' हे वाचाल, तर वाचाल! स्त्रियांशी संभाषण करताना उपयोगी पडतील अशा खास आयडिया – InMarathi

हे वाचाल, तर वाचाल! स्त्रियांशी संभाषण करताना उपयोगी पडतील अशा खास आयडिया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संभाषण हे जर कौशल्य असेल तर बहुतांश पुरुषांना हे कौशल्य अवगत नसतं. मैत्रीण असो की बायको किंवा एकूणच महिलावर्गासोबत बोलताना पुरुषवर्गाकडून ज्या अक्षम्य चुका घडतात त्यामुळे नात्यात अंशकालीन ते दीर्घकालीन किंवा कायमचेच परिणाम होतात.

बोलता बोलता तुमची बायको किंवा प्रेयसी, मैत्रीण चिडून गप्प होत असेल, बोलता बोलता तुमचे खटके उडत असतील तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

‘तुला नं कळतच नाही मी काय बोलतेय ते, अरे मी काय बोलतेय तू काय उत्तर देतोयस?’, ‘मी काहीतरी बोलतेय आणि तुझं लक्षच नाहीये?’ ही आणि अशा प्रकारची वाक्य तुम्ही तुमच्या बायको, मुलगी, मैत्रीण किंवा समस्त स्त्री जातीतल्या कोणत्याही नात्याकडून ऐकत असाल, तर मित्रों आप खतरे में हो…

 

umesh-priya-inmarathi

 

देवानं स्त्री बनवली तेव्हा बहुदा शब्दांचं पिंप सांडलं असणार आणि पुरूष नावाचा जीव बनवला तेव्हा शब्दांबरोबरच ऐकण्याचं पिंपही तळाशी गेलेलं असणार. तर मित्रांनो, मुळातच तुमच्याकडे जे नाहीये त्याचा किल्ला तुम्हाला लढवायचा आहे.

बाईमाणसाशी बोलणं किती कठीण असतं हे ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ असं प्रकरण असतं. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि स्त्रीवर्गाशी शेकडो भांडणं, वाद, चर्चासत्रं यांच्यानंतर आम्ही घेऊन आलेलो आहोत पुरूषवर्गासाठी काही मोलाचे सल्ले-

ऐका, ऐका आणि नीट ऐका-

कसंय, ऐकणे ही संभाषणाची गुरूकिल्ली आहे. तुम्ही नीट ऐकलं की तुम्हाला योग्य उत्तर देता येतं. त्यामुळे समोरची स्त्री काय बोलतेय हे दोन्ही कानांनी अगदी नीट ऐका. नीट म्हणजे कसं? तर समजा तुम्हाला बायकोनं सांगितलं की मला शॉपिंगला यायचा मूड नाही. तर नाहीचा अर्थ इथे चल लग्गेच जाऊया शॉपिंगला असाच बहुतेकदा असतो.

 

couple shopping inmarathi

 

त्यामुळे व्याकरणानं सांगितलेले नियम स्त्रियांशी बोलताना लावायचे नाहीत हा पहिला सुवर्ण नियम.

भाषेचे त्यांचे असे स्वतंत्र नियम असतात, ते जाणून घ्या. ‘हो’चा अर्थ (चिडलेला) नाही असाही असू शकतो. काय करायचं जेवायला? याचा अर्थ हॉटेलमधे जाऊया किंवा मागवूया असा असण्याच्या शक्यता असतात.

उत्तम श्रोता होणं ही पहिली पायरी आहे. बेसावधपणे प्रतिक्रिया देऊ नका. समोरची स्त्री नेमकं काय बोलतेय हे समजून घेऊन पुरुषाने प्रतिक्रिया दिली तर त्यानंतरच्या समस्या उद्भवणार नाहीत.

हे सुद्धा वाचा – बुजऱ्या स्वभावामुळे मुलींशी बोलायला घाबरताय – मग हे नक्की वाचा!

