' WhatsApp, Telegram आणि Signal app? तुमच्या शंकांचं निरसन करणारा खुलासा! – InMarathi

WhatsApp, Telegram आणि Signal app? तुमच्या शंकांचं निरसन करणारा खुलासा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

व्हॉट्सॲपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेकजण टेलिग्रॅम, सिग्नल सारखी ॲप इन्स्टॉल करू लागले आहेत.

काही वेळापूर्वीच, टेलिग्रॅम ने ट्विट केलंय की, they have reached 500 million users. 25 million new users have joined in last 72 hours. 38% from Asia, 27% from europe, 21% from latin America.

टेलिग्रॅमच्या बाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते की फक्त मेसेजेसचा विचार केला तर व्हॉट्सॲप हे टेलिग्रॅम पेक्षा जास्त सेफ आहे! कारण त्यांचे मेसेजेस encrypted असतात आणि टेलिग्रॅमचे मेसेजेस encrypted नसतात.

टेलिग्रॅमच्या बाबतीत, तुम्ही जर “secret chat” चालू केलात तरच ते encrypt होतात आणि स्टोअर केले जात नाहीत. Otherwise नॉर्मल मेसेजेस हे encrypted नसतात.

 

telegram inmarathi 2

 

तुम्ही म्हणाल की जर व्हॉट्सॲपचे मेसेजेस encrypted असतात तर फेसबुकसारखी दुसरी ॲप्स ती कशी वाचू शकतात? त्याचं उत्तर असं आहे की व्हॉट्सॲपचा चॅट बॅकअप encrypted नसतो.

तुम्हाला माहितच असेल की रोज रात्री २ च्या आसपास व्हॉट्सॲप automatic backup घेतो. तुमच्या मेसेजेसचा हा backup तुमच्या फोनवर (local) किंवा गुगल ड्राईव्ह (cloud) वर सेव्ह केला जातो.

तुमच्या फोनवर असलेल्या ज्या ज्या अ़ॅप्स ना (मग ती कुठलीही असो) storage permission दिली गेली आहे, ती सर्व ॲप्स whatsapp चा तो backup access करू शकतात.

फेसबुक हाच बॅकअप access करते आणि तुमचा डेटा वाचते. तुमचा backup local च्या ऐवजी google drive वर (म्हणजेच cloud मध्ये) घेतला गेला असेल तर गुगलही तो डेटा, म्हणजेच तुमचे सर्व चॅट्स, वाचू शकते.

आता तुम्हाला कळलं असेल की व्हॉट्सॲपचा डेटा सेफ का नाही! व्हॉट्सॲप असा दावा करते की त्यांचे मेसेजेस end to end encrypted असतात.

 

encryption 3 inmarathi

 

ते खरंही आहे पण त्याचा अर्थ इतकाच की तुम्ही दुसऱ्याला मेसेज पाठवताना transit मध्ये दुसरा कोणी ते communication hack करून मेसेजेस वाचू शकत नाही.

थोडक्यात असं की, व्हॉट्सॲपनी आमचे मेसेजेस end to end encrypted असतात असं सांगून फक्त अर्धसत्य सांगितलेलं आहे. तोच मेसेज फोनवर बॅकअपच्या स्वरूपात सेव्ह झाल्यावर सेफ रहात नाही हे ते उघडपणे बोलले नाहीत.

टेलिग्रॅमच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे मेसेजेस end to end encrypted ही नाहीत आणि त्यांचा बॅकअपही encrypted नाही. तुम्ही जर व्हॉट्सॲपच्या नवीन पॉलिसीमुळे टेलिग्रॅम वर “शिफ्ट” होत असाल तर ह्या वरील गोष्टीचा विचार जरूर करा.

लोकांना आकर्षित करण्यासाठी टेलिग्रॅम ने interesting features खूप दिले आहेत. त्या additional features च्या मोहामुळे encryption नसताना सुद्धा users टेलिग्रॅमकडे आकर्षित होतील किंवा व्हावे असा त्यांचा विचार (डाव) असावा.

सिग्नल मेसेंजर बद्दल बोलायचं झालं तर ते आजच्या घडीला सगळ्यात सेफ ॲप आहे. त्याचं end to end communication encrypted आहेच शिवाय encrypted आहे.

 

signal inmarathi

 

ॲप open source आहे आणि त्याचा source code तुम्हाला internet वर वाचण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ॲपमध्ये काही छुप्या गोष्टी दडलेल्या नाहीयेत ना हे चेक करता येतं.

ह्या शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲप सारखं हे ॲप गुगुल ड्राईव्ह सारख्या “third party” cloud storage मध्ये सेव्ह करत नाही त्यामुळे त्यांनी तो डेटा access करायचा प्रश्नच येत नाही.

