' मुंबई-पुणे हायवेवरील प्रसिद्ध असलेली ही थाळी ठरतीये खवैयांसाठी "जॅकपॉट"!

मुंबई-पुणे हायवेवरील प्रसिद्ध असलेली ही थाळी ठरतीये खवैयांसाठी “जॅकपॉट”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पूर्वी हाॅटेलमध्ये जेवायला जाणं ही गोष्ट कमीपणाची मानली जायची. फक्त घरातच चारी ठाव स्वयंपाक केला जायचा. हरतऱ्हेच्या भाज्या, चटण्या कोशिंबिरी, उसळी, गोडाधोडाचं असेल तर पुरणपोळी, श्रीखंड बासुंदी यांचाच दबदबा पानात असायचा.

सुकी चटणी, ठेचा, सांडगे, पापड, कुरडया लोणची हे सारं निगुतीने आणि घरीच तयार करण्यावर भर असायचा. वर्षभराचे साठवणीचे पदार्थ शेवया, तिखट, मसाले, चिंच मोहरी हे सारं सारं घरातच केलं जाई. त्याची उस्तवार करुन वर्षभर वापरले जात.

मांसाहारी जेवण जेवणाऱ्या लोकांचे पण घरातच पदार्थ तयार करण्यावर भर असायचा. त्यासाठी लागणारे मसाले, वाटण घाटण घरीच केलं जायचं. हे सगळं निगुतीने करणारी बाई म्हणजे सुगरण साळू समजली जायची.

 

thali inmarathi

 

एखादेवेळी जर कुणी हाॅटेलमध्ये जेवायला गेलंच तर त्याची बायको अत्यंत बिनकामाची समजली जायची.

पण पुढं पुढं हाॅटेलमध्ये जेवायला जाणं हा एक ट्रेंडच बनला. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, प्रमोशन काहीही कारण सेलिब्रेट करायचं असेल तर घरच्यांना, मित्र मैत्रिणींना, सहकाऱ्यांना सर्रासपणे हाॅटेलमध्ये नेलं जातं.

वेगवेगळ्या तऱ्हेचे पदार्थ खायला घातले जातात. वेगवेगळे शेफ लोकही आपली खासियत ठेवून हिरीरीने खवय्यांची रसना तृप्त करायला प्रयत्नशील असतात.

सध्या तर सगळीकडेच मोठमोठ्या थाळ्यांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. एका थाळीत किमान ४ लोकांचे जेवण असते आणि अशा ग्रँड थाळ्या तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील!

पुण्यातील बाहुबली थाळी, ठाण्यातील मिनी पंजाब हॉटेल मधली दारा सिंग थाळी, मुंबई काळबादेवी परिसरातील ठाकर गुजराती थाळी अशा कित्येक थाळ्या आज त्यांच्या खास ऑफर्ससाठी प्रसिद्ध आहेत!

===

हे ही वाचाव्हरायटी पाहूनच भूक खवळणार,अशा ८ ग्रँड थाळींचं वैशिष्ट्य जाणून घ्या!

===

असाच अफलातून प्रकार आहे पुण्यातील हाॅटेल शिवराज येथील बुलेट थाळी. त्यांनी आपल्या या थाळीची जाहिरात पण अभिनव पद्धतीने केली आहे.

या मांसाहारी थाळीतील पदार्थ इतके छान सजवून ठेवले आहेत आणि जाहिरात केली आहे की, जो कुणी एका तासात या थाळीतील सर्व पदार्थ संपवून थाळी स्वच्छ करेल त्याला बुलेट गिफ्ट म्हणून दिली जाईल.

 

bullet thali inmarathi

 

तुम्ही म्हणाल चला दोघं चौघं जाऊ आणि संपवून टाकू ही थाळी, पण नाही. खरी गोम इथंच आहे. ही थाळी एकट्यानंच संपवायची आहे आणि हे केवळ अशक्य आहे.

कारण या थाळीतील सगळे पदार्थ मिळून वजन केलं तर चार किलो आहे. एक माणूस चार किलो अन्न बसल्या बैठकीला संपवू शकेल का? याचं उत्तर बहुतेक नाही असंच आहे.