सतत ‘मूग’ हाताशी ठेवा

मूग गिळून गप्प बसणे हा पुरुषवर्गासाठी customized केलेला वाकप्रचार आहे. समोरची बाई काही बोलत असेल आणि भलेही ती मोठ्या मनानं तुम्हाला सल्ला मागत आहे, असा भास झाला तरीही ती बोलत असताना मधेच अज्जिबात बोलायचं नाही.

आधी तिला बोलू द्यायचं. मग समजा, आपण थोडं तोंड उघडलं बोलायला आणि त्यावरून तिनं पुन्हा काही सांगायला सुरुवात केली तरीही जिथे आहात तिथेच थांबायचं.

तुमचा मुद्दा अजिबातच रेटायचा नाही. मुळात तुमच्याकडे मुद्दे असू शकतात हेच आधी विसरून जा.

एक योग्य मुद्दा समजावण्याच्या प्रयत्नात पुढे दोन तीन तास किंवा नंतरही आयुष्यभरात कधीही हा मुद्दा घेत भांडण आणि दीर्घ चर्चासत्र होऊ शकतं.

 

fighting-couple-inmarathi

 

भलते प्रश्न विचारू नका

स्त्रियांना प्रश्नांची ॲलर्जी असते. जितके जास्त प्रश्न तितके तुम्ही खतरे में मित्रो. विशेषत: जेव्हा तुम्ही एखादीकडे भावी गर्लफ्रेंड म्हणून बघत असता तेव्हा तर विशेष खबरदारी घ्या. काहीतरी प्रश्न विचारत बसायचे नाहीत. यानं नात्याला अकाली ब्रेक लागू शकतो आणि तुम्हाला आयुष्यभर कळतही नाही की आपलं नेमकं काय चुकलं?

 

 

अनेकजण ही चूक वारंवार करतात आणि मग इतक्या भावी गर्लफ्रेंड मुकाटपणे निघून जातात की एकप्रकारचा न्यूनगंड येऊ शकतो. मात्र आपलं काय चुकलं हे कधीच कळत नाही.

उदाहरणार्थ, तुमची मैत्रीण सिनेमाला गेल्यावर पॉपकॉर्न घेऊया म्हणाली की, गपचूप रांगेत जाऊन उभं रहायचं. उगाच कॅरमल का सॉल्टेड? बिग टब की मिडीयम? पाणी पण घेऊ का ? असे प्रश्न विचारत बसायचे नाहीत.

सावध रहे सतर्क रहे

समोरची मुलगी बोलत असताना तुम्ही नुसतं ऐकायचं असतं. एकच गोष्ट दहादा ऐकली तरीही अकराव्यांदा सुद्धा ती तितक्याच इंटरेस्टनं ऐकणं यातच हित आहे हे लक्षात घ्या.

हे संभाषणातलं एक निसरडं वळण आहे. होतं काय, की समोरची स्त्री बोलतच असते, बोलतच असते आणि तुम्ही ऐकल्यासारखं दाखवत असता. मनात बाहेरच्या जगातले विषय सुरू असतात आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण. ती नेमकं काहीतरी विचारते आणि तुम्ही कॅच आऊट होता कारण तुम्हाला माहितच नसतं तिनं काय विचारलं.

 

shahid-kareena-inmarathi

 

म्हणजे ती एखाद्या सिनेमाविषयी बोलता बोलता अचानकच तुमच्या शर्टच्या ब्रॅण्डविषयी काहीतरी विचारू शकते. स्त्रियांना देवानं दिलेलं हे वरदान आहे त्या जगातल्या कोणत्याही विषयावरून कोणत्याही विषयावर हनुमान उडी मारून पुन्हा पाचव्या वाक्याला मूळ विषयावर येऊ शकतात.

दुर्दैवानं ही जी खास चिप आहे; ती स्त्रीवर्गाला वाटून झाल्यावर संपल्यामुळे पुरूषांकडे ही दैवी शक्ती नाही. जे आपल्याला जमत नाही ते अजिबातच करायचं नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे मग एकच मार्ग उरतो, समोरच्या स्त्रीचं बोलणं काळजीपूर्वक टिपकागदासारखं टिपत रहाणं.

