'शनिवारची बोधकथा : आनंदी जगण्याचं रहस्य सांगणारी गोष्ट!

शनिवारची बोधकथा : आनंदी जगण्याचं रहस्य सांगणारी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चार सर्वसामान्य परिस्थितीतील मित्र एकदा दूर जंगलात फिरायला निघाले. दाट झाडे, सुंदर फुले, पिवळी-हिरवी पाने पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले.

तेवढ्यात एक जण म्हणाला, ‘‘आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. हा निसर्ग एवढा समृद्ध आहे आणि आपल्याकडे काहीही नाही.’’  यावर त्या सर्वांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

शेवटी प्रत्येकाने आपण आयुष्यात निराशा, दु:ख, ताणतणाव असल्याचे सांगितले. प्रत्येकजण आपली वैयक्तिक व्यथा मांडत होता. अशा चर्चेतच दुपार झाली. सर्वांना भूक लागली.

एवढ्यात सोबत आणलेले डबे खाऊन झाल्यावर त्यांनी पाण्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. जंगलाच्या आत खूप दूरवर चालत गेल्यावरही त्यांना पाणी मिळेना. छोटासा झरा, ओढा अशा ठिकाणावरून त्यांना पाणी मिळेल असे वाटले. पण तसे झाले नाही.

पाण्याचा शोध घेता घेता ते घनदाट जंगलात पोहोचले. तेथे त्यांना एक झोपडी दिसली. त्यांनी झोपडीत डोकावून पाहिले. आत एक वृद्ध स्त्री होती. तिला पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले. तहान लागलेली असल्याने त्यांनी वृद्ध स्त्रीला काहीही न विचारता फक्त पाणी मागितले.

‘‘आजी, आम्हाला थोडे पाणी मिळेल का?’’, एकाने विचारणा केली. वृद्ध स्त्री बाहेर आली आणि म्हणाली, ‘‘मी पाणी फार दूरवरून आणते. इथे जवळपास पाणी नाही. तरीही माझ्याकडे थोडेसे पाणी आहे. ते देते.

पण ते पाणी देण्यासाठी काही नाही. फक्त नारळाच्या छिद्र पडलेल्या करवंट्या आहेत. त्यात तुम्हाला पाणी चालेल का?’’, वृद्धेने विचारणा केली.

‘‘हो, हो अगदी चालेल की!’’, तहान लागल्याने चौघांनी एकदमच होकार दिला. वृद्धेने वेगवेगळ्या आकाराच्या तीन कवट्यांमध्ये पाणी दिले. त्यामुळे एकाने शेवटी पाणी पिले.

पाणी पिऊन तृप्त झाल्यावर एक जण सहज म्हणाला. ‘‘आजी तुम्हाला इथं जंगलात छान प्रसन्न वाटत असेल ना? तुम्ही एकट्याच कशा काय राहता बुवा? आम्हाला तर शहरात राहायचा आणि जगायचा कंटाळा आला आहे. रोज काहीतरी नव्या समस्या असतातच हो!’’ एकाने नाराजीचा सुरात माहिती दिली.

===========

शनिवारच्या बोधकथा सदरातील या कथाही तुम्हाला आवडतील

===========

आजी म्हणाल्या, ‘‘बाळांनो, आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहिलेलीच बरी असतात. राहिलं तुमच्या अडचणींचा आणि आयुष्याचा प्रश्न. बाळांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही नाराज होऊ नको. काही मिळो अथवा न मिळो, आपण नाराज व्हायचं नाही.

आलेली परिस्थितीला स्वीकारायचं त्यातून मार्ग काढायचा, मोठी स्वप्नं बघायची आणि पुढे चालत रहायचं. आता हेच बघा ना तुम्हाला आता मी ज्या करवंट्यामध्ये पाणी दिले होते. त्यापैकी तीनही करवंट्या एकसारख्या नव्हत्या. एकाला तर करवंटी मिळालीच नाही.

त्यामुळे त्याला दुसऱ्याने वापरलेली करवंटी नंतर वापरावी लागली. दोन करवंट्यांना छिद्रे पडली होती. तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पाणी पिऊन तहान भागविलीतच ना?

आयुष्याचंही असच आहे. जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी व्हायला हवं. अर्थात पुढे काहीच मिळवायचं नाही असं नाही. पण नाराजीचा, दु:ख, निराशेचा सूर शक्‍यतो आपल्यापासून दूर ठेवावा. आनंदानं जगायला हवं. पुढं जायला हवं.’’

वृद्ध महिलेचा संदेश ऐकून तिघेही उत्साहीत झाले आणि त्यांनी काही वेळाने आनंदाने जगण्याचा संकल्प आजींचा निरोप घेतला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

===

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?