' ७००० रुपयांच्या बळावर भारतीय महिलांना 'स्टायलिश' बनवणाऱ्या उद्योजिकेची यशोगाथा

७००० रुपयांच्या बळावर भारतीय महिलांना ‘स्टायलिश’ बनवणाऱ्या उद्योजिकेची यशोगाथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एलोन मस्क, आजच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेला सेल्फ मेड उद्योजक! आजच्या तारखेला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. त्याची स्टोरी जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल.

बाराव्या वर्षी एक छोटासा गेम बनवला आणि तो तब्बल ५०० डॉलर ला एका नियतकालिकाला विकला. तिथून सुरू झालेला प्रवास अजून ही सुरू आहे. टेस्ला, स्पेसएक्स, हायपरलूप सारखे मोठे प्रोजेक्ट हे त्याच्या  प्रवासातले मैलाचे दगड.

 

elon musk featured inmarathi

 

पण याची सुरवात ही नव्हे, वडिलांकडून पैसे घेऊन एलोन आणि त्याच्या भावाने एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. तिचं नाव ‘झिप2’. पुढे कॉम्पॅक्ट या कंपनीने तब्बल २.२ करोड डॉलरला ती कंपनी विकत घेतली.

याच पैशातून मस्क ने ‘पेपाल’ या बँकिंग कंपनीची स्थापना केली आणि पुढचा इतिहास सर्वाना माहीत आहे. ही झाली एलोन मस्कची कहाणी.

भारतातही असे व्यक्तिमत्त कमी नाहीत. तर आज आपण भारतातल्या अशाच एका सेल्फ मेड उद्योजकाला भेटणार आहोत ज्यांनी आईकडून उसने पैसे घेऊन आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचा स्वतःचा असा ब्रँड उभा केला आहे.

यांचं नाव आहे नीना लेखी. बॅगिट (Baggit) या जगप्रसिद्ध अशा बॅग ब्रँडच्या सर्वेसर्वा. आई कडून घेतलेल्या ७००० रुपयांच्या मदतीने त्यांनी आजच्या तारखेला करोडो रुपयांची उलाढाल करणारी ही कंपनी उभी केली.

नीना या लहानपणापासूनच हुशार. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सोफियामधून टेक्स्टाईल आणि कमर्शियल आर्ट्समध्ये पदवी घेतली.

 

nina lekhi inmarathi

 

पण पदवीच्या पहिल्याच वर्षात त्यांना अपयश बघावं लागलं होतं. पहिल्याच वर्षात त्या नापास झाल्या आणि इथूनच त्यांचा उद्योजिका व्हायचा प्रवास सुरू झाला.

तत्कालीन प्रसिद्ध डिझाईनर श्याम आहुजा यांच्या शो रुम मध्ये त्यांनी इंटर्न म्हणून सुरवात केली आणि नंतर तिथेच त्या कामाला लागल्या.

नंतर माईक कृपलानी यांच्या शोरूममध्ये त्यांनी सेल्स पर्सन म्हणून जॉईन केले. आणि तिथे त्यांना ग्राहकांच्या आणि मुख्यत्वे स्त्रियांच्या डिमांड काय असतात आणि त्या कशा बदलतात याबाबत खूप मोठा अनुभव आला.

वयाच्या १७ व्या वर्षी त्या इथे ४०० रुपये महिना पगारावर काम करत होत्या. पुढे त्यांच्या परफॉर्मन्सवर तोच ६०० रुपये झाला.

शिक्षणात नापास झाल्यावर त्यांना आधार दिला होता त्यांच्या आईने. त्याच एक होत्या ज्यांना आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता.

१९८५ मध्ये जेव्हा नीना यांनी बिझनेस करायचा ठरवलं तेव्हा त्यांच्या आईनेच त्यांना कसली ही वाच्यता न करता थेट ७००० रुपयांचं भांडवल पुरवलं, एक रकमी ७००० आणि ते पण १९८५ मध्ये.!

