' SIP किंवा FD मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ध्यानात ठेवायलाच हव्यात! नाहीतर...!

SIP किंवा FD मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ध्यानात ठेवायलाच हव्यात! नाहीतर…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वी घरात नवजात बाळ आलं की त्याच्या नावाने एक ठराविक रक्कम पोस्टात किंवा एलआयसीमध्ये गुंतवली जायची. जसं ते बाळ वयात आलं की त्याच्या शिक्षण आणि इतर कामांसाठी त्याचा वापर करता येईल.

आपण याला गुंतवणूक करण्याचा सोयीस्कर प्रकार म्हणू शकतो. दामदुप्पट योजनेसारख्या अनेक बँकांच्या योजना या यशस्वी झाल्या होत्या.

याबाबतीत एलआयसी आणि पोस्ट हे बराच काळ आघाडीवर होते. कालांतराने बँकांसारख्या आर्थिक संस्था या रेसमध्ये उतरून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्तीचे व्याजदर द्यायला लागल्या.

 

lic inmarathi

 

जेवढा गुंतवणुकीचा काळ जास्त, तेवढे रिटर्न्स जास्त असं एकूणच हे गणित. गुंतवणुकीच्या या प्रकाराला म्हणतात, फिक्स डिपॉझिट अर्थात मुदत ठेव.

कालांतराने म्युच्युअल फंड नावाची सिस्टीम बाजारात आली जी मार्केटच्या भरवश्यावर कमी कालावधीत जास्त रिटर्न द्यायला लागली. पण मार्केटच्या चढ उतारावर असल्या कारणाने नुकसान होण्याचे प्रमाण सुद्धा जास्त होते.

नंतर याच म्युच्युअल फंडची समांतर गुंतवणूक बाजारात आली, सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी.

यामध्ये गुंतवणुकीचा काळ जेवढा जास्त तेवढे जास्त रिटर्न मिळत असल्याचे निदर्शनास यायला लागलं. तब्बल १५% व्याजदर यावर मिळत असल्याचे दिसून यायला लागले. पेशन्स असले की इथे यश हमखास असल्याचं बोललं जातं.

 

sip investment inmarathi

 

तर आजच्या घडीला पैसा इन्व्हेस्ट करायचा म्हणजे जुन्या जाणत्या लोकांचा कल हा फिक्स डिपॉझिटमध्ये ते पण सरकारी इन्स्टिट्यूटमध्ये जास्त असल्याचं दिसून येतं.

तर तिथेच मार्केटचा अभ्यास असलेले आणि रिस्क घेण्याच्या तयारीत असलेले आजचे अनेक जण हे एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देताना दिसतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तर गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काय? एसआयपी की एफडी? कशामध्ये जास्त रिस्क आहे आणि कशामध्ये गुंतवणूक ही जास्त सेफ आहे? कुठे चांगले रिटर्न्स मिळतील तर याच प्रश्नाची उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करूया.

तर जसं वर बघितलं की एफडीमध्ये एक ठराविक रक्कम ही काही काळासाठी गुंतवली जाते आणि ठराविक व्याजदर त्यावर दिलं जातं. अनेक सरकारी, निम सरकारी,खाजगी बँका तसेच एलआयसी सारख्या वित्तीय संस्था ह्या फिक्स डिपॉझिट सारख्या सुविधा देतात.

फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवली जाणारी रक्कम ही टॅक्स फ्री असते. यावर कोणत्याही प्रकारचे टॅक्स आकारला जात नाही. तसेच गुंतवणुकीचा काळ हा ५ वर्षापेक्षा जास्त असला तर विविध टॅक्स बेनिफिट सुद्धा यावर मिळतात.

फिक्स डिपॉझिटमधली गुंतवणूक ही फ्लेक्सीबल असते. अर्थात ग्राहक आपल्या आवडीनुसार गुंतवणुकीचा काळ हा ठेवू शकतो.

