'ऑनलाईन व्यवसाय करताना या चुका केल्या, तर नुकसान अटळ आहे! वेळीच सावध व्हा

ऑनलाईन व्यवसाय करताना या चुका केल्या, तर नुकसान अटळ आहे! वेळीच सावध व्हा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या मूलभूत गरजांमध्ये ‘इंटरनेट’चा समावेश झाला आहे असं म्हणता येईल. सध्या आपण सर्वात जास्त वेळ देतो तो स्मार्टफोनला आणि सर्वात जास्त प्रश्न विचारतो ते गुगलला! सुरुवातीला फक्त करमणूक म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं, त्या अँड्रॉईडने कधी सर्वांच्या आयुष्यावर ताबा मिळवला हे आपल्याला कळलं सुद्धा नाही.

कोणताही व्यवसाय सुरू करणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे आता सोशल मीडिया आणि व्यवसाय निगडित  अॅप्लिकेशन्समुळे सहज शक्य झालं आहे. व्यवसायात टिकून राहण्यासाठी आता अधिक गरजेचं आहे ते तुमच्या कामाचा दर्जा सतत सुधारत राहणं.

माहिती स्वतःकडे ठेवण्याचा काळ कधीच संपला आहे. आता गरज आहे ती प्रत्येक माहिती ही तुमच्या कंपनीच्या वेबसाईटवर, अॅप्लिकेशन वर उपलब्ध करून देण्याची. जितकी व्यवसायात पारदर्शकता तितकी लोकांमध्ये तुमच्याबद्दल विश्वासार्हता हे नवीन व्यवसाय समीकरण म्हणता येईल.

ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करणं आता काही नवीन राहिलेलं नाही. अगदी तुमच्या आसपासच्या मंडळींनी सुद्धा व्यवसायासाठी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर केलेला तुम्हाला दिसत असेल.

 

online-business-inmarathi

 

ड्रेस मटेरियल, खाद्यपदार्थ, साड्या किंवा अशाच काही छोट्यामोठ्या गोष्टींचा व्यवसाय सुरु केलेल्या तुमच्या मैत्रिणींचे स्टेटस आणि पोस्ट तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. थोडक्यात काय, तर अगदी घरगुती किंवा छोट्या प्रमाणात सुरु करण्यात आलेला व्यवसाय सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतो.

ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करतांना सतत लोकांना अपडेट्स देत राहणं, योग्य शब्दात, योग्य फोटोसह आपल्या वस्तू किंवा सेवांबद्दल लोकांना माहिती देत राहणं हे आपण जाणतोच. २०२० हे असं एक वर्ष आपण जगलो आहोत, ज्या वर्षाने लोकांमधील अंतर वाढलं, पण जग फार जवळ आलं आहे.

आज तुम्ही जगात कुठेही बसून व्यवसाय करू शकता. तुम्ही फक्त एका ठराविक वेळात लोकांच्या संपर्कात असायला पाहिजे इतकीच अपेक्षा आहे. ऑनलाईन व्यवसाय करतांना काय करायला हवं, याचं भरपूर ज्ञान आता आपल्याकडे आहे. आता अशा गोष्टी जाणून घेऊयात ज्या ऑनलाईन व्यवसाय करतांना कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात.

१. ‘योग्य वेळेची’ वाट बघत बसणे:

इंटरनेटच्या या जगात प्रत्येक क्षण हा योग्यच आहे. तुमच्याकडे जर एखादी वस्तू किंवा सेवा उपलब्ध असेल तर त्याला कमीत कमी वेळात व्यवसायाचं स्वरूप द्या आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही जितका उशीर कराल, तितकं नुकसान तुमचंच आहे.

 

time-is-money-inmarathi

 

कोणीही हे मुद्दाम करत नाही, काहींना ‘व्यवसायिक स्वरूप’ किंवा बिजनेस मॉडेल तयार कसं करावं? प्रमोशन किती आणि कधी करावं? याबद्दल ज्ञान नसतं; ते मिळवण्यात किंवा कोणाला विचारण्यात आपण खूप वेळ दवडत असतो.

तुमच्या वस्तू किंवा सेवा जितक्या उशिरा लाँच होतील तितकी त्यासाठी स्पर्धा वाढलेली असेल. चुका तर सुरुवातीला होतातच, आपल्या ‘अति सतर्कतेला’ला लगाम घाला आणि तुमच्या व्यवसायबद्दल लोकांना सोप्या भाषेत सांगा, लोकांना ते आवडेल. ऑनलाईन व्यवसाय सुरू होईल आणि काही दिवसांतच आपल्या पायावर उभा राहील.

