' पाणी पिण्याबद्दलची ही नियमावली माहीत नसेल तर स्वस्थ आरोग्य अशक्यच!

पाणी पिण्याबद्दलची ही नियमावली माहीत नसेल तर स्वस्थ आरोग्य अशक्यच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पाणी म्हणजे जीवन मानलं जातं. शरीराला अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे. मात्र गरज नसताना पाणी प्यायल्यामुळे किंवा चुकीच्या वेळेस पाणी प्यायल्याने त्याचा उपयोग होण्याऐवजी दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच पाणी पिताना काही गोष्टींची, विशेषत: पाणी कधी पिऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

निरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात आणि ती म्हणजे, अमूक लिटर, अमूक इतके ग्लास पाणी दिवसभरात संपवलंच पाहिजे हा विचित्र नियम पाळणं.

 

water inmarathi

 

शिवाय हा नियम पाळताना चुकीच्या वेळात पाणी पितच रहाणं सुद्धा अपायकारक आहे. पाणी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेच. मात्र ते पिताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. किती पाणी प्यावं याचबरोबर ते कधी प्यावं हेदेखील लक्षात घ्यायला हवं.

आपलं शरीर म्हणजे एक चमत्कारिक यंत्रच आहे. त्याच्या गरजा ते योग्यवेळी व्यक्त करतं आणि तितकीच ती भागवतंही. भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. अनेकजण उगाचंच तहान लागलेली नसली तरीही सतत पाणी पितच राहतात. हे शरीराच्या रचनेविरूध्द आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की घशाला कोरड पडेपर्यंत वाट बघावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

चुकीच्या वेळी पाणी पिणं आणि पाण्याच्या अतीसेवनानं शरीरातल्या मिठाचं अर्थात सोडीयमचं संतुलन बिघडतं. याला Hyponatremia असं म्हणतात. यामुळे कधी कधी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

किती पाणी प्यावं याची माहिती बहुतेकांना असतेच, मात्र आज आपण कधी पाणी पिऊ नये, याची माहिती घेणार आहोत.

झोपण्यापूर्वी

अनेकांना झोपण्यापूर्वी पाणी, ग्रीन टी, चहा, कॉफी असं काहीतरी पिण्याची सवय असते. मात्र झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी पोटात कुठलाही द्रवपदार्थ जाऊ देऊ नये.

 

coffee inmarathi

 

झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यानं झोपेत व्यत्यय येतो. जास्त वेळा लघवीला जाण्याच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच झोपण्यापूर्वी अर्धा तास पोट रिकामं असावं. यामुळे झोपही शांत लागते.

दिवसाच्या तुलनेत रात्री आपल्या किडण्या मंदपणे काम करत असतात. याच कारणामुळे सकाळी उठल्यावर बरेचदा चेहरा सुजलेला दिसतो. त्यात जर झोपण्यापूर्वी पाणी प्यायलं तर ही सूज वाढण्याची शक्यता असते.

व्यायाम करत असताना

तज्ज्ञांच्यामते व्यायामाच्या दरम्यान पाणी प्यायल्यानं त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता बळावते. व्यायाम करत असताना शरीराचं तापमान वाढलेलं असतं.

 

hritik-exercise-inmarathi

 

यावेळेस जर थंड पाणी जास्त प्रमाणात प्यायलं तर electrolyte depletion ची शक्यता असते. याची लक्षणं म्हणजे, डोकं दुखणे, मळमळ, थकवा जाणवणे. शक्यतो व्यायाम झाल्यावरच पाणी प्यावे आणि व्यायामा दरम्यान तहान लागलीच तर दरम्यान भरपूर पाणी न घोट घोट पाणी प्यावे.

याचबरोबर ज्यांना ह्रदविकाराचा त्रास आहे अशांनी पाण्याचं अतिसेवन टाळावं. अतिरिक्त पाण्यामुळे ह्रदयावर ताण पडतो.

लघवीला रंग नसेल तर

आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत की नाही? याची सोपी टेस्ट म्हणजे, लघवीचा रंग तपासणे. जर तो फिका पिवळट असेल तर आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत.

जर लघवीला रंगच नसेल आणि ती पाण्यासारखीच पारदर्शक असेल, तर मात्र पाण्याचं अतिरिक्त सेवन होत आहे. अर्थात हे सातत्याने होणं योग्य नाही. असं होत असेल, तर पाणी कमी प्यावं. पाण्याच्या अतिसेवनामुळे सोडियमची कमतरता जाणवू लागते आणि कधी कधी ह्रदविकाराचा झटका येण्याची शक्यताही असते.

 

heart-attack-inmarathi

 

मसालेदार/तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर

अगदी सर्रास घडणारी चूक म्हणजे, आपल्याला मिरचीचा तिखटपणा लागला की आपण तो दाह शमवण्यासाठी भरपूर पाणी पितो.

