' या सवयी अंगिकारल्या नाहीत, तर आरोग्यावर होऊ शकतील गंभीर परिणाम...

या सवयी अंगिकारल्या नाहीत, तर आरोग्यावर होऊ शकतील गंभीर परिणाम…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सवयी हा शब्द खूप काही सांगून जातो. माणसाला कोणत्या चांगल्या आणि कोणत्या वाईट सवयी आहेत, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चांगल्या सवयी या आपल्या आरोग्यासाठी तसेच आयुष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. चांगल्या सवयीमुळे आयुष्य अगदी आरोग्यदायी बनतं आणि एका चुकीच्या किंवा वाईट सवयीमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

चांगल्या सवयी ह्या एकदम लागत नसतात, त्यासाठी सातत्य असावे लागते. चांगल्या सवयी लागण्यासाठी थोडी मेहनतदेखील घ्यावी लागते. त्यामुळे सवयी ह्या एका दिवसात लागत नसतात. एखाद्या गोष्टीमधील सातत्य म्हणजेच सवय होय.

जर तुम्ही तुमच्या शरीराला चांगल्या सवयी लावून घेतल्या तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच दिसून येतील. आता हेच पहा उदाहरण जसे की जर तुम्ही रोज अगदी वेळेवर जेवत असाल तर तुम्हाला कधीच अपचन किंवा पित्त होणार नाही.

 

healthy-life InMarathi

 

हे झाले चांगल्या सवयीचे उदाहरण आज आपण अशाच काही चांगल्या सवयी पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्याला आरोग्याचे भंडार लाभेल. चला तर मग पाहूया आपल्या अंगी बाणवता येतील अशा काही सोप्या पण तितक्याच महत्वाच्या सवयी.

१) चालणे

चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे. तुम्ही जवळ कोठेही, जसे की भाजी आणण्यासाठी किंवा जवळच्या किरणा दुकानात जाणार असाल तर तुम्ही गाडीवर न जाता तुम्ही पायी चालत जायला हवे. त्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते.

जवळपास आपण दिवसाला १०,००० पावले चालायला हवीत. त्यामुळे आपले शरीर अनेक समस्यांपासून दूर राहते. चालल्यामुळे आपल्या बऱ्याच कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे आपले वजन देखील कमी होते.

 

morning_walk InMarathi

 

चालणे हा आरोग्यासाठी सर्वात उत्तम व्यायाम आहे, जर तुम्ही दररोज व्यवस्थित चालत असाल, तर तुम्हाला कोणत्याही वयात कोणत्या शारीरक समस्या निर्माण होणार नाहीत.

जिथे शक्य असेल, तेथे गाडीचा वापर न करता चालत जावे. त्यामुळे तुमच्या शरीराची गाडी व्यवस्थित राहते. तुम्ही रोज किती चालला आहे हे मोजण्यासाठी देखील अनेक फिटनेस बँड्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही ते देखील वापरू शकता.

२) उभे राहणे

तुम्ही विचार कराल की उभे रहाणे ही कसली सवय, तर आजकालच्या आपल्या धावपळीच्या युगात व्यायाम करायचे ठरविले तरी व्यायाम केला जात नाही. तासन् तास एका जागेवर बसून काम करणे यामुळे शरीरावरील चरबी वाढते. तसेच साखरेचे प्रमाण देखील वाढते, ज्यामुळे जाडेपणा वाढतो.

 

belly fat inmarathi

 

शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होते. वजन वाढले की अनेक समस्या सुरू होतात. त्यामुळे तुमचे काम जरी बैठे असले, तरी तुम्ही एखादा ब्रेक घ्यावा आणि काही काळ थोडेसे फिरावे किंवा उभे रहावे.

एक तासाहून अधिक काळ एका जागेवर बसून राहू नये. मधेच एखादी चक्कर मारणे, पाय मोकळे करणे ही उत्तम सवय आहे.

३) मोकळ्या मैदानात खेळा

खेळणे हे फक्त लहान मुलांसाठी उपयुक्त नसून मोठ्यांसाठी देखील तितकेच गरजेचे आहे. आजच्या काळात खूप ताण – तणाव वाढला आहे. ताण – तणाव कमी करण्यासाठी विविध मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे. मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराला ऑक्सीजनचा पुरवठा होतो.

 

cricket playing inmarathi

 

खेळणे हा उत्तम व्यायाम आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवांची त्यामुळे हालचाल होते. त्यामुळे किमान आपण थोडावेळ तरी खेळायला हवे. आनंदी आणि आरोग्यदायी जगण्यासाठी आपण हा सोप्पा उपाय करायला हवा.