पण तरीही हे जेवण संपवू शकणाऱ्या माणसासाठी त्यांनी बुलेट बक्षिस ठेवलं आहे म्हणून ही बुलेट थाळी असं या थाळीचं केलेलं नामकरण आहे!

‘स्वतःची स्तुती स्वतःच करणारा तो एक मुर्ख’ असं समर्थ रामदास स्वामी म्हणून गेले आहेत. पण हे लक्षात ठेवून वागायचं ठरवलं तर मार्केटिंग आणि सेल्स हे विभाग चालले असते का?

आपलं प्राॅडक्ट कसं वेगळं आणि उत्तम आहे हे सांगितलं तरच लोक ते घेणार.

बरोबर हीच गोष्ट लक्षात घेऊन हाॅटेल शिवराजच्या मालकांनी अतुल वाईकर यांनी आपल्या पेजवर ही बुलेट थाळी पोस्ट केली आहे. त्यावरचं चॅलेंज ठळकपणे दिलं आहे. त्या गच्च भरून ठेवलेल्या थाळीचा फोटो पण ठेवला आहे. काय काय आहे या थाळीत?

 

bullet thali 3 inmarathi

 

या थाळीत एकूण मांसाहारी पदार्थांची रेलचेल आहे. १२ मांसाहारी पदार्थ यात ठेवले आहेत. मटण, मासे यांच्या बारा डिश एका थाळीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. काय काय आहेत त्या डिशेस?

सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, प्राॅन बिर्याणी, सुक्के मटण, मटण मसाला, चिकन तंदुरी, चिकन मसाला, ग्रे मटण, रोटी, भाकरी, पापड आणि सोलकढी इत्यादी. बघा आहे का हे शक्य एका बैठकीत एकाच माणसानं संपवणं?

ही काही पहिलीच वेळ नाही की या हाॅटेलनं असं हटके काही लोकांसमोर सादर केलं आहे. यापूर्वी ८ किलोची शाकाहारी रावण थाळी त्यांनी चॅलेंज म्हणून आणलीच होती.ती चार जणांनी एका तासात संपवायची होती. त्यासाठी पाच हजार रुपये बक्षिस पण जाहीर केलं होतं.

अतुल वाईकर यांचं हे हाॅटेल शिवराज. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वडगांव मावळ येथे हे हाॅटेल आहे. आपलं हाॅटेल लोकांना माहिती व्हावं खवैय्ये येऊन तृप्त होऊन जावेत या उद्देशाने अतुल वाईकर दरवेळी अशा फक्कड आयडीया लढवत असतात.

 

hotel shivraj inmarathi

 

हे जगावेगळं चॅलेंज बघायला, खायला रसिक खवैय्ये येऊन जातात. भले हे चॅलेंज स्वीकारणं नाही जमणार पण इतर पदार्थांचा आस्वाद तर घेणं होतं.

आणि शेवटी असं असतं, नुसत्या उत्तम कल्पना राबवून चालत नाही. तुमच्या पदार्थांचा दर्जाही चांगला असावा लागतो. तर आणि तरच लोक पुन्हा पुन्हा येतात. तुमचं कामच तुमची जाहिरात ठरते. आणि ही चॅलेंजेस निमित्त ठरतात.

कारण जे लोक हौसेने उत्तम खाण्याचे शौकीन असतात ते काही उदरभरण, कुणीकडून तरी जेवायचं नी मोकळं व्हायचं असं म्हणून जात नाहीत..ते मनापासून जेवायला गेलेले असतात.

असे पदार्थ..अशा हटके असलेल्या डिश त्यांची रसना तृप्त करतात. आणि असा तृप्त ग्राहकच आपली अजून दहा ठिकाणी जाहिरात करतो आणि शंभर नवे ग्राहक आपल्याकडे परत येतात.

 

bullet thali 2 inmarathi

 

मग अशा सोशल मिडियावर केलेल्या पोस्ट हे एक छोटंसं निमित्त ठरतं आणि लोक चॅलेंज काय याची उत्सुकता म्हणून येतात ही गोष्ट अतुल वाईकर यांनी बरोबर ओळखली आहे. चला, मग देता का भेट? घेता का चॅलेंज?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?