' एका “तरूणी”च्या शील रक्षणार्थ एका रात्रीत गायब झालेलं ‘शापित’ गाव… – InMarathi

एका “तरूणी”च्या शील रक्षणार्थ एका रात्रीत गायब झालेलं ‘शापित’ गाव…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपल्या भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना भूता-प्रेतांच्या गोष्टींशी जोडलं जातं. अशा अनेक जागा आहेत, जिथले रस्ते, एखादं घर किंवा सगळा परिसरचं त्या भुताखेत्यांच्या गोष्टीत अडकलेला असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वर्षानुवर्ष या कथा चवीने चघळल्या जातात. अनेकदा तर देशभरातून तर या जागांना भेट दे्ण्यासाठी पर्यटकातून येतात. त्यातलं तथ्य किती हा भाग वेगळा, पण त्या ठिकाणाशी निगडीत सुरस, चमत्कारिक कथा ऐकायला, वाचायला मात्र फार मजा येते.

आज आम्ही तुम्हाला भारतातील अश्याच एका गावाची गोष्ट सांगणार आहोत, ज्या गावाबद्दल आजही असंख्य गूढ आणि भयानक कथा प्रचलित आहेत.

 

Kuldhara-inmarathi

 

राजस्थानच्या जैसलमेर मध्ये कुलधरा नावाचे गाव आहे. संपूर्ण जगभरात या गावाच्या गूढ कथांबद्दल चर्चा होते.

इथे नेमके काय घडले असेल या बद्दल तर्कवितर्क लढवले जातात. त्याचं झालं असं की एका रात्रीमध्ये अख्ख गाव गायब झालं.

म्हणजे रात्रीपर्यंत गावात सगळे होते, पण दुसऱ्या गावातल्या लोकांना सकाळी आढळलं की गावात काहीच हालचाल नाही. याच चमत्कारिक घटनेमागचे सत्य आजही शोधले जात आहे, पण कोणालाच ठोस कारण आजवर देता आलेले नाही.

वाळवंटाच्या अगदी मधोमध हे गाव वसलेले आहे. येथील निशब्द वातावरण अंगावर अधिकच शहारे आणतं.

 

Kuldhara-inmarathi

 

जेव्हापासून एका रात्रीत हे गाव उजाड झालं तेव्हापासून पुन्हा कधीही कोणीही इथे फिरकत नाही. असं म्हणतात की जवळपास २०० वर्षांपूर्वी कुलधरा हे गाव उजाड नव्हतं.

अगदी गजबजलेलं आणि धन धान्यांनी संपन्न असं या गावाचा नावलौकिक होता. परंतु ती काळरात्र आली आणि सारं काही क्षणार्धात नाहीसं झालं.

या सर्वाला कारणीभूत ठरला राज्याचा दिवाण सलीम सिंह!

झालं असं की गावाच्या पुजाऱ्याच्या मुलीवर सलीम सिंहाचं प्रेम जडलं. तिला मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. पण ती मुलगी काही त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हती.

गावकरी देखील त्या मुलीच्या बाजूने होते. शेवटी चिडलेल्या सलीम सिंहाने गावकऱ्यांना काही दिवसांची मुदत दिली. त्या मुलीला लग्नासाठी तयार करायला सांगितले.

 

Kuldhara-inmarathi

 

गावकऱ्यांनी या समस्येमधून मार्ग काढण्यासाठी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. गावातील तब्बल ५००० कुटुंबांनी आपल्या सर्व संसारासकट गाव सोडला, केवळ त्या मुलीच्या स्वाभिमानासाठी!

त्या रात्री संपूर्ण गाव शांत झालं ते कायमचच! जाणून तिथे कोणी राहतच नव्हतं असं म्हणतात की जाताना गावकऱ्यांनी त्या जागेला शप दिला की

कोणीही या जागी वास्तव्य करू शकणार नाही.

काही वर्षांपुर्वी हा शाप दिला खरा, मात्र त्यानंतर पुढे या गावाचं भवितव्यंच अंधारात ढकललं गेलं.

तेव्हापासून हे गाव भूत-पिशाच्च्च यांच्या अधिपत्याखाली आहे असं आसपासच्या गावातले गावकरी सांगतात.

येथे राहायचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तसेच येथे आजवर बऱ्याच चित्रविचित्र घटना घडल्याने कोणीही या गावाकडे कधी फिरकत नाही.

 

Kuldhara-inmarathi

 

ही कथा खरी की खोटी माहिती नाही.

पण एक मात्र खरं – त्या घटनेनंतर आसपासची गाव बदलत्या काळानुसार बदलत गेली, संपन्न झाली, परंतु कुलधरा मात्र शापित गावाप्रमाणे आजही विराण आणि उजाड आहे!

या गावांबद्दल केवळ चर्चा होते, भितीदायक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र गावांत लोक फिरकल्याचं किंवा राहिल्याचा मात्र कोणताही पुरावा मिळत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?