सिग्नल मध्ये features खूपच कमी आहेत. शिवाय त्याचा look & feel सुद्धा ugly म्हणावा असाच आहे. पण मला वाटतं तो हळूहळू सुधारेल. त्यांचा मुख्य फोकस security असल्याने त्यांनी सध्यातरी ॲपच्या beautification कडे लक्ष दिलेलं नाही.

लोकांच्या मनातली अजून एक शंका म्हणजे कशावरून हे सिग्नल किंवा टेलिग्रॅम फेसबुकसारख्या एखाद्या कंपनीकडून take over होणार नाहीत आणि ते ही व्हॉट्सॲप सारखेच का होणार नाहीत?

पण जर झाले तर तेव्हाचं तेव्हा बघून घेऊ ना. आजच्या मितीला तर सेफ आहे ना! आणि हि अ़ॅप्स व्हॉट्सअ़ॅप सारखीच होतील आणि डेटा शेअर करतील असा विचार करणं म्हणजे pessimism झाला.

पन्नास टक्के शक्यता आहेच की ती नाही होणार! उदाहरणच द्यायचं झालं तर linux operating system चं घ्या. आजही ती open source आहे, robust आहे, safe आहे. जिथे जिथे security आणि robustness ला priority असते तिथे लोक आजही linux च prefer करतात.

 

linux os inmarathi

 

सांगायचा मुद्दा असा की, ह्या सगळ्या बाळांचं, आज जरी गोंडस दिसत असले तरी, पुढे जाऊन माकड होईल आणि तेही तसेच माकडचाळे करतील तेव्हा तुम्ही काय कराल असं म्हणण्यात तथ्य नाही.

व्हॉट्सअ़ॅप चालू ठेवायला हरकत नाही (कारण लगेच ते वापरणं बंद करणं practically शक्य नाहीये. हे फेसबुकलाही चांगलच माहिती आहे) पण महत्वाची, sensitive कागदपत्रे, मजकूर शेअर करणं टाळा.

तुम्हाला electronically, शेअर करायची वेळ आलीच तर सिग्नल हा सध्यातरी उत्तम मार्ग आहे. व्हॉट्सॲपच्या नवीन पॉलिसीजमुळे ॲप वापरणं बंद करावे किंवा कसे ह्यावर जेव्हा लोक चर्चा करतायेत तेव्हा काही लोक असंही म्हणतायेत की, काय फरक पडतो?

असं कुठे गोपनीय आणि फार sensitive गोष्टी share करतोय आपण? आणि तसंही व्हॉट्सॲप आधी करतच होते आता फक्त ते तुमच्या परवानगीने चोरी करणार.

तर त्याचं उत्तर असं की, समजा, तुमच्या घरात रोज एक माणूस येतो, तुमच्या घरची कामं करतो, तुम्हाला मदत करतो पण त्याचवेळी, तुम्ही काय बोलताय, काय करताय ह्यावर लक्ष ठेवतो.  तुम्हाला काही उपद्रव करत नाही.

त्याचं काम एकच, रोज तुमच्या घरी येऊन, तुम्हाला मदत करतोय असं दाखवत तुमचं बोलणं ऐकायचं आणि तुम्ही काय करता ते पहाणं. आणि हे सगळं फुकट! हि सगळी माहिती घेऊन तो बाहेर कोणाला सांगतो किंवा नाही ते आपल्याला माहित नाही. असं झालं तर चालेल का तुम्हाला?

तुम्हाला जर कोणी हे सगळं सांगितलं की बाबा तुझ्या घरी येणारा तो माणूस असं असं करतोय, तू सावध रहा तर तुम्ही असं म्हणाला का की काय फरक पडतो, असं कुठे काय आम्ही फार sensitive आणि गोपनीय बोलत असतो? काम करतोय तर असू दे.

आणि दुसरी गोष्ट अशी की, तुम्ही नसाल फार sensitive data share करत पण अनेक लोक, जसे की डॉक्टर्स, वकील, अनेक उच्चपदस्थ अधिकारी व्हॉट्सॲपचा उपयोग महत्वाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी करतात. अनेक पेशंट्स त्यांचे रिपोर्ट्स इतर काही वैयक्तिक माहिती डॉक्टरांना पाठवत असतात. वकिलांबाबतही तेच आहे.

 

whatsapp sharing inmarathi

 

अंधपणे आणि केवळ दुसरा करतो म्हणून तुम्ही व्हॉट्सॲप वापरायचं किंवा नाही असं करू नका. वस्तुस्थितीची जाणीव असावी म्हणून हि पोस्ट! जे कराल ते डोळे उघडे ठेवून, नीट समजून करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?