' …आणि अशा या भन्नाट ‘पिकनिक’ची कल्पना, त्या दोघींना लॉकडाऊनमुळे सुचली! – InMarathi

…आणि अशा या भन्नाट ‘पिकनिक’ची कल्पना, त्या दोघींना लॉकडाऊनमुळे सुचली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वच घरी होतो. मनोरंजनाची अनेक साधनं रटाळ वाटू लागली होती. कुठे बाहेर सुद्धा जाता येत नव्हतं. या काळात दोन मैत्रिणींनी मिळून एक आगळावेगळा पिकनिकचा प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगाची सगळीकडे चर्चा आहे. त्यांचं खूप कौतुकदेखील होत आहे.

शहरात वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीला जर वीकेंडला पिकनिकसाठी अत्यंत शांत आणि प्रदूषणविरहित अशा एखाद्या शेतात जाण्याची संधी मिळाली तर त्याला किती आनंद होईल! मेट्रोपॉलिटन सिटीमधील मंडळींना तर अशा प्रकारच्या शांत वातावरणाची नितांत गरज आहे.

श्वेता गुप्ता आणि भावना राव या दोन मैत्रिणींनी एकत्र येत शहरातील व्यक्तींची हीच गरज समजून घेत पिकनिक कंपनी सुरू केली आहे. अत्यंत निसर्गरम्य आणि प्रदूषणविरहित अशा वातावरणात वेळ घालवण्याचे नियोजन ही पिकनिक कंपनी करते.

 

nature-beauty-inmarathi

 

लाॅकडाऊनमुळे आपल्या सर्वांच्याच लक्षात आले असेल की मनोरंजनाची पारंपरिक साधने काही बंधनांमुळे आपण सध्या तरी वापरू शकत नाही. घरात टीव्ही बघून आपण सर्वजण वैतागलो होतो. चित्रपट गृहदेखील बंद होती. अशातच आपल्या सर्वांना काहीतरी वेगळ्या प्रकारच्या मनोरंजनाची नितांत गरज होती आणि हीच गरज ओळखून बंगलोरच्या या दोन मैत्रिणींनी पिकनिक कंपनीची स्थापना केली.

या कंपनीची स्थापना नोव्हेंबर २०२० मध्ये झाली. या कंपनीचा उद्देशच असा आहे, की अशाप्रकारच्या पिकनिकच आयोजन करायचं ज्यामध्ये ग्राहक अत्यंत निसर्गरम्य वातावरणात पिकनिकचा आनंद घेऊ शकेल.

हे सुद्धा वाचा – गावच्या जत्रेतील खोपटं ते अब्जावधींची उलाढाल. एका महिलेची प्रेरणादायी गोष्ट!

या कंपनीच्या निर्मितीबद्दल श्वेता गुप्ता यांचं म्हणणं असं आहे, की ही कल्पना त्यांना लॉकडाऊनच्या काळात सुचली. या काळात रेस्टॉरंट, चित्रपटगृह, मॉल हे सर्वच बंद होतं आणि ते लवकर सुरू होण्याची चिन्हं देखील नव्हती.

लोकांना मात्र विरंगुळा अत्यंत आवश्यक होता आणि म्हणूनच लोक यावर पर्याय म्हणून लॉंग ड्राईव्ह किंवा कुठल्या तरी दूरच्या जागी जाऊन वेळ घालवणे पसंत करत असत. त्या दोघींनी असा विचार केला, की या व्यक्तींसाठी वेगळ्या पद्धतीचं मनोरंजनाचं आयोजन करता येऊ शकतं.

 

shweta-gupta-bhavna-rao-inmarathi

 

ही कल्पना सुचल्यानंतर ही पिकनिक कंपनी उभी करण्यासाठी टीम तयार करण्यात आली. बंगलोर शहराच्या बाहेर सर्वसामान्यांना आवडेल आणि परवडेल अशा अंतरावर काही शेतकऱ्यांशी देखील संपर्क करण्यात आला. याठिकाणी कुटुंबाला सोबत वेळ घालवता येईल अशा प्रकारच्या जागा तयार करण्यात आल्या.

एकदा तुम्ही कंपनीतर्फे पिकनिक करण्याचं नियोजन ठरवलं, की ही कंपनी तुमच्या पॅकेजनुसार तुम्हाला शेतातील जागा, खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टींची कल्पना देते. पिकनिक कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे जी जागा म्हणजे शेत निवडलं जातं ते अत्यंत निसर्गरम्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ असतं तुम्ही कुठेही फिरलात तरी तुम्हाला घाण आढळणार नाही.

 

the-picnic-company-inmarathi

 

या शेतांबद्दल सांगायचं झालं, तर ही अत्यंत सुंदर शेतं आहेत. काही शेतकऱ्यांसोबत ‘द पिकनिक कंपनी’ने भागीदारी केलेली आहे. या शेतातदेखील त्यांच्या ग्राहकांना प्रायव्हसी आणि सुरक्षा मिळते. त्यांच्यासाठी ग्राहक हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

त्यामुळेच उत्तम जागा, स्वच्छ वातावरण आणि अगदी घरच्यासारखं जेवण या गोष्टी ‘द पिकनिक कंपनी’ देते. लाॅकडाऊनमुळे अशा प्रकारचे पिकनिक स्पाॅट तयार झालेले आहेत. पिकनिक कंपनीसोबत पिकनिक केल्यावर तुम्हाला आनंदाची जाणीव नक्कीच होईल.

या शेतात थोडादेखील कचरा होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यामुळेच ग्राहकांना सुद्धा येथे कचरा टाकण्यास मनाई आहे.

प्लास्टिकपासून तयार होणारा कचरा होऊ नये म्हणून इथे ग्राहकांना शक्यतो नॅपकिन किंवा टिशू उपलब्ध करून दिले जातात. ग्राहक निघून गेल्यानंतर या जागेची सफाई सुद्धा केली जाते. या सगळ्या गोष्टींमुळेच ग्राहकांची या कंपनीला जास्त पसंती मिळू लागली आहे.

 

the-picnic-company-board-inmarathi

 

मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पिकनिक दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण. द पिकनिक कंपनी सर्वात जास्त याच एका घटकावर लक्ष देते. पिकनिक कंपनी आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या जेवणाचे पर्याय देते.

त्यांचे ग्राहक त्यांच्या जेवणामुळे अत्यंत खुश असतात. पिकनिक कंपनीच्या या उपक्रमामुळे लहान लहान शेतकऱ्यांना देखील ओळख मिळत आहे. इथे पिकनिक करण्यासाठी येणारी मंडळी या शेतकऱ्यांशी जोडली जात आहेत. पिकनिक कंपनी यातही वैविध्य आणण्याचा विचार करत आहे.

 

the-picnic-company-food-inmarathi

 

पिकनिक कंपनीच्या प्रसिद्धीमुळे मुंबई आणि दिल्लीतून लोक पिकनिक कंपनीशी संपर्क साधत आहेत. त्यांनाही अशा प्रकारचा उपक्रम त्यांच्या शहराच्या जवळपास करता येईल का याची विचारणा करत आहेत.

पिकनिक कंपनीने पिकनिक करण्याची संकल्पना बदलण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यात देखील अशा अनेक पिकनिक कंपन्या उभ्या राहाव्यात हीच सदिच्छा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?