेषता मतदानासाठी हे ओळखपत्र अत्यंत गरजेचे असते.

e-EPIC- हे माननीय निवडणूक आयोगाचे मतदार असल्याचेच ओळखपत्र असून याचे स्वरूप फक्त डिजिटल आहे. म्हणजेच मतदार ओळखपत्र प्रत्यक्षात सोबत ठेवण्याबरोबरच डिजिटली सुद्धा आपल्या मोबाइल, लॅपटॉप च्या माध्यमातून स्वतः जवळ ठेवू शकतो.

 

EPIC inmarathi

 

पॅन कार्ड, आधार कार्ड अशा इतर ओळखपत्र सारखेच मतदार ओळखपत्र ही आता केव्हाही मतदारांना डिजिटली उपलब्ध असेल.

काय असेल e-EPIC (Electoral photo identity card) मध्ये?

हा PDF स्वरुपाचा सिक्युरिटी क्यूआर कोड असलेला दस्तावेज असेल. ज्यात मतदाराचा अनुक्रमांक, फोटो, प्रभाग क्रमांक इत्यादी माहिती समाविष्ट असेल.

केव्हा मिळवाल e-EPIC?

२५ ते ३१ जानेवारी दरम्यान जे नव मतदार आपले नोंदणी माननीय निवडणूक आयोगाकडे करतील त्यांना हे ओळखपत्र मिळू शकेल आणि १ फेब्रुवारी २०२१ पासून ज्या नोंदणीकृत मतदारांचा मोबाईल नंबर मा. निवडणूक आयोगाकडे आहे त्या सर्वांनाही हे ओळखपत्र मिळू शकेल.

काय आहे e -EPIC मिळविण्याची प्रक्रिया?

 

voter id process inmarathi

 

– सर्वप्रथम https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/account/login
-आपल्या मोबाईल किंवा ईमेल द्वारे नोंदणी करा.
– मेन्यू पर्यायावर जा
– e-EPIC वर क्लिक करा,
– मोबाईल किंवा ईमेल वर OTP येईल.
-त्याचे सत्यापन करा.
– e-EPIC डाउनलोड window येईल त्यावर क्लिक करा.
– तुमचे e -EPIC तयार झालेले असेल.

जर मोबाईल नंबर नोंदवलेला नसेल तर?

– E- kyc वर क्लिक करा व त्यापुढील प्रक्रिया पूर्ण करा.
– face live verification व तुमचा मोबाईल नंबर अद्ययावत करा.
– e-EPIC डाउनलोड करा.

epic download inmarathi

 

लोकशाहीचा पर्यायाने निवडणुकांचा आत्मा असलेल्या मतदार राजासाठी माननीय निवडणूक आयोग वेळोवेळी विविध सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते.

मतदारांसाठी निवडणुक फक्त निवडणूक न राहता ती सर्वसामान्यांसाठी आपुलकीची झाली पाहिजे आणि लोकशाहीचा कणा अजून सक्षम पणे ताठ राहावा यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते.

आज सर्वत्र डिजिटल क्रांतीचे पडसाद उमटत असताना माननीय आयोगानेही डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत मतदारांना ही सुविधा देऊन मतदाराचे मतदानासंबंधीचे कार्य अधिक सुकर केलेले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?