४) ताठ बसण्याची सवय लावा

तुमची बसण्याची पद्धत खूप काही सांगून जाते. जर तुम्ही पाठीचा बाक काढून बसत असाल किंवा वाकून बसत असाल तर तुम्हाला पाठीचे दुखणे मागे लागू शकते. त्यामुळे तुम्ही कशाप्रकारे बसता हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

 

office-worker-suffering-InMarathi

 

जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसत असाल तर मात्र ही तुमची नक्कीच वाईट सवय आहे. ताठ बसणे, दोन्ही खांदे वाकवून न बसणे या सर्व चांगल्या सवयी आहेत. जे लोक अधिक काळ संगणकावर काम करतात त्यांनी जरूर या चांगल्या सवयी लावायला हव्यात.

५) अन्न पदार्थ खाताना

अन्न पदार्थ कसे खावेत, काय खावेत हे खाण्याच्या देखील काही सवयी असतात. आपण त्या सवयी लावून घ्यायला हव्यात.

जसे की टीव्ही पाहत खाऊ नये. शक्यतो स्क्रीन समोर बसून जेवण करण्यापेक्षा आपल्या कुटुंबासोबत बसून जेवण करा. एकत्रित आनंद घ्या. जेव्हा आपण एकत्र बसून जेवतो तेव्हा एकमेकांच्या विचारांची देवाण – घेवाण होते.

 

family-having-meal-inmarathi

 

६) जेवणात जास्तीत – जास्त पालेभाज्या आणि फळे यांचा समावेश करा

तुम्ही जेवताना जास्त तेलकट, तूपकट न खाता ज्यातून तुम्हाला अधिक पोषण मिळते असे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजे यामध्ये फळे, पालेभाज्या यांचा अधिक समावेश करावा. फळे आणि पालेभाज्या यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे मिळतात.

 

fruits and vegetables inmarathi

 

तसेच जंक फूड, पीझा, बर्गर हे शक्यतो टाळावे. त्यापेक्षा तुम्ही फळे – भाज्या अधिक खाव्यात. तुमच्या रोजच्या आहारात फळे – भाज्या यांचा अधिक समावेश असावा. तुम्ही आहार घेताना तुमचे वय, लिंग आणि तुम्ही ज्या प्रदेशात राहता यांचा विचार करावा.

७) सर्व समावेशक आहार ठेवावा

तुम्ही तुमच्या आहारात सर्व गोष्टींचा समावेश करावा. तुम्हाला अमूकच पदार्थ आवडतो किंवा तमुकच पदार्थ आवडतो असे करू नये.

 

vegitables InMarathi

 

कारली, पालक, बीट अशा न आवडणाऱ्या गोष्टींचा देखील समावेश आहारात करावा. कारण आपल्या शरीराला सर्व गोष्टींची आवश्यकता असते. सर्व रंगांची फळे, भाज्या आपण आपल्या आहारात सामावून घ्यायला हव्यात.

८) नाश्ता जेवण यांचा योग्य समतोल

प्रत्येक व्यक्तीने रोज भरपेट नाश्ता करायला हवा. असे म्हटले जाते की सकाळचा नाश्ता हा राजा सारखा असावा म्हणजे पोटभर असावा. दुपारी एखादी सुकी भाजी, एखादी पातळ भाजी, पोळी ,भात, डाळ असे सर्व समावेशक जेवण असावे.

 

indian thali InMarathi

 

रात्री जास्त जड काही खाऊ नये. कारण रात्री आपली हालचाल तितकीशी होतं नाही. त्यामुळे पचन होणे थोडे अवघड असते. त्यामुळे रात्री शक्यतो हलका आहार घ्यावा. जसे की खिचडी, इडली किंवा अन्य शक्यतो पावाचे पदार्थ टाळावेत.

अनेकजण सकाळचा नाश्ता करत नाहीत पण हे अत्यंत चुकीचे आहे. जर तुम्ही नाश्ता नाही केला तरी तुमचे पोट बराच काळ रिकामे राहते. त्यामुळे पित्त, अपचन असे अनेक त्रास होऊ शकतात.

९) भरपूर पाणी प्या

पाणी हे आपल्या शरीरसाठी खूप गरजेचे आहे. आपण भरपूर पाणी पिले पाहिजे. पाणी पिल्यामुळे  आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होतात. शरीरातील पाण्याची पातळी देखील व्यवस्थित राहणे गरजेचे आहे. पाण्यातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

 

drink water InMarathi

 

पाणी प्यायल्यामुळे पचन व्यवस्थित होते. डोकेदुखी, पित्त, जळजळ कमी होते. चहा, कॉफी, ग्रीन टी हे देखील तुम्ही पाण्याला ऑप्शन म्हणून पिऊ शकता.

१०) अन्न नीट शिजवून खावा

अन्न नीट शिजणे देखील खूप महत्वाचे आहे. जर अन्न नीट नसेल शिजवले तर आपल्याला त्यातील सर्व पोषण तत्वे मिळणार नाहीत. सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळण्यासाठी अन्न नीट शिजवण्याची एक चांगली सवय लागणे गरजेचे आहे.

 

indian cooking InMarathi

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?