हे झालं समोरासमोर होणार्‍या संभाषणाविषयी. अलिकडे मोबाईल किंवा सोशल मिडियावरही संभाषण करावं लागतं. तिथेही काळजी घ्यायलाच हवी. आम्हाला तुमच्याबद्दल खरंच दिल के बॉटमसे सहानुभूती आहे.

तुम्ही सतत तणावाखाली रहावं याचसाठी देवानं सोशल मिडीया प्लॅटफ़ॉर्म आणि मोबाईलमधल्या चॅटींग ॲपची निर्मिती केलेली आहे. पण टेन्शन घ्यायचं काम नाही. इथे बोलण्याचेही काही नियम आज तुम्हाला समजणार आहेत.

 

social media inmarathi

 

१. शब्द जपून वापरा 

सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तुमचा चेहरा समोरच्या व्यक्तीला दिसत नसतो त्यामुळे फक्त तुम्ही निवडलेले शब्दच तिच्यापर्यंत पोहोचणार असतात. तेव्हा योग्य शब्दांची निवड आणि वाक्यांची योग्य लांबी हा पहिला नियम.

हे सुद्धा वाचा – “मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांच्या नशिबातच असतं का? कुठे चुका होतात? समजून घ्या

अगदी तुटक किंवा थोडक्यात लिहाल तर तुम्हाला संभाषणात इंटरेस्ट नाही असं ती समजेल. तिनं सांगितलेल्या एखाद्या गोष्टीवर नुसतंच ओके लिहिलं तर तिची खात्रीच पटेल की ती सांगतेय त्यात तुम्हाला अजिबतच इंटरेस्ट नाही आणि मग काही क्षणातच ती ऑफलाईन दिसण्याच्या शक्यता वाढतात. मग तुमच्या हॅलोवरही ब्लू टिक दिसली नाही की ओळखायचं पुढे काय वाढून ठेवलं आहे…

 

whatsapp-chat-inmarathi

 

२. अती चौकशी टाळा

समोरचीला विशेषत: जर ती नवी नवी मैत्रीण असेल तर अती प्रश्न विचारणं म्हणजे तिची चौकशी करणारे प्रश्न विचारणं टाळा. चौकसपणा चांगला असला आणि तुमचा हेतू कितीही चांगला, निरागस असला तरीही हे अज्जिबात करायचं नाही.

खाजगी प्रश्न नव्या ओळखीत किंवा मैत्रीत विचारले, तर समोरची स्त्री मनातल्या मनात तुमच्या नावावर लाल फुल्या मारत असते हे लक्षात घ्या.

३. संयम बाळगायला शिका

नवी नवी मैत्रीण, गर्लफ्रेंड किंवा बायको अशा कोणालाही जर तुम्ही मेसेज केला तर त्याचं उत्तर लगेचच मिळेल याची खात्री बाळगू नका. उत्तर येईपर्यंत मेसेजचा भडीमार करत सुटू नका.

बरेचजण हाय टाकलं आणि उत्तर आलं नाही तर हॅलो हॅलो करतच रहातात. तसं करू नका. तिला मेसेज पाठवल्यावर संयमानं वाट पहा. ती तासाभरानं, दिवसभरात कधीतरी किंवा महिनाभरानंही उत्तर देऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारायचा हे लक्षात घ्या.

 

hello-messages-on-whatsapp-inmarathi

 

४. कौतुक करताना सावधगिरी बाळगा

कौतुक करतानाही तुम्ही फ्लर्ट करताय असं वाटू देउ नका. कितीही मोह झाला तारीफ करायचा तरीही थोडा संयम बाळगायलाच हवा.

हा लेख वाचल्यानंतर तुमचं आयुष्य बर्‍यापैकी सुकर होईल ही आशा. मात्र हा विषयच इतका गहन आहे की तुम्ही तुमचा अभ्यास थांबवू नका.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?