' चुरगळलेला शर्ट – निराळीच वट! ‘बिग बुल’च्या टिप्स ठरतील शेअर मार्केटमध्ये फायदेशीर – InMarathi

चुरगळलेला शर्ट – निराळीच वट! ‘बिग बुल’च्या टिप्स ठरतील शेअर मार्केटमध्ये फायदेशीर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शेअर मार्केटचं योग्य ज्ञान असेल, तर त्यातूनही उत्पन्न मिळवणं शक्य आहे. एवढंच नाही, तर गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय नक्कीच ठरू शकतो. या पर्यायाचा वापर तुमच्यापैकीही अनेकजण करत असतील.

काही जण आपल्याकडे असलेले पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवून ते वाढवता कसे येतील यासाठी सतत प्रयत्नशील असतात. हे सगळं करताना, हे पटलेलं असतं की, पैसे महत्वाचे आहेत आणि ते कमावण्यासाठी एक मार्ग पुरेसा नसेल तर अधिक मार्ग उपलब्ध करायलाच पाहिजे. उपलब्ध पर्यायांपैकी शेअर मार्केट हा सर्वांसाठी उत्पन्नाची समान संधी असणारा मार्ग आहे.

 

share market inmarathi

 

तुमच्या योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यावर फक्त तुमची कमाई इथे ठरत असते. ‘डीमॅट अकाउंट’ उघडल्यावर नेमकं काय केलं पाहिजे? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो.

स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे फक्त काही शेअर्स, म्युचल फंड विकत घेऊन थांबणे असं नाहीये. एक तर तुम्ही किंवा तुमच्या प्रतिनिधीने सतत मार्केट मधील उतार चढाव बघत रहाणे आणि आपले पैसे त्यानुसार गुंतवणे हे तुमचा फायदा निश्चित करत असतं.

हे साध्य करत असताना नेमकं कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे भारताचे प्रख्यात गुंतवणूकदार राकेश झुंझुनवला यांनी काही टिप्स सांगितल्या होत्या.

राकेश झुंझुनवला यांना “भारताचे वॉरेन बफे” हे नाव देण्यात आलं होतं. ही उपाधी मिळण्यासारखं त्यांचं काय योगदान असेल? जाणून घेऊयात.

हैद्राबादमध्ये  जन्मलेल्या राकेश यांना शेअर मार्केटचे ज्ञान घरातूनच मिळाले होते. त्यांचे वडील घरात कायम शेअर मार्केट बद्दल चर्चा करत असत. त्यामुळे राकेश यांना सुद्धा या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झाली.

वडिलांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी रोज वर्तमानपत्र वाचायला सुरवात केली. या विषयातील वाढत्या रुचीमुळे त्यांनी या विषयातच करियर करण्याचे ठरवले.

५००० करोड इतकी संपत्ती शेअरमार्केट मधून कमवून राकेश झुंझुनवला यांनी एक विक्रम आपल्या नावावर केला होता होता. ते स्वतः ‘रेअर इंटरप्राइजेस’ या असेट मॅनेजमेंट कंपनीचे पार्टनर होते.

‘चार्टर्ड अकाउंटंट’ असलेले राकेश झुंझुनवला हे एक ‘ट्रेडर’ म्हणून काम करायचे. 

===

हे ही वाचाशेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

===

 

rakesh jhunjhunwala inmarathi

 

१९८५ मध्ये कॉलेज मध्ये असतांना राकेश झुंझुनवला यांनी सुद्धा आपल्या सारखंच १०० डॉलर्स म्हणजे साधारणपणे ८००० रुपयांची गुंतवणूक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये केली होती.

तेव्हा स्टॉक इंडेक्स हा १५० वर होता, आज तो ३६,००० वर आहे. स्टॉक इंडेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदवलेल्या कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती असं म्हणता येईल.

राकेश झुनझुनवला यांनी हा प्रवास पूर्ण केल्यावर आपल्या अनुभवाचे बोल मीडिया सोबत बोलतांना सांगितले आहेत. त्यापैकी ७ मुख्य टिप्स अश्या आहेत:

१. संयम ठेवा

 

patience inmarathi

 

आज पैसे गुंतवले आणि उद्या फायदा झाला असं स्टॉक मार्केट मध्ये होत नाही. ज्यांची अशी अपेक्षा आहे त्यांनी सोनं खरेदी, प्लॉट्स मध्ये गुंतवणूक करून आपल्याला अपेक्षित तो फायदा कमवावा.

स्टॉक मार्केट तुमच्यासाठी किंवा तुम्ही स्टॉक मार्केट साठी बनलेले नाही आहात हे मान्य करावं आणि आपली अगतिकता कमी करावी. जर तुम्ही कोणाला पैसे देऊनही संयम बाळगू शकता, तर तुमचं स्टॉक मार्केट मध्ये स्वागत आहे.