शिवाय फिक्स डिपॉझिटमध्ये असलेल्या गुंतवणुकीच्या हिशोबाने कर्ज मिळणे सुद्धा सुलभ होते. इथे एफडी एक सिक्युरिटी म्हणून ग्राह्य धरली जाते.

===

हे ही वाचाम्युच्युअल फंडमध्ये अवश्य गुंतवणूक करा..पण या गोष्टी कटाक्षाने पाळा!

===

 

calculation inmarathi

 

फिक्स डिपॉझिटचा मोठा फायदा म्हणजे गुंतवणुकीचा काळ पूर्ण व्हायच्या आधी गरज असली तर आपण पैसे काढू शकतो.

एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडमधली एक समांतर गुंतवणूक आहे. यामध्ये म्युचल फंडच्या परफॉर्मन्स वरून आपल्याला रिटर्न मिळत असतो. त्यामुळे वेळेनुसार गुंतवणूक ही होऊ शकते.

तसेच यामध्ये एकच मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी महिन्याला छोटी छोटी गुंतवणूक तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही यामध्ये रक्कम गुंतवू शकता.

यामध्येसुद्धा तुमच्या गरजेनुसार तुम्ही पैसे काढू शकता. पण मार्केटवर परफॉर्मन्स असल्यामुळे त्यावेळेस तुम्हाला मिळणारे रिटर्न्स हे मार्केटवर अवलंबून असणारे असतात.

एक वर्षापेक्षा जास्त वेळ एसआयपीमध्ये तुमची गुंतवणूक असेल तर तुम्ही विविध टॅक्स बेनिफिट सुद्धा घेऊ शकता.

तर, एसआयपी आणि एफडी यामधले मुख्य फरक पाहूया.

१. एफडी ही मुख्यत्वे कंजरव्हेटिव्ह लोकांसाठी सुटेबल आहे तर एसआयपी ही अग्रेसिव्ह लोकांसाठी.

२. एफडीमध्ये एकदाच ठराविक रक्कम गुंतवली जाते तर तर एसआयपीमध्ये इंस्टॉलमेंटच्या माध्यमातून.

३. एफडीमध्ये लिक्विडिटी ही जास्त असते कारण जमा होणारी रक्कम ही मोठी असते. तर एसआयपीमध्ये तीच लिक्विडिटी ही मध्यम किंवा लहान स्वरूपाची असते.

पण एसआयपीमध्ये महिना काठी जमा होणारी रक्कम एका विशिष्ट कालावधीनंतर मात्र एफडीपेक्षा जास्त लिक्वडिटी तयार करू शकते.

४. एफडीमध्ये रिस्क फॅक्टर हा कमी असतो तर एसआयपीमध्ये जास्त. एसआयपीतून रिटर्न मिळणारी रक्कम ही गुंतवलेल्या रकमेपेक्षा कमी सुद्धा असू शकते.

 

risk factor inmarathi

 

५. एफडीमध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न मिळणार असतो. मिळणारी रक्कम किती हे तुम्ही गुंतवणुकीच्या पहिल्या दिवसापासून जाणून असतात. तेच एसआयपीत मिळणारी रक्कम किती असेल हे नक्की नसतं.

६. एफडीमधून परत मिळणारी रक्कम मुळात व्याज दरावर अवलंबून असते तर एसआयपी मध्ये डिव्हिडंड आणि मुद्दलीवर मिळणाऱ्या फायद्यावर अवलंबून असतो.

७. एफडीवर ग्राहकाच्या टॅक्स स्लॅब नुसार टॅक्स आकारला जातो. तर एसआयपी केल्यावर तुम्ही एक वर्षाच्या आत पैसे काढले तर १५% एवढा टॅक्स आकारला जातो. तर तेच एक वर्षापेक्षा जास्त वेळ गुंतवणूक केली तर मुद्दलीवर मिळणाऱ्या फायद्यावर टॅक्स हा आकारला जातो.

तर, वर दिलेला फरक हा एसआयपी आणि एफडीमधला महत्वाचा फरक आहे.

