' मोबाईल डिस्प्ले फुटला तर हजारोंचा फटका! मग तो वाचवण्यासाठी हे वापरा

मोबाईल डिस्प्ले फुटला तर हजारोंचा फटका! मग तो वाचवण्यासाठी हे वापरा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नवीन मोबाईल विकत घेतला की स्क्रीनचं संरक्षण म्हणून स्क्रीनगार्ड आणि कव्हर या दोन गोष्टी विकत घेतल्याच पाहिजेत, असा एक अलिखित नियमच असतो.

मोबाईलला मेटल बॉडी जरी असली, तरी त्यावर बॅक कव्हरचं आवरण आणि डिस्प्लेवर उत्तम गोरिला ग्लासचं प्रोटेक्शन असलं तरी त्यावर स्क्रीनगार्डचं कवच घातलंच पाहिजे.

याचं कारण काय तर चुकून मोबाईल हातातून पडला तरीही जास्त नुकसान होऊ नये. मोबाईलच्या नव्या डिस्प्लेची किंमत, एकूण किंमत ही मोबाईलच्या किमतीच्या जवळपास एक तृतीयांश असते. त्यामुळे वर्षभरानंतर मोबाईलची किंमत जरी अर्धी झालेली असली तरी डिस्प्लेची किंमत मात्र तेवढीच राहते.

 

cracked-mobile-display-inmarathi

 

मोबाईलची इतर बॉडी मेटल किंवा प्लास्टिकची असल्या कारणाने, डिस्प्लेच्या मानाने बॉडीला नुकसान होण्याची शक्यता आणि प्रमाण कमी असतं. त्यामुळे मोबाईल गरम होण्याची शक्यता लक्षात घेता, मोबाईलला अगदी साधं कव्हर जरी घातलं तरी चालू शकतं.

खरा प्रश्न राहून जातो, की मोबाईल डिस्प्लेला स्क्रीनगार्ड असावं की नाही आणि लावायचं असेल, तर कोणतं.? प्लास्टिक की टेम्पर्ड ग्लास.?

आज याच विषयाबाबत काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत.

तसं बघायला गेलो तर स्क्रीनच्या बाबतीत सगळ्यांचाच कल हा टेम्पर्ड ग्लासकडे अधिक असतो. याचं कारण सुद्धा तसंच आहे.

हे सुद्धा वाचा – मोबाईल स्लो झालाय? मनस्ताप करण्यापेक्षा हे घ्या फोनचा स्पीड वाढवण्याचे जबराट फंडे

टेम्पर्ड ग्लास ही साध्या प्लास्टिक स्क्रीनगार्डपेक्षा मजबूत आणि अधिक टिकाऊ असते. तसेच मोबाईल पडला तर वायब्रेशन निर्माण होतं, त्यामुळे स्क्रीन फुटू शकते किंवा स्क्रीनचं नुकसान होऊ शकतं.

ही व्हायब्रेशन्स थांबवण्याचं किंवा कमी करण्याचं काम टेम्पर्ड ग्लास करते. त्यामुळे टेम्पर्ड ग्लास तुटते, पण स्क्रीन सुरक्षित राहते. टेम्पर्ड ग्लासची जाडी ही साधारणपणे ०.३ ते ०.६ एमएम इतकी असते. तर प्लास्टिक स्क्रीनगार्डची जाडी ०.१ एमएम!

 

tempered-glass-inmarathi

 

टेम्पर्ड ग्लासचं डिझाईन हे साधारणपणे डिस्प्लेला अनुसरून असतं. त्यामुळे टेम्पर्ड ग्लास लावल्यावर मिळणारा टचचा अनुभव मूळ फोनच्या डिस्प्ले सारखाच असतो. ही गोष्ट प्लास्टिक स्क्रीन गार्ड लावल्यावर होऊ शकत नाही.

टेम्पर्ड ग्लासवर असलेल्या स्पेशल कोटींगमुळे ती साफ करताना जास्त त्रास होत नाही. धूळ, बोटांचे ठसे हे सहजरित्या साफ होऊ शकतात.

