' धूम्रपानच नाही, तर हे खाद्यपदार्थ सुद्धा तुमची फुफ्फुसं ‘निकामी’ करू शकतात! – InMarathi

धूम्रपानच नाही, तर हे खाद्यपदार्थ सुद्धा तुमची फुफ्फुसं ‘निकामी’ करू शकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रमेशला जेव्हा डॉक्टरनी फुफ्फुसाची व्याधी असल्याचं निदान केलं तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण, त्यानं आयुष्यात कधीही सिगरेटला हातही लावलेला नव्हता.

फुफ्फुसांना सर्वात जास्त धोका धुम्रपानापासून असतो हे तर आपल्याला माहितच आहे, मात्र असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यापासून धुम्रपानाइतकाच धोका आहे.

पोटाचं आरोग्य जितकं उत्तम तितकं शरीर तंदुरूस्त! म्हणूनच आपण काय, किती आणि कसं खातो याला फार महत्व आहे.

आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक व्याधींनी आपलं जीवन ग्रस्त करून टाकलं आहे. अशीच एक व्याधी आहे, COPD (chronic obstructive pulmonary disease). फुफ्फुसाशी संबंधित या विकारात श्वसनाचा त्रास होतो.

श्वसनाचा त्रास हा केवळ धुम्रपानामुळे किंवा न्युमोनियामुळे होत नाही, तर आहाराच्या चुकीच्या सवयींमुळेही हा त्रास होतो. तज्ञांच्या मते आहारविहारातल्या सकारात्मक बदलांनी या व्याधीवर मात करता येते.

 

quit smoking inmarathi

 

आहारातले बदल इतर व्याधींप्रमाणेच इथेही चांगले बदल दाखवतात, आणि म्हणूनच ते उपयोगी पडतात.

घरचं पौष्टिक खाणं हे दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे ही चिंतेची बाब आहे. कधी सोयीचं म्हणून तर कधी मजा म्हणून बाहेरचे खाद्यपदार्थ विशेषत: फ्रेंचफ्राईज, बर्गर असे फास्टफूड गटात मोडणारे पदार्थ खाण्याचं प्रमाण सर्वच वयोगटात वाढत चाललं आहे.

यामुळे वजनही नियंत्रणाबाहेर वाढण्यास सुरुवात होते. वजन वाढलं की ताबडतोब डाएटिंगला सुरवात केली जाते. अमूक प्रकारचं तमुक प्रकारचं डाएट करता करता तब्येतीचं आणखीच जास्त नुकसान केलं जातं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :


यासाठी सर्वात आधी एकमहत्वाचा बदल करावा, अलीकडच्या फॅडनुसार सतत काहीतरी खात राहण्याऐवजी नैसर्गिकरित्या लागणार्‍या भुकेकडे लक्ष द्यावं आणि आपल्या शरीराचं भुकेचं वेळापत्रक ओळखून त्यानुसार आहार घ्यावा.

यात सगळ्यात महत्वाचं हे आहे की, भुकेच्यावेळेस सकस खाद्यपदार्थांचं सेवन करणं. अलिकडे अनेकजण केवळ जिभेचे चोचले म्हणून जंक, फास्टफूड खाण्यावर भर देतात.

 

 

प्रत्येक भुकेच्यावेळेस जर सकस आहार घेतला तर केवळ वजनच नियंत्रणात रहाणार नाही, तर थकवा येणं, कामाची इच्छा नसणं, झोपेची समस्या हे सगळंच आटोक्यात राहिल.

हेल्दी डाएट अर्थात सकस, पोषक आहार ही सहजासहजी न लागणारी सवय आहे. त्यातच चोवीस तास सतत कसला ना कसला तणाव असणं आणि आहाराच्या अयोग्य सवयी यामुळे COPD आणि इतर फुफ्फुसाच्या व्याधींमधे रुग्णांना त्रास होताना दिसतो.

खरं तर अनेक व्याधींचा उपचार हा आपल्या अक्षरश: हातात असतो. म्हणून जीभेला चविष्ट लागतंय, डोळ्याला छान दिसतंय म्हणून काहीही खात सुटण्यापूर्वी थोडा विचार करा. पोटात ढकलण्याचे पदार्थ काळजीपूर्वक निवडल्यास पुढे आरोग्याची काळजी उरणार नाही.

असे सात प्रकारचे पदार्थ आहेत ज्यांची नावं वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज रहाणार नाही. या सात पदार्थांमुळे फुफ्फुसांच्या व्याधी जास्त बळावतात. म्हणूनच ज्यांना हा त्रास आहे त्यांनी या सात प्रकारच्या पदार्थांपासून दूरच राहिलं पाहिजे.

पित्तकारक पदार्थ आणि पेयं:

घशाशी येणं, घशाशी जळजळ, छातीत जळजळ हे सगळं जर आठवड्यातून दोनपेक्षा जास्तवेळा होत असेल तर ती acid reflux disease ची लक्षणं समजावीत.

फुफ्फुसाची व्याधी असणार्‍यांना जर हा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास झाला तर त्यांना आणखीच बेचैन होऊ शकतं. म्हणूनच पित्त होणारे पदार्थ टाळले पाहिजेत. आंबट फळं, फळांचे रस, टोमॅटो सॉस, कॉफी आणि अति मसालेदार पदार्थ खाण्यातून एकतर वर्ज्य करावेत किंवा अगदी कमी प्रमाणात खावेत.

