' हा बोगदा आहे भारतातील सर्वात मोठा ‘गेमचेंजर’. त्याबद्दलच्या काही खास गोष्टी! – InMarathi

हा बोगदा आहे भारतातील सर्वात मोठा ‘गेमचेंजर’. त्याबद्दलच्या काही खास गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे अनावरण केले आहे, हे तुम्हाला ठाऊकच असेल! जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला हा बोगदा भारतासाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील उत्तम नेते आणि सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावणारे माननीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या काळात, एकूणच रस्ते बांधकामांच्या कामाला वेग आलेला आपण पाहिला आहे.

अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प त्यांनी अमलात आणले आहेत. रस्ते बांधकामाचे कार्य अधिक वेगाने आणि उत्तमरित्या होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जम्मू आणि श्रीनगर यांना जोडणाऱ्या महामार्गावरील हा बोगदा सुद्धा अत्यंत दळणवळणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल यात शंकाच नाही!

चला तर मग जाणून घेऊया एवढं काय विशेष आहे या बोगद्याबद्दल!

 

shrinagar-tunnel-marathipizza

 

या बोगद्यामुळे चेनानी आणि नाश्री या दोन प्रदेशांमधील अंतर,जे पूर्वी ४१ किमी होतं, ते आता केवळ १० किमी एवढं कमी झालं आहे. परिवहन क्षेत्रात यामुळे मोठा फरक पडला आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हा बोगदा येत्या काळात भारतासाठी गेम चेंजर ठरेल असा ठाम विश्वास व्यक्त केला असून याबद्दल त्यांनी सर्व टीमचं कौतुक केले.

जेव्हा बर्फवृष्टीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे रस्ते बंद होतात, त्या काळात हा बोगदा प्रवाश्यांसाठी अतिशय मोलाचे काम करणार आहे. यामुळेच या बोगद्याचे महत्त्व अतिशय वाढले आहे.

या बोगद्याची एकूण लांबी तब्बल ९ किमी एवढी आहे, याच वैशिष्ट्यामुळे हा भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरला आहे.

 

shrinagar-tunnel-marathipizza01

 

या बोगद्यामुळे अंतर कमी झाल्याने प्रतिदिवशी २५ लाखांहून अधिक किंमतीच्या इंधनाची बचत होते आहे. म्हणजेच अंदाजे दर वर्षी जवळपास शंभर करोड रुपये किंमतीचे इंधन वाचवले जात आहे.

या बोगाद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर मधील प्रवास हा सुखकर झाला आहे. ज्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाल्याचे दिसत आहे.

हा बोगदा भारतातील सर्वात पहिला आणि जगातील सहावा असा बोगदा आहे ज्यामध्ये ‘ट्रांसवर्स वेंटिलेशन सिस्टम’ बसवण्यात आली आहे.

ज्यामुळे बोगद्याध्ये ताजी हवा खेळती राहते. जास्त लांबीच्या बोगद्यामध्ये अशी सिस्टम असल्यास प्रवाश्यांना श्वासोच्छवास करण्यास त्रास होत नाही. म्हणजेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार सुद्धा हा बोगदा बनवताना करण्यात आला आहे.

 

shrinagar-tunnel-marathipizza02

 

हा बोगदा बनवण्यासाठी तब्बल २,५१९ करोड रुपयांचा खर्च आला आहे. आशिया मधील सर्वात अधिक लांबीच्या बोगद्यांमध्ये या बोगद्याचा समावेश होतो. हा बोगदा म्हणजे २८६ किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचा अविभाज्य भाग बनला आहे.

या बोगाद्यामुळे जम्मूवरून श्रीनगरला जायला लागणारा वेळ देखील कमी झाला आहे. पूर्वी जेवढा वेळ लागायचा, त्यापेक्षा दीड तास आधी प्रवासी इच्छित स्थळी पोचत आहेत.

 

shrinagar-tunnel-marathipizza03

 

या बोगद्यामध्ये एकूण १२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यात अधिक भर म्हणून अॅडव्हान्स स्कॅनर देखील लावण्यात आलेले आहेत.

चालकांना गाडी चालवताना कोणताही त्रास होऊ नये तसेच समोरचे दृश्य स्पष्ट दिसावे म्हणून थ्री टीअर लाइटिंग सिस्टम देखील बसवण्यात आली आहे.

सर्वात खास गोष्ट म्हणजे या बोगद्यामध्ये मोबाईल नेटवर्कमध्ये कोणतीच अडचण येत नाही. सर्वच प्रमुख कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क बोगद्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

shrinagar-tunnel-marathipizza04

 

म्हणूनच – हा बोगदा म्हणजे भारतीय परिवहन युगातील नवी क्रांती म्हणावा लागेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?