एक गुंतवणूकदार हा कधीच घाईत नसला पाहिजे. जसं एखादं बाळ मोठे होईपर्यंत वाट बघावी लागते, तसंच शेअर मार्केट मध्ये सुद्धा पैसे गुंतवून तुम्हाला फायदा मिळेल यासाठी संयम ठेवावा लागतो. मग काय करायचं ?ते पुढच्या मुद्द्यात राकेश यांनी सांगितलं आहे.

 

२. संधी सोडायची नाही

 

chance inmarathi

 

संधी ओळखणं आणि त्यावर कृती करणं हे गुंतवणूकदाराचं खरं कसब आहे. कोणती संधी चांगली? हे तुम्हाला सुरुवातीला तुमचे स्टॉक प्रतिनिधी शिकवत असतात.

अधिक फायद्याच्या संधी या तंत्रज्ञान, मार्केटिंग, ब्रँड्स कंपनी मधून सतत उपलब्ध होत असतात. त्यांच्यावर बारीक नजर ठेवणे हे गुंतवणूकदाराकडून अपेक्षित असतं.

३. मोठ्या चुका करू नका

अधिक फायदा कमावण्यासाठी बऱ्याच वेळेस आपण अधीर असतो आणि त्या नादात चुका करत असतो. “चुका तर होतीलच” हे मान्य करा, फक्त त्या फार मोठ्या प्रमाणावर करू नका असं राकेश झुंझुनवला सांगतात.

चूक पण अशी करा, ज्याची भरपाई तुम्ही स्वतः करू शकतात. चूक म्हणजे एक प्रकारचा धोका म्हणता येईल, तो किती पत्करायचा हे एक गुंतवणूकदारच ठरवू शकतो. हे ध्यानात ठेवावं आणि आपली पाऊलं उचलावीत.

===

हे ही वाचा- शेअर मार्केट कोसळत असताना प्रत्येक मध्यमवर्गीयाने अमलात आणावी “ही” स्ट्रॅटेजी

===

४. अंदाज घ्या

 

share market 2 inmarathi

 

कोणत्याही कंपनी किंवा कमोडिटी मध्ये गुंतवणूक करतांना त्याच्या मागच्या काही दिवसातील ट्रेंड बघा. तुमचा अंदाज हा बऱ्याच वेळेस बरोबर असतो यावर विश्वास ठेवा.

गुंतवणूकदार व्यक्तीचा ‘कॉमन सेन्स’ हा खूप चांगला असणं आवश्यक आहे. हे सांगताना राकेश यांनी दोन उदाहरण दिली आहेत.

आय टी ची गरज येणाऱ्या काळात वाढणार आहे हा अंदाज घेऊन वेळीच इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपनीत गुंतवणूक करणं हे अंदाज घेणं आहे. दुसरं उदाहरण म्हणजे इथेनॉलची गरज वाढणार आहे हे लक्षात घेऊन ज्यांनी ‘प्राज इंडस्ट्रीज’ मध्ये सुरुवातीला गुंतवणूक केली ते आज फायद्यात आहे.

 

५. मार्केटच्या बातम्या ऐकून घाबरू नका

 

share market news inmarathi

 

प्रत्येक मार्केटची बातमी योग्य नसते. इन्फ्लेशन, डेफिसीट या काही गोष्टी कळत नसतील तर त्यांचा फार ताण घेऊ नका. ज्या कंपनीच्या कामाबद्दल माहीत आहे त्यामध्ये गुंतवणूक करा आणि त्याकडेच लक्ष द्या.

 

६. प्रगतशील वस्तूंमध्ये गुंतवणूक करा

 

investment inmarathi

 

काही वस्तू असतात जश्या की, वीज ज्याची की मागणी अचानक वाढत नसते. त्यांच्या मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे पैसे एका ठिकाणी थांबवून ठेवणं आहे. त्याऐवजी ज्या गोष्टीची मागणी वाढते तश्या फूड इंडस्ट्री मध्ये गुंतवणूक करा.

७. मोठी कंपनी

कोणत्याही कंपनीच्या फक्त नावाने हुरळून जाऊ नका. ती कंपनी तुम्हाला किती फायदा करून देत आहे याकडे लक्ष द्या. ‘लार्ज कॅप’, ‘स्मॉल कॅप’ याकडे न बघता कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करा आणि मग गुंतवणूक करा.

सतत फायदा होणारी किंवा मागणी असलेली कंपनीच तुम्हाला फायदा करून देऊ शकते हे लक्षात ठेवा ती कितीही छोटी असो किंवा मोठी असो.

राकेश झुंझुनवला यांनी दिलेल्या टिप्स वापरून आपला शेअरमार्केटचा प्रवास अधिकाधिक फायदा मिळवून देणारा असेल यात शंकाच नाही.

 

rakesh 2 inmarathi

 

‘ट्रेडर’ म्हणजे दुसरा कोणी नसून एक दुकानदार असतो हे लक्षात ठेवावं आणि स्वस्त शेअर्स विकत घ्यावेत आणि ते महाग झाले की विकून टाकावेत ही राकेश झुंझुनवला यांच्या टिप्स मधील ‘बॉटम लाईन’ म्हणता येईल.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?