कापड व्यवसायात त्यावेळेस शॉपर्स स्टॉप आणि रिगल सारखे मोठे ब्रँड अस्तिवात आले होते. फॅशनेबल बॅग आणि शूजचे सुगीचे दिवस यायचे होते.

हे ही वाचागावच्या जत्रेतील खोपटं ते अब्जावधींची उलाढाल. एका महिलेची प्रेरणादायी गोष्ट!

 

shoppers stop inmarathi

 

नीना यांनी साध्या मोच्याकडून आपल्या काही डिझायनर बॅग्स शिवून घेतल्या आणि त्यावर आपली कारागिरी त्या देऊ लागल्या. २५ रुपयाला तयार होणारी बॅग त्या ६० रुपयाला विकायला लागल्या!

आजूबाजूला बिझनेस माईंडेड लोक असले की आपल्याला नकळत त्याचा फायदा होतो. कृपलानी यांच्या फर्ममध्ये त्यांची ओळख अशाच एका एक्झिबिशन लावणाऱ्या व्यक्तीशी झाली.

पुढे त्यांना नीना यांनी आपल्या बॅगचे काही डिझाईनचे सॅम्पल दाखवले, ते त्यांना एवढे आवडले की त्यांनी पुढच्या प्रदर्शनात नीना यांच्या या बॅग ठेवण्याचे आश्वासन दिले आणि त्यांनी ते पूर्ण सुध्दा केले. आणि इथून नीना आणि त्यांची फर्म बॅगिट यांचं सगळं काही बदललं.

१९८९ मध्ये त्यांचा व्यवसाय तब्बल ३० पटीने वाढला. हे यश ज्या तत्परतेने त्या सांगतात, त्याचप्रमाणे त्यांचा शोरूम टाकण्याचा पहिला प्रयत्न फेल झाला होता हे सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाने त्या कबूल करतात.

पदवी घेताना आलेलं अपयश आणि व्यवसाय सुरू करताना आलेलं अपयश हे एकाच पारड्यात टाकून दुसऱ्या पारड्यात टोकाची मेहनत टाकून त्यांनी अपयशाला यशामध्ये परावर्तित केले होते.

१९८५ मध्ये मुंबईत एका शोरूम पासून सुरू झालेल्या बॅगिटचे आज ९० शहरात रिटेल युनिट आहेत. ज्यामध्ये ४८ एक्सकलूझिव्ह बॅगिट स्टोअर आणि ३५० मोठ्या फॉरमॅटचे स्टोअर यांचा समावेश होतो.

 

nina lekhi baggit inmarathi

 

या सर्व माध्यमातून त्यांची १११ करोड रुपयांची एकूण उलाढाल आहे. सुरवातीला रेझिन आणि इतर तत्सम प्लास्टिक मटेरियल पासून बॅग या बॅगिटमध्ये तयार होत असत.

कालांतराने चामड्याच्या बॅगांची वाढती लोकप्रियता बघून नीना यांनी आपला फोकस त्यावर ठेवला. पण चामडं प्रोसेस करण्याच्या पद्धती बघून त्यांनी सिंथेटिक लेदरवर जास्त भर दिला आणि ते मटेरियल लोकप्रिय सुद्धा झालं. आणि याच प्रोसेसमधून बॅगिट हा ‘वेगन’ ब्रँड म्हणून प्रसिद्ध झाला.

बॅग सोबत पुढे नीना यांनी इतर चामड्याच्या वस्तूंवर आपला मोर्चा वळवला. कंबरेचे बेल्ट, मोबाईलचे पाऊच, वॉलेट यासारख्या वस्तू सुद्धा त्या सिंथेटिक लेदरने तयार करू लागल्या आणि बॅग सोबतच त्यांच्या या वस्तूंना पण प्रचंड पसंती मिळाली.