 

red chilli inmarathi

 

हा जो दाह होत असतो त्याचं कारण असतात, capsaicin molecule. यांना शांत करायचं असेल तर nonpolar sustancesमध्येच ते विरघळावे लागतात.

याचा पर्याय पाणी नसून दूध आहे. पाणी प्यायल्यानं खरं तर परिस्थिती आणखिनच गंभीर होते. पण अनावधानानं तिखट लागलं की आपण नेमकं पाणीच पितो.

जेवणापूर्वी /जेवताना/ जेवल्यानंतर लगेचच

जेवताना कधीच पाणी पिउ नये. तसेच जेवायला बसण्यापूर्वी किमान अर्धातास आधी पाणी प्यावं. पाणी पिऊन लगेचच जेवू नये. याचबरोबर जेवल्यावरही लगेचच पाणी पिऊ नये. किमान पंधरा मिनिटांची वेळ असावी, त्यानंतरच पाणी प्यावं.

हे सुद्धा वाचा

जेवणानंतर किंवा जेवणाआधी पाणी प्यावे का नाही? यामागचे गैरसमज दूर करून घ्या!

जेवणादरम्यान अल्कोहोलिक पेयं किंवा थंडगार पाणी पिऊ नये. यामुळे पचनावर परिणाम होतो.

 

cold-water-inmarathi

 

उभं राहून

मोठी माणसं नेहमी सांगतात की उभं राहून पाणी पिउ नये. बसून आणि घोट घोट प्यावं. एकदम ढसाढसा पाणी प्यायल्याने श्वास कोंडण्याची शक्यता तर असतेच शिवाय टाचदुखीलाही तोंड द्यावं लागतं.

 

drink water inmarathi

 

फ्रिजमधलं/ बर्फ घातलेलं पाणी

अनेकांना अगदी थंडगार पाणी प्यायची सवय असते. फ्रिजमधलं एकदम थंडगार किंवा बर्फ घातलेलं पाणी प्यायल्याशिवाय त्यांची तहानच भागत नाही.

 

ice-water-inmarathi

 

फ्रिजमधून बाटली काढून थेट घटघट पाणी पिण्याची सवय घातक आहे. विशेषत: रात्रीच्यावेळेस थंडगार पाणी पिणं टाळायलाच हवं.

सकाळी रिकाम्यापोटी

अनेकांचा असा समज असतो की सकाळी उठल्यावर अनुशापोटी म्हणजे पोट रिकामं असताना भरपूर पाणी प्यावं. हे अगदी चूक आहे.

रिकाम्या पोटी जास्तीत जास्त एक लिटरपर्यंत पाणी प्यावं. अनुशापोटी पाणी पिणं लाभकारक असलं तरीही लिटरच्या लिटर पाणी पिणं असा त्याचा अर्थ नाही. तसेच गार पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायलं तर आरोग्याच्या दृष्टिनं ते जास्त लाभकारक ठरेल.

 

Boiling water InMarathi

 

आयुर्वेदाचे नियम

आयुर्वेदात आहारविहाराचे जसे नियम आहेत तसेच ते पाणी पिण्याविषयिही आहेत. आयुर्वेद सांगतो की, पाणदेखील अन्नाप्रमाणेच पचवावे लागते. म्हणूनच तेही सजगपणे प्यावे. थंडगार पाणी न पिता उकळून थंड केलेले, अग्निसंस्कार झालेले पाणी जास्त चांगते.

सर्दी, पडसं, स्थूल व्यक्ती, अजीर्णाचा त्रास असणार्‍यांनी थंड पाणी टाळून नेहमी कोमट पाणी प्यावे.

 

cough-and-cold-inmarathi

 

ऋतुनुसार पाणी

ऋतुनुसार पाण्याची दिनचर्या बदलली पाहिजे. विनाकारण वर्षभर तांब्या किंवा जगभर पाणी पिऊ नये. ग्रीष्म (वैशाख व ज्येष्ठ) तसेच शरद (अश्र्विन व कार्तिक) या दोन ऋतुत इच्छेनुसार पाणी प्यावे.

बाकी ऋतुंमधे पाणी कमी प्यावे. विशेषत: पावसाळ्यात जास्त पाणी पिऊ नये. निर्जला एकादशीची योजना याचसाठी केलेली आहे.

पाणी पिण्याचे थोडक्यात नियम

*जेवताना पाणी पिऊ नका. जेवणापूर्वी अर्धा तास आधी पाणी प्या

*व्यायाम करताना घटघट पाणी पिऊ नका. व्यायामापूर्वी दहा मिनिटे पाणी प्या

*झोपण्याआधी पाणी पिणं चांगलं असतं. मात्र पाणी पिणं आणि झोपणं यात अर्ध्या तासाचं अंतर असू द्या

*सकाळी व्यायाम केल्यानंतर २० मिनिटांनंतर पाणी प्या. यामुळे दिवसभर शरीरातली पाण्याची पातळी योग्य रहाते.

*कमी प्रमाणात मीठ आणि जास्त प्रमाणात पाणी कधीही असू नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?