' मुस्लिम शासकांनी ‘देवळांची डागडुजी’ केल्याचा कसलाही पुरावा नाही… – InMarathi

मुस्लिम शासकांनी ‘देवळांची डागडुजी’ केल्याचा कसलाही पुरावा नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ईशान घमंडे

===

भारतीय शिक्षणव्यवस्था, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. एकूणच शिक्षणपद्धती, शाळांमध्ये मुलांना शिकवणारे शिक्षक, शाळेत शिकवले जाणारे विषय इत्यादी गोष्टींवर चर्चा घडणं आणि मतमतांतरं असणं ही फारच सामान्य बाब म्हणता येईल.

‘शाळेत शिकवले जाणारे विषय’ या सदरात एक अत्यंत महत्त्वाचा विषय असतो, तो म्हणजे इतिहास! शाळेत शिकवला जाणारा इतिहास योग्य की अयोग्य हा चर्चेचा अजरामर विषयच ऐतिहासिक ठरावा इतकी यावर चर्चा होते.

अनेकदा त्याचा चावून चोथा होतो. मात्र, इतिहासावर होणाऱ्या चर्चा काही थांबत नाहीत. छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास चार पानातच संपून गेलाय अशी कुणी टीका करतं, तर मुघल आणि ब्रिटिशांना अवास्तव महत्त्व देऊन त्यांच्या इतिहासाचा उदोउदो करण्यात आलाय अशी टीका झालेली सुद्धा पाहायला मिळते.

 

shivaji mharaj InMarathi 1

 

यातलं सत्य-असत्य पडताळून पाहणं आणि त्यावर सातत्याने चर्चा होणं या गोष्टी तर घडत राहणारच. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, इत्यादी स्वातंत्र्यसैनिकांचा संपूर्ण इतिहास शाळेतील विद्यार्थ्यांना शिकायला  मिळत नाही, यावर कुणाचेही दुमत नसेल.

इतिहास जाणून घ्यायची इच्छा आणि जिज्ञासा असणाऱ्या लहान वयात, तो सांगितला जातच नाही. ही परिस्थिती तर अगदी अलीकडच्या काळातील इतिहासाची.

एकूणच शालेय जीवनातील इतिहास पाहिला, तर नेमकं काय शिकवलं जातं यावर प्रश्नचिन्ह उभं राहावं.

उत्तेरकडील राज्य आणि राजांबद्दल भरभरून माहिती देणारी शालेय पुस्तकं दक्षिणेकडील साम्राज्यांकडे मात्र सहज दुर्लक्ष करतात. चोल साम्राज्य असेल, दक्षिणेतील प्राचीन आणि अप्रतिम मंदिरं असतील, किंवा अशाच अनेक गोष्टी. पाठ्यपुस्तकांमधून यांच्याविषयी कधी काही वाचलेलं आठवत नाही.

अगदी हंपी सारख्या प्राचीन शहराबद्दल सुद्धा  चित्रपट आणि इतर पुस्तकांच्या माध्यमातून जाणून घ्यावं लागतं. शाळेत शिकलेला इतिहास आठवतो तो फक्त मुघल आणि ब्रिटिशकालीन!

 

Hampi Inmarathi

 

दिल्लीच्या तख्तापलीकडे हा शालेय इतिहास झेपच घेत नाही. आजचा इतिहास सुद्धा ‘दिल्लीचं तख्त राखत असलेलाच पाहायला मिळतो. ‘राष्ट्रकूट, सातवाहन, विजयनगर ही किंवा अशीच इतर काही नावं केवळ ऐकल्यासारखी वाटली असतील, पण त्याविषयी शाळेत फार काही सांगितलं गेलं नाही हे जाणवत असेल. कारण, शिकवलं जातं ते मुघलांबद्दल आणि तेसुद्धा हव्या त्या पद्धतीने…

हे सुद्धा वाचा

मुघलांच्या धादांत खोट्या उदात्तीकरणाच्या पर्दाफाश करणारी हि ५ उदाहरणे आपले डोळे उघडतात!