२. सगळंच ‘मी’ करणार:

ऑनलाईन व्यवसाय सुरू करतांना सुरुवात ही एका व्यक्तीच्या संकल्पनेने होत असते. पण, नंतर त्याला जितके लोक तुम्ही जोडत जाता, तितकं तुम्हाला यश मिळेल.

 

team-building-inmarathi

 

तुम्ही जितक्या कमी वेळात योग्य काम करायला योग्य व्यक्तींची नेमणूक कराल तितकं तुमचं लक्ष हे व्यवसाय वाढवण्याकडे राहील. जी कामं नेहमी एकाच पद्धतीने करायची आहेत, त्यासाठी तुमचा वेळ देऊ नका.

तुमच्या ऑनलाईन व्यवसायासाठी तुम्ही जर एक वेगळा वेबसाईट डिझाईनर किंवा ‘सोशल मीडिया मॅनेजर’ ठेवलात तर कामाची योग्य विभागणी होईल. तुमचं काम तुम्ही कराल. सगळे ‘सेलिब्रिटी’ लोक असंच करतात, म्हणून ते आपल्या कामावर लक्ष देऊ शकतात.

३. ‘काही तरी वेगळं’ नसणं:

सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींमुळे सर्वांच्या अपेक्षा सध्या वाढल्या आहेत. तुमच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून किंवा व्यवसायिक म्हणून ‘काहीतरी वेगळं’ नसेल तर तुम्हाला ते शोधून, तयार करून त्यावर मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी कोणाला कॉपी करायची गरज नाही, तर अभ्यास करण्याची गरज आहे.

‘तुम्ही एखादी ऑर्डर कोणाला का दिली? किंवा का दिली नाही?’ याचा विचार करा, तुम्हाला ‘काहीतरी वेगळं’ म्हणजे काय ? हे लक्षात येईल. तुम्ही व्यवसाय करत आहात तीच वस्तू किंवा सेवा पुरवणारे लोक काय करत आहेत? हे बघा आणि त्यानुसार तुमचं ‘काहीतरी वेगळं’ असलेलं बिझनेस मॉडेल तयार करा.

 

out-of-the-box-inmarathi

 

४. ‘काहीही बदल’ न घडवणे:

 

change-chance-inmarathi

 

तुमची वस्तू किंवा सेवा घेऊन किंवा न घेता जर समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडत नसेल, तर तो त्याचा वेळ तुम्हाला का देईल? हा फरक म्हणजे फार काही मोठीच गोष्ट असावी असं नाहीये. निदान ‘तुम्ही नेमकं काय देत आहात?’ हे तुम्हाला स्पष्ट असणं अपेक्षित आहे.

ऑनलाईन व्यवसायात एखादा ‘विचार’ किंवा ‘संकल्पना’ इतरांना देणं हा जरी उद्देश असेल तरीही तुमचा व्यवसाय यशस्वी होईल. प्रत्येकाला आपला वेळ, पैसा हा स्मार्ट पद्धतीने वापरायचा आहे. तुम्ही त्याला अनुसरून तुमचा व्यवसाय करा, लोकांना ते नक्की ‘क्लिक’ होईल.

हे सुद्धा वाचा – Buy 1 Get 1 Free ऑफर मागील हे धक्कादायक सत्य जाणून घ्या!

५. लोकांची मतं न ऐकणं:

तुमचा ऑनलाईन व्यवसाय कसा चालतो, ते तुम्हाला लोकांकडून येणाऱ्या अभिप्राय किंवा फिडबॅक, रिव्यू या गोष्टींवर! त्यावर जर लक्ष दिलं नाही, तर तुम्ही तुमच्या स्पर्धकांना निमंत्रण देत आहात हे लक्षात असू द्या. अभिप्राय मिळवा, सुधारणा करत रहा.

एक उदाहरण सांगायचं तर ‘गुगल’ सुद्धा अजून लोकांकडून त्यांच्या कोणत्याही नवीन अपडेट्सबद्दल माहिती घेत असतं आणि त्यात गरज असल्यास अपेक्षित बदल लगेच करतात.

 

google-inmarathi

 

तुमच्या व्यवसायाबद्दल कोणीही जर काही विरोध दर्शवणारी टिप्पणी केली असेल तर ती जास्त लोकप्रिय म्हणजेच व्हायरल होईल हे सुद्धा लक्षात असू द्या आणि प्रत्येक अभिप्राय हा गांभीर्याने घ्या.