आऊटडोर व्हिजिबिलिटी अर्थात घराबाहेर पडल्यावर सुद्धा मोबाईलच्या व्हिजिबिलिटीमध्ये टेम्पर्ड ग्लास लावल्यावर फरक पडत नाही.

तेच जर स्क्रीनगार्ड प्लास्टिकचं असेल, तर डिस्प्ले पिवळसर दिसायला लागतो. हे झालं फोनच्या परफॉर्मन्सबद्दल. पण काही ठिकाणी प्लास्टिक स्क्रीनगार्ड सुद्धा फायदेशीर ठरते.

 

plastic-screen-guard-inmarathi

 

यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याची किंमत! प्लास्टिक गार्ड हे टेम्पर्ड ग्लासपेक्षा स्वस्त किमतीत मिळतं.

याशिवाय प्लास्टिक गार्ड हे टेम्पर्ड ग्लासपेक्षा अधिक काळ टिकणं शक्य असतं. हे सगळे मुद्दे लक्षात घेता टेम्पर्ड ग्लास हे प्लास्टिक गार्डपेक्षा जास्त फायदेशीर ठरतात असं म्हणता येईल.

हे सुद्धा वाचा – मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं? टेन्शन घेण्यापेक्षा हे वाचा

आता टेम्पर्ड ग्लास हा, मोबाईलसाठी अधिक उत्तम पर्याय आहे म्हटल्यावर कोणते टेम्पर्ड लावायचे हा प्रश्न निर्माण होतो. कारण आजकाल प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात ५०-५० रुपयात टेम्पर्ड ग्लास मिळायला लागले आहेत.

हे टेम्पर्ड ग्लास फारच स्वस्त आणि कमी दर्जाचे असतात, की तुम्ही एकाच खिशात किंवा बॅगेत मोबाईल आणि चाव्या ठेवल्या तर चाव्यांमुळे टेम्पर्ड ग्लास खराब झालेलं लक्षात येईल.

तर उत्तम टेम्पर्ड ग्लाससाठी तुम्ही पुढील गोष्टींचा विचार करू शकता.

१. मजबूत आणि हलकी :

मार्केटमध्ये उपलब्ध असलेले सगळ्यात मजबूत आणि हलके टेम्पर्ड ग्लास वापरणे फायदेशीर असते. ग्लासची जाडी ०.३ एमएम असून सुद्धा याचा हार्डनेस उत्तम असायला हवा.

टेम्पर्ड ग्लास बबल फ्री असायला हवे. या सगळ्या गोष्टी असल्यास टेम्पर्ड ग्लास चांगली आहे असं म्हणायला हवं.

 

bubble-free-screen-guard-inmarathi

 

२. राउंड एज स्क्रीन प्रोटेक्टर

२.५ एमएम राउंडेड एडज ग्लास असलेले टेम्पर्ड सुद्धा एकदम मजबूत असतात. या टेम्पर्ड ग्लासची विशेषता म्हणजे याचा फोनच्या टचवर कुठलाही परिणाम होत नाही. उत्तम फिंगरप्रिंट इफेक्ट आणि हाय टच सेन्सेटीव्हिटी या गोष्टी तशाच राहतात.

३. उत्तम व्हिजिबिलीटी असलेला स्क्रीन प्रोटेक्टर

टेम्पर्ड ग्लास हाय ड्युरेबिलिटी असणारा, म्हणजेच व्यवस्थित टिकणारा आणि मजबूत हवा. असं असूनही मोबाईल स्क्रीन स्क्रॅचपासून सुरक्षित ठेवणं आणि १००% व्हिजिबिलिटी असणं उत्तम ठरतं.

 

mobile-in-hand-inmarathi

 

आता प्लास्टिक स्क्रीनगार्ड की टेम्पर्ड ग्लास यापैकी नेमकं आपल्या मोबाईल डिस्प्लेला योग्य काय आहे, हे या माहितीवरून तुम्ही नक्की ठरवू शकाल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?