 

spicy food inmarathi

 

कार्बनयुक्त पेयं:

कार्बोनेटेड अनैसर्गिक शीतपेयात बेसुमार साखर असते. यामुळे वजन वाढतं अणि ब्लोटिंगचा (पोट फुगून ढब्ब होणे) त्रासही सतत होतो.

ब्लोटिंगमुळे बेचैन वाटू लागतं. यामुळे गॅसेसचा त्रास होतो. ब्लोटिंग आणि गॅसेस यामुळे फुफ्फुसांवर ताण येऊ शकतो. सोडा, बियर, स्पार्कलिंग वाईन, स्पार्कलिंग सायडर यांच्या सेवनानं डिहायड्रेशनही होतं.

म्हणूनच तहान लागली तर या कशाचंही सेवन न करता पाणी पिणं हा एकमेव उत्तम उपाय आहे.

 

sunny leone 2 inmarathi

 

प्रिझर्व्हर्ड मांसाहार:

बेकॉन, कोल्ड कट्स, हॅम आणि हॉटडॉग यासारख्या मांसाहारी पदार्थात खूप जास्त प्रमाणात ॲडिक्टिव्हचा समावेश केलेला असतो. अनेक कंपन्या नायट्रेटचा वापर रंगासाठी आणि खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी करतात.

 

preserved-non-veg-inmarathi

 

European Respiratory Journal नं केलेल्या अभ्यासानुसार अतिरिक्त प्रमाणात आणि अनावश्यक असणारं नायट्रेट वापरल्यानं COPD व्याधी बळावण्याच्या शक्यता वाढतात. याचा परिणाम कधी कधी इतका गंभीर होतो की हॉस्पिटलमधे तातडीनं ॲडमिट करण्यावाचून पर्याय उरत नाही.

फूलभाज्या:

गॅस आणि ब्लोटिंग यामुळे श्र्वसनाला त्रास होतो. बेचैनी जाणवत रहाते. मोकळेपणाने श्र्वास घेणं कठीण होतं. फूलभाज्या वर्गात मोडणार्‍या कोबी, फ्लॉवर, ब्रोकोलीसारख्या भाज्यांमध्ये फायबर आणि पोषणमूल्यं मोठ्या प्रमाणात असतात.

 

cauliflower-inmarathi

 

मात्र यामुळे त्या पचायला जड होतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन फुफ्फुसावर ताण येण्याची शक्यता असते. म्हणूनच अती तंतुमय पदार्थही टाळले पाहिजेत किंवा अगदी नियंत्रणात खाल्ले पाहिजेत.

दूग्धजन्य पदार्थ:

फुफ्फुसाशी संबंधित त्रास असणार्‍या काही रुग्णांना दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनानंही त्रास होतो.

 

cheese and calcium inmarathi

 

दुधात भरपूर कॅल्शियम असतं हे आपल्याला माहितच आहे. मात्र, कॅल्शियमसोबतच दुधात कॅस्मोर्फिन असतं त्यामुळे बर्‍याच जणांना कफ होतो.

मीठाचं अतिरिक्त सेवन:

“नमक स्वाद अनुसार” ही म्हण केवळ म्हण नाही तर हा कडकपणे पाळायचा नियम आहे.

ज्यांना प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाण्याची सवय आहे अशांना इतर त्रासांसोबतच COPD ला सामोरं जावं लागतं. मीठ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यानं शरीरातलं पाण्याचं संतुलन बिघडतं.

 

table salt inmarathi

 

हे पाण्याचं प्रमाणं वाढलं की श्र्वसनाला त्रास होतो. म्हणूनच ज्यांना हा त्रास आहे अशांनी जास्तीचं मीठ खाणं टाळायला हवे!

तळलेले पदार्थ:

तळलेले पदार्थ केवळ चरबी आणि लठ्ठपणा वाढवतात असं नाही, तर या पदार्थांमुळेही ब्लोटिंग होऊन श्र्वास घेताना बेचैनी वाढू शकते. तसेच सतत तळलेले पदार्थ खाल्ल्यानं शरीरातलं चरबीचं प्रमाण वाढतं. याचा दाब फुफ्फुसांवरही सतत आल्यानं श्वसनासंबंधी रोगांना आमंत्रण मिळतं.

विकतच्या, बाहेर बनवलेल्या पदार्थात शरीराला घातक अशा चरबी वाढवणाऱ्या घटकांचा बेसुमार वापर केलेला असतो.

 

vadapav-inmarathi

 

यामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं. परिणामी ते ह्रदविकाराला आमंत्रण ठरतं. म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा फ्रेंच फ्राईज, चिकन विंग्ज किंवा अगदी आपला वडापाव, भजी असे पदार्थ खुणावू लागतील तेव्हा थोडासा तब्येतीचा विचार करा.

जिभेला कदाचित आनंद मिळेल पण, या पदार्थांमुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकेल हे लक्षात घ्या. तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले, शिजवलेले, वाफवलेले पदार्थ निवडा.

हे सगळं वाचून तुम्हाला निराश वाटून घेण्याचं कारण नाही. याचा अर्थ चांगलंचुंगलं काही खायचंच नाही असाही नाही. वरील यादीतले खाद्यपदार्थ वगळून जे COPD FRIENDLY पदार्थ आहेत त्यांना तुम्ही अगदी डोळे झाकून खाऊ शकता.

आहारातले हे थोडेसे बदलही तुम्हाला अनेक व्याधींपासून दूर ठेवू शकतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?