होय, हव्या त्या पद्धतीने म्हणालो कारण, नुकत्याच चर्चेत आलेल्या मुद्द्यानुसार NCERT अर्थात, ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ यांच्या एका पाठ्यपुस्तकावरच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं आहे.

युद्धात नष्ट करण्यात आलेली किंवा विध्वंस झालेली मंदिरं मुघलांनी पुन्हा बांधली आहेत, असा उल्लेख पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला आहे. शहाजहाँ आणि औरंगजेब यांच्या काळात या कामासाठी अनुदान दिलं जात असे असा उल्लेख यात आढळतो.

याविषयी कुठलाही सबळ पुरावा उपलब्ध नसल्याचं NCERT यांनी म्हटलं आहे. Themes of Indian History (Part 2) या पुस्तकात या अनुदानाचा उल्लेख केलेला आढळतो.

 

themes-of-indian-history-part-2-inmarathi

 

पाठ्यपुस्तकात उल्लेखित माहितीबद्दल कुठलाही ठोस पुरावा नसल्याचं मात्र त्यांनी मान्य केलं आहे. Rights to Information म्हणजेच माहितीच्या अधिकाराअंतर्गत त्यांना याविषयी प्रश्न करण्यात आला होता.

२०२० च्या नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या या अर्जात मुख्य दोन प्रश्न विचारले गेले होते.

१. पान क्रमांक २३४ वरील दुसऱ्या परिच्छेदात शहाजहान आणि औरंगजेबाच्या काळातील मंदिरांच्या अनुदानाचा मुद्दा आढळतो. याविषयी कुठला पुरावा उपलब्ध आहे.

२. औरंगजेब आणि शहाजहान यांच्या काळात डागडुजी करण्यात आलेल्या मंदिरांचा आकडा सांगण्यात यावा.

या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कागदपत्रांमधगये उपलब्ध नाहीत असं उत्तर यावर देण्यात आलं आहे.

 

ncert-rti-answer-inmarathi

 

याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ काढायचा झाला, तर ‘वाटेल तो’ इतिहास शिकवला जात आहे, असं म्हणायला वाव नक्कीच आहे.

या पाठ्यपुस्तकातील उल्लेखानुसार मुघल साम्राज्याला ‘A Uniyfying Force’ असं म्हणण्यात आलं आहे. याचा संदर्भ अबुल फजल यांनी लिहिलेल्या अकबरनामा या पुस्तकात आढळतो.

या पुस्तकात असं म्हटलं गेलं आहे, की अकबराने अनेक धर्मांतील आणि समाजातील लोकांना आपल्या दरबारी घेतलं होतं. याशिवाय या व्यक्त्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. याचा उल्लेख पाठ्यपुस्तकात केलेला आढळतो.

मंदिरांच्या पुनुरुत्थानाचा संदर्भ येतो, तिथे मात्र कुठलाही पुरावा दिलेला आढळत नाही. म्हणूनच शिवांक वर्मा यांनी याविषयी अधिक माहिती मिळवण्याचं ठरवलं. त्यांच्याकडून फाईल करण्यात आलेल्या RTI ला आलेलं उत्तर मात्र ‘डोंगर पोखरून उंदीर काढला’ असं म्हणावं असंच आहे.

हे सुद्धा वाचा

“माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय? त्याचा वापर कसा करावा? समजून घ्या…!

शाळेतील मुलांना, म्हणजेच भारताचं भविष्य असलेल्या पुढच्या पिढीला योग्य इतिहास शिकवला जातोय का, हे जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करावा लागणं, हीच लाजिरवाणी बाब आहे.

 

students-inmarathi

 

त्याही पुढे जाऊन, पाठ्यपुस्तकात लिहिलेल्या गोष्टींविषयी, मिळालेलं उत्तर ‘आमच्याकडे याबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाही’ अशा आशयाचं आहे, यावर काय बोलणार…

इतिहासाची चिरफाड केली जातेय की नाही त्याचे पुरावे मिळोत अथवा न मिळोत, त्याविषयी सातत्याने विचारण्यात येणारे प्रश्न कुठेही चुकीचे नाहीत, हे मात्र खरं…!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?