जर तुम्हाला कमी वेळेत जास्त रिटर्न हवे असतील तर एसआयपी हा उत्तम मार्ग आहे. इंटरनेट वर उपलब्ध असलेले एसआयपी कॅल्क्युलेटर वरून तुम्ही एकूण ढोबळमानाने अंदाज लावू शकता की तुम्हाला किती रिटर्न तुमच्या गुंतवणुकीवर मिळू शकतो.

===

हे ही वाचाश्रीमंत सर्वांनाच व्हायचंय – पण गुंतवणूक करताना “या” गोष्टी सर्व लोक लक्षात ठेवत नाहीत!

===

एफडीमध्ये एक रकमी गुंतवली जाणारी रक्कम जर एसआयपीच्या माध्यमातून एफडी एवढ्याच कालावधीत गुंतवली तर एफडी च्या तब्बल दुप्पट रिटर्न मिळण्याची शक्यता ही जास्त असते.

अंततः तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेवर हे अवलंबून आहे. स्कॅम १९९२ मधला हर्षद मेहता बोलतो ना, ”लाला,रिस्क है तो, इश्क है!” तेच काय ते इथे सुद्धा लागू होते.

 

scam 1992 inmarathi

 

एफडीमध्ये प्रत्येक बँकचा इंटरेस्ट रेट हा जवळपास समानच आहे. ६.५% पासून सुरू होऊन वृद्धांना ८% पर्यंत. तेच एलआयसी, पोस्ट, इपीएफओ सारख्या संस्था काही विशेष सेवा सुद्धा देतात.

तर बघूया असेच काही फंड जे चांगला रिटर्न देण्यासाठी ओळखले जातात!

१. एसबीआय स्मॉल कॅप फंड

मॉडरेट हाय रिस्क मधला हा फंड एव्हरेज तब्बल १९% रिटर्न हा गुंतवणुकीवर देतो. स्मॉल कॅप कॅटेगरी मधला हा ४ नंबरचा फंड आहे.

या फंड ने २०२० मध्ये तब्बल ३३.६% एवढा जबरदस्त रिटर्न दिला आहे. या गुंतवणुकीचा हफ्ता आणि काळ यावर अवलंबून आहे.

२. प्रिन्सिपल इमार्जिंग ब्लुचिप फंड

लार्ज आणि मिडीयम इक्विटीमध्ये मोडणारा हा फंड मॉडरेट हाय रिस्क प्रकारात येतो. एव्हरेज रिटर्न तब्बल २३.७% एवढं असल्याने हा फंड लिस्टमध्ये टॉप ला आहे. २०२० मध्ये या फंड ने २२.३% एवढं रिटर्न दिलेलं आहे.

३. डीएसपी ब्लॅक रॉक इक्विटी अपोर्च्युनिटी फंड

 

DSP black rock mutual fund inmarathi

 

मे २००० साली लॉन्च झालेला हा फंड लार्ज-मिडीयम इक्विटी मध्ये मोडतो, आणि मॉडरेटर हाय रिस्क प्रकारात.

एव्हरेज रिटर्न १७.५% एवढा असून लिस्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये या फंड ने १४.२% एवढा रिटर्न दिलेला आहे.

४. डीएसपी ब्लॅक रॉक नॅचरल रिसोर्सेस अँड एनर्जी फंड

लॉन्च एप्रिल २००८ मध्ये हा फंड लॉंच झाला. एव्हरेज रिटर्न ११.३% तर २०२० मध्ये ११.५२% रिटर्न असा परफॉर्मन्स.

५. ऍक्सिस फोकस २५ फंड्स

जून २०१२ मध्ये लॉन्च झालेला मॉडरेटर हाय रिस्क फंड. याने २०२० मध्ये तब्बल २१% रिटर्न दिले!

तर आपली गुंतवणूक करण्याची कॅपसीटी, रिस्क फॅक्टर आणि गुंतवणूक करण्याचा काळ यावरून गुंतवणुकीचा पर्याय आपण निवडू शकतो.

रिटर्न्सच्या मानाने एसआयपी हा उत्तम पर्याय आहे हे सध्याच्या घडीला आपण मान्य करूच शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?