'फार काही नाही, या एका शब्दाचं उच्चारण आहे तंदुरुस्त शरीर, मनाची गुरुकिल्ली!

फार काही नाही, या एका शब्दाचं उच्चारण आहे तंदुरुस्त शरीर, मनाची गुरुकिल्ली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता मिळवणं कठीण झालं आहे. सगळं काही आहे, पण शांत वाटत नाहीये ही सध्या आपली परिस्थिती झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा, सतत ‘सर्वोत्तम’ राहण्याची इच्छा यामुळे एकूणच कामाचा ताण वाढत आहे आणि वाढतच जाणार आहे.

रोज निदान २० मिनिटं तरी ‘ध्यान’ केल्याने आपलं मन नेमकं कशामुळे अस्वस्थ आहे हे कळायला मदत होते असं डॉक्टर आणि योगप्रशिक्षक नेहमीच सांगत असतात.

गरज पटली, की प्रत्येकजण यासाठी वेळ काढतो आणि मग स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीला मिळायला लागतात आणि पर्यायाने शांत वृत्ती तयार होत जाते.

हे ही वाचा : समस्या अनेक, उपाय एक- हे सिक्रेट ठेवेल तुम्हाला चिरतरुण आणि फिट!

घरात ‘ॐ’चे उच्चारण केल्यावर सुद्धा एक वातावरण निर्माण होते असं एका अभ्यासात सिद्ध झालं आहे. काही घरांमध्ये ‘ॐ’ लिहिलेला एक फोटो सुद्धा लावलेला असतो, कदाचित आपण बघितला असेल. त्या फोटोकडे थोडा वेळ बघितल्यावर सुद्धा काही जणांना शांत वाटतं.

‘ॐ’ हा शब्द कसा तयार झाला असेल? काय असेल या एका शब्दातील अक्षरांचा अर्थ? परत परत ‘ॐ’चा उच्चार केल्याने काय फायदा होतो? जाणून घेऊया.

 

om inmarathi

 

बाह्य जगातून अंतर्मनात डोकवायला मदत करणारा ‘ॐ’ हा शब्द ‘अ + उ + म’ या एकत्रीकरणातून तयार झाला आहे. या तिन्ही अक्षरांचं एक महत्त्व आहे.

– या अक्षराचा उच्चार आपल्या घशातून होतांना छातीमध्ये कंपनं तयार करतो ज्यामुळे आपण अंतर्मनासोबत जोडले जातो. अर्थात, हा एक अनुभव आहे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे.

– घशाच्या वरच्या बाजूने होणाऱ्या या अक्षराने जी कंपनं तयार होतात, त्यामुळे आपण बहिर्मनात काय चाललंय हे जाणून घेऊ शकतो. बहिर्मन हे कोणत्याही कृतीचं नियोजन करणारं मन असतं.

– या अक्षराचा उच्चार सर्वात जास्त वेळ वातावरणात घुमत राहतो. ‘म’ प्रतिक आहे शांततेचं आणि अमर्याद गोष्टींचं. थोड्या वेळ आपण उच्चार केला तर शांत झोप सुद्धा लागू शकते इतकी या शब्दाची जादू आहे.

‘च्या उच्चाराने मनावर होणारे बदल तर आहेतच, शिवाय शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा काही फायदे आहेत असं विज्ञानात सांगण्यात आलं आहे :

१. सकारात्मकता:

 

think positive inmararthi

 

‘ॐ’ काराने आपल्या शरीरात एक सकारात्मकता निर्माण होते हे कित्येक अनुभवातून समोर आलं आहे. सकारात्मकता असेल, तर सकारात्मक गोष्टी घडतील आणि तुम्ही नेहमीच उत्साही रहाल, तरुण दिसाल ज्यासाठी आज सगळेच धडपड करत असतात.

२. एकाग्रता:

 

yoga inmarathi

 

जसं ‘ॐ’ लिहिलेल्या फोटोकडे थोडा वेळ बघितल्याने आपण त्या वर्तुळाकार जागेत गुंगतो. तसंच ‘ॐ’ काराच्या पुनरुच्चाराने सर्व चिंता, विचार हे शांत होतात आणि शांत मनच नवीन माहितीचा स्वीकार करत असतं.

३. भीती कमी होते:

‘पुढे काय होईल?’ या भीतीपोटी आपण कित्येक वेळेस मनाला अशांत ठेवत असतो. ‘ॐ’ च्या पुनरुच्चाराने आपण या भीतीवर विजय मिळवू शकतो.

४. रक्तदाबाचा त्रास कमी होतो:

 

doctor checking blood pressure inmarathi

 

‘ॐ’ काराच्या उच्चाराने शरीरात ऊर्जा तयार होते आणि त्यामुळे प्रत्येक पेशी जागृत होतात. रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. दीर्घश्वसन केल्याने जीवजंतूंचा नाश होतो.

५. शांत झोप लागते:

 

sleeping girl inmarathi

 

ध्यान आणि ‘ॐ’ काराच्या उच्चाराने मेंदू शांत होतो आणि झोपेचे त्रास कमी होतात. झोप न येणे, अवेळी झोप येणे, जास्त झोप येणे या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवण्याची क्षमता ‘ॐ’काराच्या उच्चारात आहे.

६. भावनिक स्थैर्य:

 

alia bhat inmarathi

 

गौतम बुद्धांने म्हटलं आहे, की “तुमच्या भावनेचा ताबा इतरांना देऊ नका.” सध्या हे अमलात आणण्याची फार गरज आहे. कोणतीही परिस्थिती असूद्या, मनःशांती अबाधित राहू द्या.

हे ही वाचा : कुंकू किंवा टिकली हा गावठीपणा नसून, त्यातून महिलांना होणारे लाभ ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

भावनिक शांतता मिळवण्यासाठी तुम्ही ध्यान आणि ॐकार हे नक्कीच प्रयत्न करू शकता. योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. मन शांत असेल तर तुम्ही भावनांच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करू शकता.

७. आवाज:

ॐकाराच्या उच्चारणाने तुमचा आवाज मोकळा होतो असं सुद्धा एका अभ्यासात समोर आलं आहे. गायन किंवा वक्तृत्व, बोलण्याचं ज्यांचं क्षेत्र आहे त्यांनी ॐचा उच्चार करावा असं सांगितलं जातं. वय वाढल्यावर हे अजून जास्त उपयोगी मानलं जातं.

८. त्वचा:

 

aditi rao inmarathi

 

नितळ त्वचेसाठी आजकाल प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यासाठी कित्येक प्रयोग सुद्धा केले जातात. ॐकाराच्या उच्चाराने त्वचेवर तेज येतं आणि डोळे सुद्धा सतेज दिसतात.

एका शब्दाच्या उच्चाराने जर इतके फायदे होणार असतील तर प्रत्येकाने रोज काही वेळ स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?