६. ‘मोठ्या मार्केट’वर लक्ष न देणं:

तुम्ही जर मोठ्या मार्केटवर लक्ष केंद्रित न करता, मोजक्या लोकांनाच तुमच्या व्यवसायाची माहिती देत असाल, तर फार कमी वेळात तुमचे ग्राहक कमी होतील.

मोठ्या मार्केटवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला नवीन व्यवसाय संधी सतत उपलब्ध होत राहतील. तुमची कंपनी सध्या जरी छोटी असली तरीही योग्य वेळ घेऊन तुम्ही जास्त मोठ्या मार्केटसमोर जाऊ शकता.

 

companies-started-in-garage-inmarathi

 

७. ‘अवास्तव’ अपेक्षा करणं:

व्यवसाय ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, त्याला उभारी घ्यायला थोडा वेळ हा द्यावाच लागतो. ऑनलाईन गोष्टी पटकन होतात, पण व्यवसाय हा एखाद्या बाळासारखा आधी रांगत असतो आणि मग आपल्या पायावर उभा राहत असतो. तोपर्यंत संयम ठेवणं हे अपेक्षित असतं.

 

patience-inmarathi

 

हे समजून घेण्यासाठी आपण सध्या आपल्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या आणि तुमच्यापेक्षा वेगळ्या सेवा पुरवणाऱ्या व्यवसायिकसोबत त्याच्या प्रवासाबद्दल चर्चा करू शकता.

८. ‘तुमच्या वस्तू किंवा सेवेची’ आवड नसणे:

तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीच्या कामालाच व्यवसायाचं स्वरूप देता, तेव्हा काम करतांना वेगळे परिश्रम घ्यावे लागत नाहीत. एक तर आवडीचं काम करा किंवा कामाची आवड निर्माण करा.

थकलेल्या, नाराज लोकांसोबत कोणालाही व्यवसाय करायला आवडत नाही आणि तुमची ही स्थिती तुमच्या प्रत्येक संपर्क माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असते. तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्राबद्दल कायम माहिती आणि रुची घेत राहणं हे ऑनलाईन व्यवसाय करतांना सुद्धा आवश्यक आहे.

 

stay-updated-inmarathi

 

९. ‘पार्टनरशीप किंवा डीलरशीप’ ला नकार देणं:

तुम्ही पुरवठा करणाऱ्या वस्तू किंवा सेवा जर एका मर्यादेपुढे सरकत नसतील, तर योग्यवेळी आपले अंतर्गत आणि बाह्य सहकारी वाढवा. तुमचा व्यवसाय हे लोक पुढे नेतील आणि ते तुमच्या व्यवसायात रुची ठेवतात की नाही? यावरून तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं भविष्य सुद्धा लक्षात येईल.

 

partnership-inmarathi

 

१०. ‘आर्थिक तरतूद’ नसणे:

आर्थिक तरतूद म्हणजे मुबलकता किंवा पैसे उभे करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ऑनलाईन व्यवसाय जरी असला तरीही तुम्हाला ‘डोमेन’ नाव, वेब डिझाईनर, होस्ट यांना काही रक्कम ठराविक अंतराने देत रहावी लागते. याचा अंदाज घेऊनच ऑनलाईन व्यवसाय सुरू करा.

पैसे खूप जास्त असतील, तर तुम्ही सतत जाहिरात केल्याने त्याचा अपव्यय सुद्धा होऊ शकतो. तेव्हा, खूप पैसे खर्च होऊ देऊ नयेत. जास्त पैसे असतील, तर येऊ शकणाऱ्या कठीण काळासाठी साठवून ठेवण्यातच शहाणपण आहे; हे आपल्याला मागच्या वर्षाने तसंही शिकवलं आहे.

 

lending money 1 inmarathi

 

ऑनलाईन व्यवसाय करतांना या चुका होऊ नयेत, याची जाणीवपूर्वक काळजी घेतल्यास आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.

शिक्षण घेतांना आपण करतो तसा या मार्गाचा सुद्धा अभ्यास करा आणि मग सुरुवात करा. ‘ऑनलाईन आर्थिक व्यवहार’ याबद्दल एक ठराविक वर्ग खूप भीती बाळगून असतो. त्यांच्या बोलण्यातील तथ्य लक्षात घेऊन त्यांना विनम्रपणे दुर्लक्ष करायला शिकणं हे सुद्धा जमायला हवं. हे करायला शिकल्यावर तुम्ही तुमच्यातील सकारात्मक ऊर्जेने ऑनलाईन व्यवसायात अपेक्षित यश मिळवू शकाल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?