मध्यंतरी चायनीज वस्तूंच्या विरोधात निर्माण झालेल्या तणावात नीना यांचा ब्रँड डोके वर करून उभा होता.

नीना यांच्या मते जेव्हा एखादा भारतीय बॅगिटचं प्रोडक्ट घेतो तेव्हा तो फक्त भारतीय ब्रँड घेत नसतो तर स्वावलंबी भारताचा पाया मजबूत करत असतो. मार्केटमध्ये देशी ब्रँडचा आत्मविश्वास ते वाढवत असतात. ज्याने करून परदेशी ब्रँड ना तेवढ्याच ताकदीने भारतीय ब्रँड स्पर्धा देऊ शकतात.

 

nina lekhi featured inmarathi

 

त्यामुळे आत्मनिर्भर भारत सारख्या संकल्पना या प्रत्यक्षात उतरण्यात फायदा होतो त्यासाठीच बॅगिटने #BuyIndiaBuildIndia सारखे अभियान सुद्धा राबवले.

३० वर्षाच्या आपल्या उद्योग विश्वात एक महिला म्हणून त्यांना खूप मदत मिळाली. एक उद्योजिका असूनही त्या एक पत्नी, एक आई आणि एक बॉस या नात्याने त्यांना सगळ्यांनी सांभाळून घेतले. एकमेकांबद्दल असलेला विश्वास आणि सन्मान यामुळे हे शक्य होऊ शकले.

कोरोना काळात ऑफलाईन मार्केटने मान टाकल्यानंतर ऑनलाइन विक्रीकडे नीना यांना आपला मोर्चा वळवावा लागला.

यासाठी त्यांनी आपल्या ग्राहकांच्या माध्यमातून एक सर्व्हे केला ज्यामध्ये मोठ्या संख्येने बॅगिटने ऑनलाइन मार्केटमध्ये उतरावं म्हणून प्रतिसाद दिला. ३५ वर्षाच्या त्यांच्या या प्रवासात त्यांना पहिल्यांदा नुकसान झेलावं लागलं होतं.

त्यामुळे आपसूकच प्रोडक्शन कमी झालं आणि त्यामुळे विक्री घटली.

===

हे ही वाचापोळी-भाजीचा डबा विकून महिला कमावतेय लाखो रुपये!! वाचा ही अनोखी कल्पना…

===

झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी नीना यांनी आपले डीलर, वेंडर, कर्मचारी यांना आपसी समझौता करून उशिरा पेमेंट करायचे ठरवले. ज्यामुळे त्यांचे कार्पोरेट संबंध तसेच राहिले आणि प्रोडक्टच्या किमती सुद्धा वाढवाव्या नाही लागले.

पोस्ट कोविड कालावधी मध्ये बॅगिट रुळावर येत असल्याचे नीना सांगतात. २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ते २०२० मध्ये झालेल्या नुकसानातून उभं राहून पुन्हा आपल्या पिकवर पोहोचू असा त्यांचा अंदाज आहे.

 

baggit featured inmarathi

 

नवीन डिझाईन,नवीन वेअरहाऊस, नवीन स्टोअर्स यांच्या माध्यमातून त्या आपला बिझनेस वाढवायचा मानस इथे स्पष्ट करतात. पुढच्या दहा वर्षात आपला व्यवसाय १० पट पुढे नेण्याचा त्यांचा संकल्प सुद्धा इथे त्या स्पष्ट करतात.

तर, प्रत्येक नव्या सुरवातीला जबरदस्त धक्के खाऊनसुद्धा ते धक्के पचवत एक उद्योग कसा सुरू केला जाऊ शकतो आणि त्याचसोबत तो कसा वाढवला जाऊ शकतो यासाठी नीना लेखी आणि त्यांचा बॅगिट हा ब्रँड बेस्ट उदाहरण आहे.

त्याचबरोबर एक महिला असूनही मार्केटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान कसं निर्माण करायचं यासाठी त्या अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व सुद्धा ठरल्या आहेत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?